Homepage Layer Slider

01NewBanner_Marathi_05
02NewBanner_Marathi_04
03NewBanner_Marathi_03
04NewBanner_Marathi_01
previous arrow
next arrow

आमच्या विषयी

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन ही एक सेवाभावी (चॅरिटेबल – Not for Profit) संस्था असून कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम २५ अंतर्गत, एप्रिल २००५ मध्ये स्थापन झाली. प्रामुख्याने देशाच्या विविध भागात आणि परदेशात सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र स्थापन करणे व त्यामार्फत अनिरुद्धांच्या अध्यात्मिक शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे व त्या अनुषंगाने सेवाभावी कार्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

अधिक वाचा :

सांघिक उपासना

सांघिक उपासनेच्या सुंदर संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी अनेक ठिकाणी अनेक उपासना केंद्रे स्थापन केली. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणच्या उपासना केंद्रातून भक्तिमय वातावरणात आज सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिलेल्या सांघिक उपासना श्रद्धावान करतात. ह्या सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पंदनं उत्पन्न होतात ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात.

​अधिक वाचा :​

भक्तीमय सेवा

प्रार्थनेतून मिळणारी शक्ती व त्याचबरोबरीने घडणारी सेवा हाच पाया सद्‍गुरु अनिरुध्द बापूंच्या भक्तीमय सेवा उपक्रमांचा आहे. भक्ती व समाजासाठी सेवा या  गोष्टी एकत्रितपणे असायला हव्यात व ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचे ते सांगतात. याच तत्वावर आधारभूत असलेल्या सद्‍गुरु श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये श्रध्दावान  सहभागी होतात.

अधिक वाचा :

भक्तिमय सेवा

सर्व पोस्ट वाचा

अल्फा ते ओमेगा न्युजलेटर

“अल्फा टू ओमेगा” हे आपले  बातमीपत्र  श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन, अनिरुद्धाज् अ‍ॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट’ आणि त्यांच्या संलग्न संस्थांशी निगडीत नुकत्याच घडलेल्या आणि आगामी कार्यक्रमासंबंधी अंतर्दृष्टी देणारे एक माध्यम आहे. ह्या बातमीपत्राद्वारे आपल्या संस्थेकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या आणि नजीकच्या भविष्यकाळात राबविल्या जाणार्‍या भक्तिमय सेवांसंबंधी तपशील दिले जातील.

संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या भक्ती-सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकापर्यंत संस्थेविषयीची माहिती पोहोचावी या उद्देशाने हे बातमीपत्र तयार केले गेले आहे. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी प्रसारीत न करता फक्त ज्यांना आपल्या संस्थेचे कार्य जाणून घेण्यात खरोखर स्वारस्य आहे अशांपर्यंतच प्रसारीत करण्यावर भर दिला गेला आहे. जे श्रध्दावान दूर राहतात मात्र संस्थेबाबतच्या घडामोडी जाणून घेण्यास उत्सुक आहेत अशांसाठी हे भौतिक अंतर कमी करण्याच्या उद्देशानेदेखील हे बातमीपत्र सुरू करण्यात येत आहे. ह्या बातमीपत्रात उपासना केंद्रांनी आणि श्रध्दावानांनी विविध क्षेत्रांमध्ये भक्तिमय सेवेअंतर्गत केलेल्या प्रशंसनीय घटनांचा ठळक घडामोडी म्हणून समावेश केला जाईल.

ह्या बातमीपत्राची ही प्रथम आवृत्ती असल्यामुळे अनिरुध्द पौर्णिमा ते दत्तजयंती हा कालवधी ह्यात अंतर्भूत केला जाईल. पुढील बातमीपत्र प्रत्येक महिन्याला प्रकाशित केले जाईल. ह्या बातमीपत्रावरील आणि तसेच यापुढे येणार्‍या बातमीपत्रांवरील आपल्या अभिप्रायांचे नक्कीच स्वागत आहे, यामुळे बापूंच्या श्रध्दावान मित्रांच्या गरजा लक्षात घेऊन, माहिती व सादरीकरण अधिक प्रभावीपणे करता येतील.

अधिक वाचा 

आगामी कार्यक्रम

श्रीधनलक्ष्मी व श्रीयंत्रपूजन

या धनत्रयोदशीच्या दिवशी आदिमाता महालक्ष्मी आणि भक्तमाता श्रीलक्ष्मी या दोघींची कृपा प्राप्त करून घेता येते. या दोन्ही मातांचे अधिष्ठान म्हणजे ‘श्रीयंत्र’. श्रीयंत्राच्या केवळ पूजनाने आणि दर्शनाने आदिमाता महालक्ष्मी आणि भक्तमाता श्रीलक्ष्मी यांची सहज कृपा प्राप्त करून घेता येते.

’श्री’ म्हणजे श्रेष्ठता, ’श्री’ म्हणजे पूजनीय आणि ’श्री’ म्हणजे षोडश एैश्‍वर्यप्राप्तीचे साधन.

एखाद्या श्रद्धावानाकडे श्रीयंत्र नसेल तरीही स्टेजवरील श्रीयंत्राच्या पूजनाचे दर्शन घेतल्यानेसुद्धा शांती, तृप्ती, समाधान व भक्तीचे पुण्य सहजपणे प्राप्त होते. 

अधिक वाचा 

विशेष व्हिडीओ

प्रकल्प