आमच्या विषयी

Upasana Kendra

 

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन ही एक सेवाभावी (चॅरिटेबल – Not for Profit) संस्था असून कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम २५ अंतर्गत, एप्रिल २००५ मध्ये स्थापन झाली. प्रामुख्याने देशाच्या विविध भागात आणि परदेशात सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र स्थापन करणे व त्यामार्फत अनिरुद्धांच्या अध्यात्मिक शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे व त्या अनुषंगाने सेवाभावी कार्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

ह्या फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच प्रामुख्याने देशाच्या विविध भागात आणि परदेशात उपासना केंद्रे स्थापन करणे व सदगुरु श्री अनिरुद्ध यांच्या आध्यात्मिक शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याशिवाय फाऊंडेशन त्यांच्या संलग्न संस्थाद्वारे उदा. अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, इत्यादी; विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सदगुरु श्रीअनिरुद्ध यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली राबविते.

फाऊंडेशनची इतर काही उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत –

१) सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास हाती घेणे व सर्वधर्मसमभाव व बंधुत्वाची जाणीव समाजात निर्माण करणे व त्याला प्रोत्साहन देणे.

२) जगामध्ये कुठेही व व कोणत्याही नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाय योजनांच्या मदत कार्यात व मानवीय सेवा पुरविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य प्रदान करणे.

३) शांततेच्या काळात देशाच्या कानाकोपर्‍यात मोठ्या संख्येने तरुण स्वयंसेवकांची उभारणी करणे व पुढे कोणतीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती वा परदेशी आक्रमकता वाढल्यास ह्या स्वयंसेवकांची सेवा भारत सरकारकडे आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी बिनशर्तपणे समर्पित करणे.

४) सामान्य जनतेच्या फायद्यासाठी प्रामुख्याने गरीब व गरजूंकरता – धर्म, जात, पंथ आदी भेदभाव न करता – धर्मादाय दवाखाने, वृद्धाश्रम, बाल कल्यान केंद्रे स्थापन करणे.

५) गोविंदविद्या, गोपालविद्या आणि बलविद्येसारख्या प्राचीन भारतीय विद्या आणि विज्ञान, संशोधन आणि विश्लेषण यांचा प्रचार आणि प्रसार करणे.

६) प्रार्थनास्थळे, ध्यानकेंद्रे, अनाथाश्रम, धार्मिकस्थळे यांसारखे आधार देणारी केंद्रे स्थापन करणे.

७) प्राचीन भारतीय ग्रंथांचा आणि संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणे.

८) विविध भारतीय आणि परदेशी भाषांची एकात्मता आणि अखंडता जोपासण्यास प्रोत्साहन देणे.

९) देशात व देशाबाहेर निरक्षरता निर्मूलनासाठी कार्य करणे व त्यासाठी शिक्षणाचा प्रचार व निरक्षरता निर्मूलनाशी सुसंगत असे प्रकल्प व इतर सुविधा प्रदान करणे

१०) शरीर, मन व बुद्धी ह्या तीन स्तरांवर स्वजागरुकता प्राप्त करण्यासाठी जात, पंथ वा धर्म न बघता खूप मोठ्या संख्येने लोकांना मार्गदर्शन करणे.