AniruddhaFoundation-RamRajya

रामराज्याची संकल्पना : 

रामराज्य म्हणजे असे राज्य जे मर्यादापुरुषोत्तम रामाने अयोध्येत स्थापन केले. अयोध्येमध्ये रामाचे राज्य होते म्हणूनच तेथील रहिवासी आनंदी, सुखी व समाधानात होते; कोणीच दुःखी, असहाय्य व भुकेलेले नव्हते, तसेच कोणी शोषित व पिडीतही नव्हते. सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू आपल्या अनेक प्रवचनांमधून अशा रामराज्याची संकल्पना मांडत होते. तसेच ६ मे २०१० बापूंनी रामराज्यावर विशेष प्रवचनही दिले होते.

        या प्रवचनात ते म्हणाले, “अयोध्येतले नागरीक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाजव्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा समष्टीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य. २०२५ रोजी रामराज्य आणणे, हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे.” या रामराज्यासाठी योग्य ते श्रम घेण्याकरीता आपण वचनबद्ध होणे गरजेचे आहे. हे सगळे प्रयत्न वैयक्तिक व सामाजिक स्तरावर होणे गरजेचे आहे. हे रामराज्य आणण्यासाठी आपण काय करायला हवे? या प्रवासात आपल्याकडून काय कार्य अपेक्षित आहे?

पाच पातळ्यांवरील कार्य

हे रामराज्य आणण्याच्या कार्यात आपण कसे सहभागी होवू शकतो, यासाठी सद्गुरु बापू आपल्याला मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असतात. हे रामराज्य प्रकटण्याच्या पाच पायर्‍या आहेत, म्हणूनच ह्यासाठीची तयारीदेखील आता ५ स्तरांवर सुरू आहे.

१) वैयक्तिक किंवा व्यक्तिगत स्तर

२) आप्त स्तर –  आपल्यावर प्रेम करणारे आपल्या कुटुंबातील मंडळी, आपले मित्र इ.

३) सामाजिक स्तर

४) धार्मिक स्तर – सद्गुरु बापूंनी धर्म या विषयावर श्रीमद्पुरुषार्थातील पहिल्या खंड “सत्यप्रवेश” मध्ये लिहलेले आहे की, ’मानवाचे जीवन व त्याचे बाह्य विश्व सुंदर बनवण्यासाठी धर्म मदतीला येतो.’

५) भारतवर्ष आणि जागतिक स्तर

रामराज्य अंतर्गत प्रकल्प

रामराज्याचा दृष्टीने तयारी करण्यासाठी बापूंनी काही प्रकल्प सुरू केले आहेत.

१) अनिरुद्धाज्‌ इन्स्टिटयूट ऑफ लेंग्वेंज और लिंगेस्टिक अनिरुद्ध भाषा व भाषाविद प्रतिष्ठान

२) अनिरुद्धाज्‌ इन्स्टिटयूट ऑफ ग्रामीण विकास

३) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स सिरीज

        क)द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर प्रोफेशनल मेडिसीन

        ख) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स जनरल मेडिकल इन्फॉर्मेशन 

        ग) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर चार्टड अकाऊंन्टट

        घ) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर टीचर्स

        ण) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर शेअर ऍण्ड स्टॉक मार्केट

        च) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर जनरल इंजीनिअरिंग

        छ) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

        द) द एक्सपोन्टट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स

४) अनिरुद्धाज्‌ इन्स्टिटयूट ऑफ अल्ट्ररनेटिव्ह एनर्जी रिर्सोसेस्‌

५) अनिरुद्धाज्‌ लॅबोरेटरी फॉर पल्युशन कन्ट्रोल ऍण्ड एनवारमेन्ट प्रोटेक्शन

६) अनिरुद्धाज्‌ इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्टस्‌ ऍण्ड बोन्साय स्पोर्टस्‌

७) या बरोबरच बापूंनी पुरुषांसाठी ’श्रीमहादुर्गेश्वरप्रपत्ती’ व स्त्रियांसाठी ’श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ करायला सांगितली आहे. ही प्रपत्ती प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर पराक्रमी सैनिक बनवणारी आहे.

८) तसेच बापूंनी श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मीची स्थापना केली. ही आर्मी सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीच्या सर्वोत्तम सामर्थ्यांचे व त्या सामर्थ्यांच्या प्रभावांचे पुनरुज्जीवन करणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या सबलीकरणामुळे झालेले फायदे सर्वाना नक्कीच जाणवतील.

या सर्व गोष्टींबरोबर बापूंनी पुरुष आणि महिलांसाठी करावयाच्या प्रपत्तीविषयी (सांगितलेल्या दिवशी ठराविक पद्धतीने करावयाची पुजा) माहीती दिली. प्रपत्ती करणारे पुरुष आणि महिला घराबरोबरच अध्यात्मिक पातळीवरही पराक्रमी सैनिक बनतात.

बापू सांगतात, वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने दिवसातल्या २४ तासांपैकी किमान २४ मिनिटे तरी उपासना किंवा प्रार्थनेसाठी द्यायला हवीत. याबरोबरच वैयक्तिकरित्या जल उपचार पध्दती, सकाळी उठल्यावर मीठाच्या पाण्याने चूळ भरणे, शताक्षी प्रसादम्‌, कढीपत्त्याची पाने खाणे आवश्यक असल्याचे बापूंनी सांगितले. या गोष्टी नियमितपणे करणार्‍यास शारीरिक व आध्यात्मिक पातळीवर सामर्थ्य प्राप्त होऊन तो रामराज्याचा रहिवासी बनेल.

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com