रामराज्य व त्याची संकल्पना

भारतीय संस्कृतीत श्रीराम यांना मर्यादापुरुषोत्तम म्हणून पूजले जाते. श्रीरामांनी सर्व मानवी मर्यादांचे पालन केले म्हणून ते मर्यादापुरुषोत्तम ठरले. मर्यादा पुरुषार्थाचे विस्तृत विवेचन सद्गुरु श्री अनिरुद्धांनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खंड ‘सत्यप्रवेश’ मध्ये केले आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या ‘अयोध्ये’मध्ये राजा आणि प्रजा उभयतांचे आचरण मर्यादा पुरुषार्थास धरूनच होते आणि त्यामुळे रामराज्यामध्ये अयोध्येतील जनता आनंदी, सुखी व समाधानी होती. या रामराज्यात कुणीही दु:खी, असहाय्य व असंतुष्ट नव्हते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ६ मे २०१० रोजी या रामराज्याची संकल्पना सगळ्यांसमोर स्पष्ट केली.

‘अयोध्येतले नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी मर्यादा-व्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती मर्यादा पुरुषार्थशील होणे, तसा समष्टीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य. २०२५ रोजी रामराज्य आणणे, हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे. या रामराज्यासाठी योग्य ते श्रम घेण्याकरीता आपण वचनबद्ध होणे गरजेचे आहे. हे सगळे प्रयत्न वैयक्तिक व सामाजिक स्तरावर होणे गरजेचे आहे’, हा सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या विवेचनाचा आशय होता आणि त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्वांना ही रामराज्य संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी पुरुषार्थ करण्याचे आवाहन केले.

२०२५ साली रामराज्य आणण्याआधी त्यासाठी पाच स्तरांवर कार्य करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे श्री अनिरुद्धांनी स्पष्ट केले होते. या पाचही स्तरांवरील कार्याचे आपण स्वत: मार्गदर्शन करणार असल्याचेही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितले. पण त्याआधी हे पाच स्तर म्हणजे रामराज्याच्या कार्यातील पाच पायर्‍या असून त्या चढून जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची व सहभागाची आवश्यकता असल्याचे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी नमूद केले. रामराज्याची सुरुवात ग्रामराज्यापासून होते, असेही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्पष्ट केले.

हे पाच स्तर म्हणजे,

१) वैयक्तिक किंवा व्यक्तिगत स्तर

२) आप्त स्तर

३) सामाजिक स्तर

४) धार्मिक स्तर

५) भारतवर्ष आणि जागतिक स्तर

रामराज्य अंतर्गत प्रकल्प

रामराज्याचा स्थापनेसाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी काही प्रकल्प सुरू केले आहेत. यामध्ये पाचही स्तरांचा अंतर्भाव असून शहरापासून ग्रामीण भागातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, याकडे सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी लक्ष पुरविले आहे.

१. अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंगग्विस्टिक.

२. अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ ग्राम विकास

३. द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स सिरिज

अ) द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर प्रोफेशनल मेडिसीन

ब)  द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर मेडिकल इन्फॉर्मेशन

क)  द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर चार्टर्ड अकाउंटन्ड

ड)  द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर एमबीए

इ)  द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर शेअर्स अ‍ॅण्ड स्टॉक मार्केट

ई)  द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर जनरल इंजिनिरिंग

प) द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

फ) द एक्सपोनेंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स

४. अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटीव्ह एनर्जी रिसोर्सेस

५. अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ पोल्यूशन कन्ट्रोल अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन

६. अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् अ‍ॅण्ड बोन्साय स्पोर्टस्

७. वैयक्तिक व सामाजिक स्तरावर प्रत्येकाचा सर्वांगीण विकास करीत असताना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी धार्मिक किंवा अध्यात्मिक स्तरावरही पुरुष व स्त्रियांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पुरुषांसाठी ‘श्रीमहादुर्गेश्वरप्रपत्ती’ तर स्त्रियांसाठी ‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ सुचविली आहे. ही प्रपत्ती म्हणजे प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर समर्थ करणारी आहे.

८. तर हेच कार्य भारतवर्षआणि जागतिक स्तरावर नेण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ‘श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी फॉर  रिससीटेशन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन’ची अर्थात ‘श्रीचण्डिका अभ्युदय व उन्नति सेना’ याची स्थापना केली.

‘आर्मी’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लष्करी पेहराव, हातात रायफल्स घेतलेले सैनिक येतात. पण सद्गुरु श्री अनिरुद्धांनी उभी केलेली ही ‘श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी’ ही ‘रिससिटेशन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन ऑफ ऑल द स्ट्रेन्थ्स ऑफ द ग्रेट इंडियन कल्चर’साठी आहे. एक्झाल्टेशन म्हणजे प्रत्येक दिशेने, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक बाजूने स्वत:चे, ‘स्व’चे, स्वधर्माचे आणि स्वदेशाचे उन्नतीकरण करणे किंवा उत्कर्ष करणे. ही आर्मी आपल्या मातृधर्माचं आणि मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी, त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीच्या सर्वोत्तम सामर्थ्यांचे व त्या सामर्थ्यांच्या प्रभावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आहे. त्याचबरोबर तिसरे महायुद्ध भडकल्यास भारतीय सैन्याला आवश्यक ते सहाय्य करणे, हे या आर्मीचे उद्दिष्ट आहे.

या प्रवचनातूनच सद्गुरु श्री अनिरुद्धांनी रामराज्याच्या दृष्टीने अपेक्षित असणारी जीवनशैली व समाजव्यवस्था कशी असावी, हे स्पष्ट केले होते.