श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन ही एक सेवाभावी (चॅरिटेबल – Not for Profit) संस्था असून कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम २५ अंतर्गत, एप्रिल २००५ मध्ये स्थापन झाली. प्रामुख्याने देशाच्या विविध भागात आणि परदेशात सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र स्थापन करणे व त्यामार्फत अनिरुद्धांच्या अध्यात्मिक शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे व त्या अनुषंगाने सेवाभावी कार्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
सांघिक उपासनेच्या सुंदर संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी अनेक ठिकाणी अनेक उपासना केंद्रे स्थापन केली. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणच्या उपासना केंद्रातून भक्तिमय वातावरणात आज सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिलेल्या सांघिक उपासना श्रद्धावान करतात. ह्या सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पंदनं उत्पन्न होतात ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात.
प्रार्थनेतून मिळणारी शक्ती व त्याचबरोबरीने घडणारी सेवा हाच पाया सद्गुरु अनिरुध्द बापूंच्या भक्तीमय सेवा उपक्रमांचा आहे. भक्ती व समाजासाठी सेवा या गोष्टी एकत्रितपणे असायला हव्यात व ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचे ते सांगतात. याच तत्वावर आधारभूत असलेल्या सद्गुरु श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांमध्ये श्रध्दावान सहभागी होतात.
“अल्फा टू ओमेगा” हे आपले बातमीपत्र श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन, अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट’ आणि त्यांच्या संलग्न संस्थांशी निगडीत नुकत्याच घडलेल्या आणि आगामी कार्यक्रमासंबंधी अंतर्दृष्टी देणारे एक माध्यम आहे. ह्या बातमीपत्राद्वारे आपल्या संस्थेकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या आणि नजीकच्या भविष्यकाळात राबविल्या जाणार्या भक्तिमय सेवांसंबंधी तपशील दिले जातील.
संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या भक्ती-सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकापर्यंत संस्थेविषयीची माहिती पोहोचावी या उद्देशाने हे बातमीपत्र तयार केले गेले आहे. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी प्रसारीत न करता फक्त ज्यांना आपल्या संस्थेचे कार्य जाणून घेण्यात खरोखर स्वारस्य आहे अशांपर्यंतच प्रसारीत करण्यावर भर दिला गेला आहे. जे श्रध्दावान दूर राहतात मात्र संस्थेबाबतच्या घडामोडी जाणून घेण्यास उत्सुक आहेत अशांसाठी हे भौतिक अंतर कमी करण्याच्या उद्देशानेदेखील हे बातमीपत्र सुरू करण्यात येत आहे. ह्या बातमीपत्रात उपासना केंद्रांनी आणि श्रध्दावानांनी विविध क्षेत्रांमध्ये भक्तिमय सेवेअंतर्गत केलेल्या प्रशंसनीय घटनांचा ठळक घडामोडी म्हणून समावेश केला जाईल.
ह्या बातमीपत्राची ही प्रथम आवृत्ती असल्यामुळे अनिरुध्द पौर्णिमा ते दत्तजयंती हा कालवधी ह्यात अंतर्भूत केला जाईल. पुढील बातमीपत्र प्रत्येक महिन्याला प्रकाशित केले जाईल. ह्या बातमीपत्रावरील आणि तसेच यापुढे येणार्या बातमीपत्रांवरील आपल्या अभिप्रायांचे नक्कीच स्वागत आहे, यामुळे बापूंच्या श्रध्दावान मित्रांच्या गरजा लक्षात घेऊन, माहिती व सादरीकरण अधिक प्रभावीपणे करता येतील.
You can contribute towards the projects undertaken by the organisation using Online Net Banking or by using Credit / Debit cards.
Donate Now!श्रीरामनवमीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रामजन्म सोहळा’. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार दुपारी श्रीरामजन्म पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या बालपणी ज्या झोळीचा वापर केला गेला, त्याच झोळीचा श्रीरामजन्माच्यावेळी पाळणा म्हणून उपयोग केला जातो. ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ च्या गजरात आणि रामाच्या पाळण्याचे गीत गाण्यात सर्व श्रद्धावान सहभागी होतात. त्यानंतर रामरायाचे ‘श्रीराम’ म्हणून नामकरण केले जाते आणि ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून वाटला जातो.