AniruddhasBankForTheBlind-30-June-2017

अनिरुद्धाज बॅंक फॉर द ब्लाईंड – सीडीज वितरण जून २०१७

प्रकल्प

श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि श्री अनिरुद्ध आदेश पथक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ’अनिरुद्धाज बॅंक फॉर द ब्लाईंड’ हा प्रकल्प दृष्टीहीन व्यक्तींना सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.

सर्वसामान्य बॅंकेसारखी कार्यरत असणारी ही बॅंक विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्‍या विविध विषयांवरील पुस्तकांचे ऑडिओ सीडी मध्ये रुपांतर करून देते.

शैक्षणिक अभ्यासक्रमांवर आधारित या ऑडिओ सीडी बनविल्या जातात, व त्या अनेक अंधशाळा व महाविद्यालयातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना विनामुल्य दिल्या जातात.

 

अद्ययावत माहिती

विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेचे श्रद्धावान सेवक शैक्षणिक साहित्य (पुस्तकांचे) सीडीवर रेकॉर्डींग करतात व त्या सीडी ऐकून मुले अभ्यास करतात.

आम्हाला हे कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, ३० जून २०१७ पर्यंत १६,२०५ पेक्षाही जास्त सीडीजचे वाटप ’अनिरुद्धाज बॅंक फॉर द ब्लाईंड’ने केले आहे.

 

AniruddhasBankForTheBlind-30-June-2017

Leave a Reply