AniruddhaFoundation-WarmthOfLove-DubaiCentre

मायेची ऊब प्रकल्प – दुबई केंद्र गोधडी प्रशिक्षण

प्रकल्प

’मायेची ऊब’ या प्रकल्पाअंतर्गत श्रद्धावान सेवकांनी बनवलेल्या गोधडीमधुन त्यांच्या प्रेमाची ऊब तर मिळतेच, पण त्याचबरोबर ही गोधडी म्हणजे त्यांच्या निःस्वार्थी सेवेचे प्रतिकच असते.

 

श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनद्वारे श्रद्धावान स्त्री व पुरूषांसाठी ’गोधडी प्रशिक्षण’ शिबीराचे आयोजन आयोजन केले जाते. जुन्या साड्या व चादरी यांचा वापर करून गोधड्या बनविण्याचे प्रशिक्षण श्रद्धावानांना दिले जाते.

ज्या परिसरात ह्या गोधड्यांचे वितरण केले जाणार आहे तेथील परिस्थितीचा विचार करता गोधड्या अशा प्रकारे शिवल्या जातात की, त्या गोधड्यांच्या चारही बाजू योग्य पद्धातीने शिवून बंद होतील; जेणेकरून कृमी-किटकांना तेथून आत शिरण्यात प्रतिबंध निर्माण होईल.

 

अद्ययावत माहिती

“मायेची ऊब” योजनेअंतर्गत दुबई केंद्रातर्फे २४३ गोधड्या शिवल्या गेल्या.

 

AniruddhaFoundation-WarmthOfLoveProjectJuly2017Dubai

AniruddhaFoundation-WarmthOfLoveProjectJuly2017Dubai

AniruddhaFoundation-WarmthOfLoveProjectJuly2017Dubai

Leave a Reply