द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स

संकल्पना

२००२ साली सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम. डी. मेडिसिन) आपल्या १३ कलमी योजनेची माहिती देताना भक्ती-सेवा-ज्ञान या त्रिसूत्रीचा उल्लेख केला होता. त्यातील ‘ज्ञान’ या सूत्रावर आधारलेल्या ‘जनरल नॉलेज बँक’ या योजनेअंतर्गत एका नव्या संकल्पनेने आकार घेतला आणि ६ मे २०१० रोजी ‘रामराज्य’ ही संकल्पना मांडताना सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) ‘द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’ची घोषणा केली.

अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतील ‘रामराज्या’त ‘द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रत्येकाची प्रत्यक्षात व नियमित प्रगती व्हावी म्हणून हे जर्नल्स सुरु करण्यात आले.

एक्स्पोनंट जर्नल्स म्हणजे काय?

कुठल्याही क्षेत्रातील निपुण व्यक्तिस ‘एक्स्पोनंट’ असे म्हटले जाते. ‘एक्स्पोनंट’ या नावाला साजेल अशीच ही जर्नल्स आहेत. कारण ह्या जर्नलमध्ये प्रत्येक क्षेत्रातील नवीन, सखोल व सामान्य ज्ञान त्या त्या क्षेत्रातील निपुण व्यक्तींकडून मिळत आहे. हे जर्नल म्हणजे प्रत्येकाला त्याच्या संबंधित क्षेत्रामध्ये अद्ययावत करणारे, विशेष व सामान्य ज्ञान देणारे नियतकालिक.

डॉ. अनिरुद्ध म्हणतात, या जर्नल्समुळे आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या अनेक अडचणींना सामोरे जातो, ते थांबेल. जे ज्ञान आम्हाला मिळणं आवश्यक आहे ते मिळू लागेल. जर्नल्सच्या विषयांच्या क्षेत्रात जी मंडळी आहेत, त्यांनी ह्या जर्नल्सचा वापर करावा.

जर्नल्स म्हणजे काय? तर केवळ विचाराने नव्हे, तर थिअरी आणि प्रॅक्टीकल यांमध्येसुद्धा अप टू डेट ठेवणारे! एक्स्पोनंट ह्या शब्दाचा अर्थ ह्याच्याशीच जोडलेला आहे, अप टू डेट ठेवण्याशी, उन्नती करण्यासाठी ! उन्नयन करण्याशी !

वर्षाला चार याप्रमाणे दर तीन महिन्यांनी एक्स्पोनंट जर्नल्स प्रकाशित होतात. मुख्य म्हणजे ते सगळ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. ह्या जर्नल्सची माहिती पुढील प्रमाणे –

१. शेअर्स आणि स्टॉक मार्केट – द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर शेअर्स अँड स्टॉक्स् मधून सामान्य व्यक्तीला शेअर्स व स्टॉक्स्ची उत्कृष्ट माहिती देण्याचा प्रयास केलेला आहे.

२. हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन – आरोग्याशी निगडीत असणार्‍या अनेकविध गोष्टी, त्यांचे वैद्यकीय दृष्टीने केलेले विश्लेषण सर्वांना या जर्नलमार्फत जाणून घेता येईल. त्यानुसार काळजी घेऊन निर्भय आणि निर्मळ असा जगण्याचा आनंद लुटण्यासाठी हे हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन जर्नल उपयुक्त ठरेल.

३. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – सध्याचा काळ म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञानाचं युग’ असल्याचं मानलं जातं. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारी जलद प्रगती आणि नोकरी मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा बघता एका व्यक्तीकडे एकच कौशल्य असणे हे पुरेसे नक्कीच नाही. म्हणूनच प्रत्येकाला नवीन माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या जर्नलच्या माध्यमातून अद्ययावत् माहिती, सुधारणा आणि कल प्रत्येकापर्यंत पोहचतील.

४. जनरल इंजिनिअरिंग – विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सततच्या प्रगतीमुळे साध्या चाकापासून ते सॅटेलाईटपर्यंत प्रत्येक गोष्टीत नाविन्य येत आहे. ह्या प्रगतीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे काळाबरोबर चालण्यासाठी सर्वसामान्य व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अद्ययावत् रहावेत ह्या हेतूने एक्सोपोनंट ग्रुप ऑफ जर्नल ऑफ जनरल इंजिनिअरिंग सुरू करण्यात आले आहे.

५. इलेक्ट्रॉनिक्स – आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरत असलेल्या बर्‍याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत. यासाठीच ग्रामीण युवक, सामान्य माणूस, उद्योजक, शैक्षणिक व संशोधन करणार्‍या समुदायापर्यंत इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान पोहचावे हे एकमेव ध्येय द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. या विषयाचं प्रत्येक जर्नल हे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवीन विकासाबद्दल तर माहिती देईलच पण त्याचबरोबर या विषयातील मूलभूत सिद्धांत व माहितीही मांडत आहे.

६. प्रोफेशनल मेडिसिन – आरोग्यतज्ञांना या क्षेत्रातही होणार्‍या विकासाची पूर्ण माहिती मिळावी हाच उद्देश द एक्स्पोनंट जर्नल फॉर प्रोफेशनल मेडिसिनचा आहे.

७. चार्टर्ड अकाउंटंटस् – द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर चार्टर्ड अकाउंटंटस् आपल्यासाठी व्यावहारिक ज्ञानाचा जणू खजिनाच उघड करत आहे. हे ई-जर्नल हे ‘सीए’ झालेल्यांसाठी तर आहेच, पण त्याचबरोबर अकाऊंट क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांसह सीएच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनाही अत्यंत उपयुक्त ठरते.

८. एमबीए – क्षेत्र कोणतंही असलं तरी व्यवस्थापनाचं कौशल्य सर्वच ठिकाणी उपयुक्त ठरू शकतं. या क्षेत्रात करिअरच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. करिअर करण्याची इच्छा असणार्‍यांबरोबरच नवनवे बदल जाणून घेण्यासाठी ‘एमबीए’चं जर्नल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ह्या जर्नलमध्ये देखील अनेक अनुभवी व्यावसायिकांच्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे.

सर्व प्रकारच्या जर्नल्समधील लेखांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान समाविष्ट नसून व्यावहारिक ज्ञान देखील आहे. हे लेख लिहिणार्‍या व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील अतिशय जाणकार व अनुभवी व्यक्ती आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून येणारे लेख हे ज्ञानाने व अनुभवाने परिपूर्ण आहेत. वाचकांच्या सोयीसाठी हे लेख संक्षिप्त व सोपे करण्यात आलेले आहेत.

‘ज्ञान’ व त्यासाठी आवश्यक घटक असलेल्या माहितीची कवाडे सदैव खुली ठेवण्यासाठी, ‘एक्स्पोनंट जर्नल्स’ला पर्याय नाही.

याबाबतीत अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटशी संपर्क साधा. http://exponentjournals.com/