इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक ) गणेश मूर्तींचे वितरण २०१७

प्रोजेक्ट (प्रकल्प):

इको-फ्रेंडली गणेश मूर्ती वितरणासाठी तयार –
गणेशोत्सवासाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्तींची मागणी खूप झपाट्याने वाढत आहे आणि वाढत्या संख्येने अधिकाधिक लोकांना त्याचे पर्यावरणपूरक महत्त्व समजू लागल्याने , इको-फ्रेंडली गणेश मूर्तीच घेण्याकडे त्यांचा कल झुकत आहे. श्री अनिरूध्द उपासना फाऊंडेशन आणि त्याची संलग्न संस्था ’श्री अनिरूध्द आदेश पथक’ ह्यांनी कागद्याचा लगदा आणि घातक रासायनिक प्लास्टर ऑफ पॅरीसला पर्याय म्हणून वापरले जाणारे दुसरे बायोडिग्रेडेबल पदार्थ वापरून गणेश मूर्ती बनवायला सुरुवात केली होती. सदगुरु श्री अनिरूध्द बापू ह्यांच्या मार्गदर्शनानुसार २००४ साली ह्या प्रोजेक्ट्चा आरंभ (श्रीगणेशा )झाला होता.
अनिरूध्द फाऊंडेशन इको-फ्रेंडली गणेश मूर्ती वितरण -२०१७

  

लेटेस्ट अपडेटस् (ताज्या बातम्या/घडामोडी) :
ह्या वर्षी २००० हून अधिक इको-फ्रेंडली गणेश मूर्ती मुंबई येथे बनविल्या गेल्या. ह्या मूर्तींचे न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे आणि हॅपी होम, खार येथे वितरण केले गेले होते.

            

Leave a Reply