Eco Friendly Ganpati

आपण अगदी मनोभावे, उत्साहाने गणपती घेऊन येतो. पाच दिवस, दहा दिवस अगदी मनोभावे गणपतीची पूजा करतो. प्रसाद, नैवेद्य, मंगळागौर, भजन, पूजा अशा अनेक तऱ्हेने मोरयाला प्रसन्न करतो,  मात्र बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मात्र ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही.

दुस-या दिवशी ती किना-याला येऊन पडलेली असते आपल्या संस्थेचे कार्यकर्ते खुप मोठ्या प्रमाणात सर्व चौपाटीवर पुर्नविसर्जन करित असतात. गणेश मूर्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस ह्या मुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी संस्थेने ‘इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनविण्यास सुरुवात केली.

                       

इको – फ्रेंडली गणपती हा पर्यावरणाशी निगडीत एक स्तुत्य उपक्रम आहे, ज्यात कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मुर्ती बनविल्या जातात. अनिरुद्ध आदेश पथकाच्या उपासकांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे.

भक्तिमय निष्काम सेवेतून विविध उपासना केंद्रातील श्रद्धावान व कार्यकर्ते श्री गणेशाच्या अत्यंत सुंदर व आकर्षक मूर्ती बनवत आहेत. ह्यासाठी श्रद्धावानांनी लिहून जमा केलेल्या रामनाम वह्याच्या कागदाच्या लगद्याचा वापर केला जातो.  पाण्यात आगदी सहजपणे विरघळल्या जाणार्‍या ह्या मुर्तींना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांचा यात अजिबात वापर केला जात नाही.

रंग,रुपासह अनेकानेक आकारातील साचे आणि लोकांची याबाबतची आवड आदींबाबत ट्रस्टने संशोधन केले, लोकांची मते जाणून घेतली आणि मूर्ती तयार होऊ लागल्या व लोकांचा ह्यास चांगला व उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रामनवमीपासून दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम न्यु इंग्लीश स्कुल, बांद्रा येथे संध्याकाळी ६ नंतर बुकींग सुरू होते ह्यावेळी मुर्तीही बघण्यासाठी ठेवल्या जातात.

  • कशी तयार होते ही मूर्ती ?

अनिरुद्ध उपासना फौंडेशनचे उपासकांनी रोज लिहीत असलेल्या रामनाम वहीच्या जपाच्या कागदाचा वापर करून गणेश मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला. संपूर्ण दिवस आधी कागद भिजवल्यावर पांढरी शाई व झाडाचा डिंक त्यात मिसळून त्यांचा लगदा तयार करण्यात येतो

                       
            

हा लगदा मग साच्यामध्ये बसवला जातो.ह्यामधून तयार झालेली मूर्ती उन्हात वाळवली जाते.त्यानंतर नैसर्गिक रंग वापरून सुबक, सुंदर अशा मूर्ती रंगवण्यात येतात. पाण्यामध्ये पटकन विरघळणाऱ्या आणि रासायनिक रंगाचा वापर नसलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती ‘इको यामध्ये रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गेरूचा तसेच भाज्यांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.

ह्या अशा निष्काम, नि:स्वार्थी प्रेरणेतून चाललेल्या कामात सर्व वयोगटातील पुरूष व स्त्रियांसोबत लहान मुलांचाही मोलाचा सहभाग आहे .

इथे अर्थार्जनाचा किंवा पैसा कमावण्याचा उद्देश नसून लोकांमध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्तींसंबंधी जागृती करण्याचा उद्देश असल्याने अशा मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था फौंडेशन तर्फे केली जाते.

मुंबई बाहेर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, नगर अकोला नाशिक, नागपूरमध्येही ह्या मूर्ती विराजमान झाल्या आहेत. लगद्याच्या  ह्या मूर्तींना उंचीचे बंधन नसते

गणेशोत्सव पर्यावरणपूरकच असला पाहिजे, असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणाऱ्या ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ सारख्या संस्थेचे अनुकरण जर प्रत्येक सुजाण गणेश भक्ताने केले तर सार्वजानिक गणेश उत्सवामुळे होणारा पर्यावरण ऱ्हास नक्कीच आटोक्यात येऊ शकेल. सार्वजनिक उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही,  ह्यासाठी पर्यावरण जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण संदेश इको – फ्रेंडली गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण गणेशभक्तांपर्यंत पोचवू शकतो.

गणपती बुकिंग माहिती व आकडेवारी

हरिशसिंह महाजन

मोबाईल नं – +९१-९८२००२९२०९

ई-मेल – hareeshmahajan@gmail.com

मिलिंदसिंह सलगरकर

मोबाईल नं – +९१-९५४५४५५०६५

ई-मेल- milindsalgarkar@gmail.com

मिलिंदसिंह नाईक

मोबाईल नं – +९१-९८३३९३८३५२

ई-मेल- milind189@gmail.com

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com