जनरल नॉलेज बॅंक

ज्ञानसुद्धा भक्तीनेच मिळतं आणि भक्तीतून ज्ञान उत्पन्न होते. पण मला जर भक्ती कोणाची करायची आहे, हेच माहीत नसेल तर……… म्हणजे मला तेवढं तरी ज्ञान हवेच आणि या ज्ञानाची उपासना केल्याशिवाय आजच्या काळात तरणोपाय नाही.

३ ऑक्टोबर, २००२ रोजी सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या १३ कलमी योजनेची माहिती देताना सेवा व भक्ती याबरोबरच ‘ज्ञान’ या संकल्पनेवरही भर दिला होता. याच संकल्पनेला पुढे नेणारी अनोखी योजना म्हणजे ‘जनरल नॉलेज बँक’!

जगात एकच गोष्ट अविरत घडत राहते आणि ती म्हणजे बदल (Change is the only Constant thing in the World.) आणि दररोज अगदी प्रत्येक क्षणाला जगात घडणार्‍या बदलांची अर्थात घडामोडींची माहिती रहावी आणि त्याची सवय लागावी यासाठी ‘जनरल नॉलेज बँके’ची सुरुवात करण्यात आली.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आले आहे. त्यामुळे बदलत्या जगाशी जोडलेले न राहिल्यास, काळाच्या आणि तंत्रज्ञानाच्या वेगाबरोबर न धावल्यास निश्चितच आपण मागे पडू शकतो. तसेच आपल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांची देखील माहिती असणे आजच्या युगात खूप महत्त्वाचे मानले जाते. यासाठीच जनरल नॉलेजचे महत्व सध्याच्या युगात सर्वांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.

‘जनरल नॉलेज बँके’ची रचना 

. सद्गुरु श्रीअनिरुद्धांकडून साधण्यात येणारा संवाद –

सदगुरु श्रीअनिरुद्ध दर गुरुवारी आपल्या श्रद्धावान मित्रांशी प्रवचनाच्या माध्यमातून संवाद साधताना, विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून देत असतात. बापूंनी त्यांच्या या संवादातून अनेक वैश्विक रहस्य उलगडवून, सोपी करुन सांगितलेली आहेत. ‘स्वार्म इंटेलिजन्स’, ‘केमट्रेल्स’, ‘हार्प टेक्नॉलॉजी’, ‘नॅनोटेक्नोलॉजी’ यासारख्या विज्ञान-तंत्रज्ञानातील अनोळखी गोष्टींसह ‘श्रेष्ठतम् वैज्ञानिक डॉ. निकोला टेसला’ यांची ओळख तसेच वैयक्तिक आरोग्याशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव गुरुवारच्या संवादातून करून देण्यात आली आहे आणि हा संवाद निरंतर सुरू आहे.  

. दैनिक प्रत्यक्ष –

डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी २००५ साली सुरू केलेल्या या दैनिकामधून तर सामान्य ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला केलेला आहे. दैनिक प्रत्यक्षमधून सातत्याने विविध क्षेत्रांतील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात अर्थशास्त्र, शेअरबाजार, न्यायवैद्यकशास्त्र, प्रवास, वैद्यकशास्त्र, कायदा, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, ग्रामीण विकास असे अनेकविध विषय हाताळण्यात आले आहेत. त्याचबरोबर बातम्यांमधून दैनंदिन घडामोडींची माहिती मिळाल्याने दररोज माहिती अद्ययावत राहण्यास सहाय्य होते. दरवर्षी ‘दैनिक प्रत्यक्ष’चा वर्धापनदिन तसेच नववर्ष विशेषांक प्रसिध्द होतो. नियमित प्रसिद्ध होणार्‍या दैनिकाच्या आवृत्तीबरोबरच वर्षातून प्रसिद्ध होणारे विशेषांक म्हणजे ज्ञानाचा खजिनाच ठरत असून आजपर्यंत हजारो वाचकांना याचा लाभ मिळालेला आहे.

. एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स –

कॉम्प्युटरबरोबरच स्मार्टफोन व इंटरनेटमुळे ज्ञानाचा प्रवाह अखंड सुरू राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्याचाच आधार घेऊन आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांची असलेली आवड लक्षात घेऊन ‘एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’ची रचना करण्यात आली आहे.

‘ई-जर्नल्स’च्या स्वरूपात असलेल्या ‘एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’च्या सहाय्याने निवडक विषयांमधील ज्ञानात अधिकाधिक भर पडण्यास सहाय्य होते. दर तीन महिन्यांनी आठ विषयांवरील ‘ई-जर्नल्स’ प्रकाशित केली जातात. त्यात जनरल इंजिनिअरींग, चार्टर्ड अकाउंटन्सी, स्टॉक अ‍ॅण्ड शेअर मार्केट, प्रोफेशनल मेडिसिन, एमबीए, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स् व हेल्थ अ‍ॅण्ड हेल्थ सर्विसेस इन्फॉर्मेशन या विषयांचा समावेश आहे.

. सेमिनार्स –

अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घेण्याची देखील आपल्याला फुरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो तरी सदगुरु अनिरुद्ध बापू कायमच वास्तवाचे भान राखून सजग असतात.

त्यातूनच सदगुरु अनिरुद्ध बापूंनी जुगाड, नॅनोटेक्नोलॉजी, क्लाऊड कॉम्प्युटींग, सोशल मिडीया, स्वार्म इंटेलिजन्स, अटेंशन इकॉनॉमी, होलोग्राफी, डॉ. निकोला टेसला व इतर अनेक विषयांवर स्वत: सेमिनार घेतले. या प्रत्येक सेमिनारमागे बापूंचे अथक परिश्रम व अविरत अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा घटक होता. केवळ सामान्य ज्ञान वाढण्यासाठी नव्हे, तर हे सामान्य ज्ञान रोजच्या वापरात कसे येईल यावर सदगुरु अनिरुद्ध बापूंचा जास्तीत जास्त भर असतो. सेमिनारमधून मांडलेल्या अनेक गोष्टी आजच्या घडीला संस्थेच्या विविध उपक्रमांमधून योग्य व यशस्वीरित्या वापरल्या जातात.

‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीने जनरल नॉलेज वाढविण्यासाठी सदगुरु अनिरुद्ध बापू स्वतः प्रचंड मेहनत घेतात. त्याप्रमाणे प्रत्येकाला अशी मेहनत घेता यावी, याकरिता विविध मार्गातून आवश्यक ते सामान्य ज्ञान कसे उपलब्ध होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयासांचा फायदा उचलून प्रत्येकानेच अशा ‘जनरल नॉलेज बँके’त सक्रिय सहभागासाठी प्रयास केले तर बदलत्या काळाच्या प्रवाहात कधीच मागे पडण्याची भीती राहणार नाही.