introductory_article_13_point_program

१४ मार्च २००२ या दिवशी श्रीअनिरुद्धांनी ‘अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (ए‍एडीएम)‘ ह्या संस्थेची स्थापना केली.

..डी.एम. ची कार्यवाही

 • १४ फेब्रुवारी २००२ ते २७ फेब्रुवारी २००२ ह्या दरम्यान आयोजिलेली १४ दिवसांची कार्यशाळा हे एका सुनिश्‍चित दिशेने उचललेले यशस्वी पाऊलच होते.
 • संभाव्य आपत्ती व आपत्ती निवारण योजना ह्या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, के.ई.एम, बी.वाय.एल.नायर अशी रुग्णालये, आय.आय.टी. मुंबई अशा विविध नामांकित संस्थांचे उच्च पदाधिकारी यांचा समावेश होता.
 • निवडक कार्यकर्त्यांना विशेष प्रश़िक्षण देऊन, त्यांच्यातून भावी प्रशिक्षक तयार करून आपत्ती निवारणाचे महत्त्व पटवून देणे व संबंधित प्रशिक्षण संपूर्ण देशात नागरिकांना मिळावे हा ह्या विशेष प्रशिक्षणाचा मुख्य हेतू.

विविध उपक्रम:

१) बेसिक ट्रेनिंग कोर्स –

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची कारणे व त्यातून सुटका हे सर्व ह्या कोर्समध्ये शिकवले जाते. बचाव करण्यासाठी विविध बचाव पद्धती, अग्निशमन यंत्रे, अग्निशमनाचे प्रकार, बँडेजेस, गाठी (knots), उचलपद्धती (स्ट्रेचर्स) सी.पी.आर. (कार्डियो पल्मनरी रिससिटेशन म्हणजेच हृद्य फुफ्फुसक्रियेचे पुनरुज्जीवन) इ. चे शिक्षण आवश्यक असते. प्रात्यक्षिक व सराव सत्रांचेही आयोजन आवश्यक आहे.

 • हे प्रशिक्षण विनामूल्य असते.
 • पहिल्या प्रशिक्षित बॅचमधील स्वयंसेवकांनी पुढील बॅचेसला प्रशिक्षण दिले व यातूनच अनेक ठिकाणी अनेक ट्रेनर्स तयार करून ते आता विविध ठिकाणी ह्या कोर्सचे आयोजन करतात व त्यातून प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक DMV’s (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर्स) तयार होतात. आतापर्यंतची DMV’s ची संख्या ७०,८५५ आहे.

२) कॉर्पोरेट सेक्टर ट्रेनिंग:

धुळे, नंदुरबार, येथील पोलिस महानिरिक्षकांनी अशी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यास आमंत्रित केले. त्यानुसार दि. १० फेब्रुवारी २००८ रोजी पोलीस महानिरिक्षक, उपमहानिरिक्षक, अन्य ३८ अधिकारी व १५० पोलीस कार्यशाळेस उपस्थित होते.

 • त्या विभागातील आणखी एक कार्यशाळा ३ मे २००८ रोजी आयोजित केली होती. मानसिक तणावांचे नियोजनही प्रशिक्षणाबरोबर आवश्यक म्हणून नामस्मरण, तसेच श्रद्धा, सबुरी याबाबत चर्चा ह्या कार्यशाळेत केली गेली. या विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिस कर्मचार्‍यांनीही या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

 • नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांनी नंदुरबार व शहादा येथेही प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले.

 • बी.ई.एस.टी चे कर्मचारी तसेच नेव्हल डॉकयार्ड यांच्यासाठीसुद्धा प्रशिक्षण आयोजित केले होते.

३) विविध सार्वजनिक उत्सवांदरम्यान गर्दीचे नियंत्रण:

१) मांढरादेवी वार्षिक जत्रा – २००५ मध्ये सातार्‍याच्या मांढरादेवीच्या वार्षिक जत्रेत चेंगराचेंगरी, जवळपास २५० लोकांचे प्राण गेले व ह्या घटनेनंतर गर्दीचे नियोजन करण्यासाठी डीएमव्हीची सहाय्यता मागण्यात आली. त्या पुढिल वर्षापासून सेवा सुरू झाली. स्त्री व पुरुष डीएमव्ही सहाय्यार्थ मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

२) ज्योतिबाचा वार्षिकोत्सव, कुंभमेळा, माऊंटमेरी जत्रा (वांद्रे), सज्जनगड दासनवमीच्या दिवशी भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण व वैद्यकीय मदत.

३) सिद्धीविनायक प्रभादेवी मुंबई, गणपतीपुळे (रत्नागिरी), सिद्धटेक (दौंड, पुणे) आणि सप्तश्रृंगी (वणी, नाशिक) येथे चैत्र व अश्‍विन नवरात्रीत सेवा, महालक्ष्मी मुंबई मंदिरात नवरात्रीत गर्दीवर नियंत्रण.

लाईन  कंट्रोल, पाणी प्यायला देणे, वैद्यकिय मदत अशाप्रकारे पोलीस दल व स्थानिक प्रशासनास मदत

४) श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला विविध शिवमंदिरात जत्रेत मुंबई व बाहेरगावी गर्दीवर नियंत्रण (बाबुलनाथ, महाबळेश्‍वरमंदिर, अंबरनाथ मंदिर अशा ११ ठिकाणी)

५) दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई, पुणे इ. ठिकाणी गर्दीवर नियंत्रण, मिरवणूक पूर्ण होईपर्यंत सेवा.

६) जिजामाता उद्यान येथे आता मे २०१७ च्या सुट्टीच्या कालावधीत पेंग्विन पक्षी पहाण्यासाठी अलोट गर्दी होती. त्यावर नियंत्रण ठेवणे हे काम अनेक डीएमव्हीच्या मदतीने प्रशासनाने केले.

७) इन्कम टॅक्स रिटर्न फाईलसाठी काही वर्षांपूर्वी गर्दीचे नियंत्रण करायला शासनाला मदत केली होती.

८) औरंगाबाद पैठण येथे नाथषष्ठीला गर्दीचे नियंत्रण.

९) आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे लाइन कंट्रोलची सेवा.

अशाप्रकारे उत्सवांची सेवा प्रत्येकवर्षी दिली जाते आणि यापुढेही अशी सेवा एएडीएम देत राहिल हे नक्की.

४) श्री गणेशमूर्ती पुनर्विसर्जन:

विसर्जनानंतर भग्न अवस्थेत बर्‍याच मूर्ती परत वाहून किनार्‍यावर येतात, त्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ ह्या संलग्नसंस्थेच्या सहाय्याने डीएमव्ही ह्या मूर्ती बोटीतून खोल समुद्रात नेऊन पुनर्विसर्जन करतात.

५) व्हर्मिकल्चर (गांडूळखत):

संपूर्ण महाराष्ट्रात आजमितीपर्यंत जवळपास ५०० टन कचर्‍याचे सुमारे ११० टन गांडुळखतात रुपांतर केले गेले, गरीब आणी गरजू शेतकर्‍यांना विनामूल्य वितरण करण्यात आले.

* मध्य रेल्वे कार्यालय (मुंबई), सेबी (वांद्रे), नेवल डॉकयार्ड (कुलाबा), एफ. डी. सी (जोगेश्‍वरी), पोचखानवाला बँकर्स ट्रेनिंग कॉलेज (सांताक्रूझ), डी.आय.एल.लि. (ठाणे), भवन्स महाविद्यालय (अंधेरी), आय.ई.एस शाळा (मरोळ), मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डसच्या शाळा, या सर्व ठिकाणी एएडीएमकडून गांडूळखताबाबत प्रशिक्षण आयोजित केले गेले.

) वृक्षारोपण:

इतर संलग्न संस्थांच्या मदतीने DMV’s हा प्रकल्प पण ठिकठिकाणी राबवित असतात. गरज पडेल तिथे मदत करतच असतात. महाराष्ट्रात आतापर्यंत एएडीएम च्या मदतीने ६०,००० वृक्षांची लागवड करण्यात आली.

) परेड:

अत्यंत शिस्तबद्ध स्फूर्तीदायक अजून एक उपक्रम म्हणजे परेड. मुंबईतील १८ ठिकाणी सुमारे २२० DMV’s परेडमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्रातील आणखी ६० केंद्रामधून ४८० DMV’s परेडमध्ये सहभागी.

८) पल्स पोलिओ लसीकरण:

शासन मोहिमेअंतर्गत ६ वर्षांखालील मुलांचे ठराविक कालावधीपर्यंत दर महिन्यातून एकदा लसीकरण करण्यात येते. यासाठी महानगरपालिकेने एएडीएम चे कार्यकर्ते आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. त्याप्रमाणे DMV’s ती सेवा देतात. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई इ. ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग.

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन च्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही एएडीएम चे डीएमव्ही सेवा देतात. हे उपक्रम म्हणजे-

 • अन्नपूर्णा महाप्रसादम योजना – ग्रामीण भागातील विद्यार्थी, कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरातील गावकरी यांना भोजन
 • इको फ्रेंडली गणेशमूर्ती – रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती.
 • रक्तदान शिबीर
 • अनिरुद्धाज बँक फॉर ब्लाईंडस – ऑडिओ कॅसेट्स व सीडी तयार करून विषय समजावून देणे व सीडी चे विनामूल्य वाटप
 • चरखा योजना – सुताच्या लड्यांपासून युनिफॉर्म
 • बारामास शेती पाणी चारा योजना
 • रद्दी योजना
 • जुने ते सोने योजना – कपडे, भांडी, पुस्तके, वह्या, खेळणी वगैरे वस्तू पुन्हा वापरण्यासारख्या असल्यास गरजू कुटुंबाला देणे.
 • मायेची ऊब – गोधड्या बनवून गरीब, वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी, स्त्रिया यांना देणे
 • विद्या-प्रकाश योजना – मेणबत्या व काडेपेट्या पुरवून वीजेची सोय.

अशा अनेक सेवांमध्ये DMV’s भाग घेतात.

९) ए.डी.एम. चे पुस्तक:

द टेक्स्टबुक ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे अ‍ॅकॅडमीने प्रकाशित केलेले पुस्तक तर सर्वांगसुंदर मार्गदर्शक पुस्तक आहे. आपत्ती म्हणजे काय? त्याची कारणे कोणती? त्यावर उपाययोजना कोणत्या? याचे मार्गदर्शन करणारे आहे. हे पुस्तक प्रथम इंग्रजीमधून एप्रिल २००२ मध्ये प्रकाशित झाले. जुलै २००२ मध्ये मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित झाले. इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती डिसेंबर २००२ मध्ये व तिसरी आवृत्ती जुलै २००७ मध्ये प्रकाशित झाली. मराठी पुस्तकाची दुसरी आवृत्ती नोव्हे. २००८ मध्ये तिसरी आवृत्ती मार्च २००९ मध्ये व चौथी आवृत्ती जुलै २०१२ मध्ये प्रकाशित झाली.

एएडीएम चे आगामी उपक्रम:

काही उपक्रम विचाराधीन आहेत. ते पुढीलप्रमाणे –

१) प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण व कायमस्वरूपी उपाय

२) कुष्ठरोग व उपायांचे उचित मार्गदर्शन

३) एच.आय.व्ही, एड्सबाबत उचित माहिती व रोग टाळण्याचे उपाय

४) कारखान्यांमधील आपत्तींचा अभ्यास

अशाप्रकारे आजच्या या कलियुगात जग एकिकडे भांडणे, राजकिय अस्थिरता, वैचारीक व धार्मिक मतभेद, वाढत्या प्रमाणातील नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती या सगळ्यांना तोंड देत असतात. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली एएडीएम सगळ्याला समर्थपणे तोंड कसे द्यायचे हे आव्हान समर्थपणे पेलत आहे. यातच एएडीएम चे यश सामावले आहे हे निश्‍चित!

एएडीएमसाठी संपर्काचा व अधिक माहीतीकरिता पत्ता पुढीलप्रमाणे:

‘अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’

3, कृष्ण निवास, पहिला मजला

सखाराम कीर मार्ग, ऑफ एल.‍जे.रोड

शिवाजी पार्क माटुंगा (प)

मुंबई – ४०००१६

फोन नं (०२२) २४३०१०१०, (०२२) २४३०२४२४

ईमेल : aniruddhasadm@gmail.com

वेबसाईट : www.aniruddhasadm.com

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com