AniruddhaFoundation-Eco-Friendly Ganesh workshop preparation

इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

प्रकल्प

सन २००४ मध्ये सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी – एम.डी. मेडीसिन) प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने कागदाचा लगदा (पल्प) व नैसर्गिकरित्या सहजतेने विघटन होणार्‍या सामग्रीचा वापर करून इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली.

गणेशमूर्ती बनविण्यासाठी वापरला जाणारा कागदाचा लगदा हा अनिरुद्धाज युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनामच्या अंतर्गत जमा झालेल्या पवित्र अशा रामनाम वह्यांच्या पानांपासून तयार केला जातो. गणेशमूर्ती कागदी लगदा व नैसर्गिक डिंक यांचा वापर करून बनविल्या जातात. कोणताही अशुद्ध वायू बाहेर उत्सर्जित न होता या मूर्तींचे पाण्यात पूर्णतः विसर्जन होते. पर्यावरणपूरक गोष्टी मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जातात.

हा उपक्रम आता महाराष्ट्रातील १३८ ठिकाणी पसरलेला आहे, ज्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे आणि रत्नागिरी हे विभाग येतात. या उपक्रमात २९०० पेक्षा जास्त प्रशिक्षित श्रद्धावान सेवकांचा समावेश आहे.

पर्यावरण संवर्धनाचे फायदे लक्षात घेता सध्या इको फ्रेंडली गणेशमूर्तींच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

 

इको फ्रेंडली गणेशमूर्ती

आमच्या संस्थेद्वारे इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची मोफत शिबीरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये मूर्ती बनवण्यासाठी लागणारे योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.

२००४ मध्ये ३३५ गणेशमूर्ती बनविण्यापासून सुरु झालेल्या या उपक्रमाने यंदा चार आकडी संख्या गाठली आहे. यावर्षी ४००० पेक्षा जास्त मूर्ती बनविण्यात आल्या होत्या.

 

श्रद्धावान - इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवत असताना

श्रद्धावान – इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवत असताना

AniruddhaFoundation-Eco-FriendlyGaneshIdols बेस रंगासहित इको फ्रेंडली गणेशमूर्ती

बेस रंगासहित इको फ्रेंडली गणेशमूर्ती

श्रद्धावान कागदाचा लगदा साच्यात भरत आहेत

श्रद्धावान कागदाचा लगदा साच्यात भरत आहेत

AniruddhaFoundation-Eco-FriendlyGaneshIdols-श्रद्धावान कागदाचा लगदा साच्यात भरत आहेत

श्रद्धावान कागदाचा लगदा साच्यात भरत आहेत

AniruddhaFoundation-Eco-FriendlyGaneshIdols - साच्यातून बाहेर काढलेल्या गणेशमूर्तींवर स्प्रे पेंटींग (रंगकाम) केले जात आहे

साच्यातून बाहेर काढलेल्या गणेशमूर्तींवर स्प्रे पेंटींग (रंगकाम) केले जात आहे

 

Leave a Reply