तदात्मानं सृजाम्यहम्

aniruddha_the_unstoppable

तदात्मानं सृजाम्यहम् पुस्तकाबद्दल –

डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी लिहलेले हे “तदात्मानं सृजाम्यहम्” पुस्तक १९९७ च्या रामनवमीला प्रकाशित केले गेले होते. ह्या पुस्तकामध्ये खर्‍या अर्थाने एका सद्‌गुरुचे अंतरंग उलगडले आहे. खरंतर सद्‌गुरुच्या मनात काय चालते याचा ठाव कुणालाच लागणे शक्य नाही. पण तरीही आपल्या भक्ताबद्द्ल सद्‌गुरुच्या मनात जे काही दाटून येतं ते सर्वकाही या पुस्तकात बापूंनी मांडलेले आहे. भक्ताच्या भोळ्या भाबड्या काही वेळेस तीक्ष्ण भासणार्‍या प्रश्नांना सद्‌गुररुंनी अतिशय प्रेमळपणे उत्तर दिले आहे.

तदात्मानं सृजाम्यहम् पुस्तकात बापू म्हणतात –

किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.

तदात्मानं सृजाम्यहम्…सद्‌गुरुवाणी
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥

म्हणजेच, हे भारता! जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा मी (परमात्मा) साकार रुपात सगळ्यांसमोर प्रगट होतो.
याच अर्थाने जेव्हा जेव्हा भक्ताच्या मनात विचारांचे महाभारत सुरु होते, भावनांचा कल्लोळ सुरु होतो आणि त्याच्या मूळ स्थितीपासून तो दुरावत असतो, तेव्हा त्या भक्तासाठी साकार रुपात प्रकट झालेले पुस्तक म्हणजे “तदात्मानं सृजाम्यहम्…” हा आवाज आहे सद्‌गुरुचा. फक्त आणि फक्त त्याच्या भक्तासाठी…

तदात्मानं सृजाम्यहम्….अमृतानुभव

या पुस्तकाच्या भाषाशैलीबद्दल काही म्हणणे उचित ठरणार नाही. कारण थेट सद्‌गुरुंच्या अंत:करणातून प्रकट झालेले हे भाव आहेत. सद्‌गुरुला शोधण्याचा मार्ग हा खुद्द सद्‌गुरुनेच दाखविलेला आहे. अगदी आयुष्यात प्रत्येक पातळीवर आवश्यक असणारे हे मार्गदर्शन आहे. माझं मन सद्‌गुरुचरणी जोडण्याची ही सुसंधी आहे. हे पुस्तक म्हणजे मैत्री आहे कधीही दगा न देणार्‍या मित्राची. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक अमृतानुभव आहे.

तदात्मानं सृजाम्यहम् पुस्तक कोठे मिळेल –

सदर पुस्तक प्रिंट स्वरुपात व ई बुक स्वरुपात ई-शॉप आंजनेयावर मिळू शकेल. त्याची लिंक पुढील प्रमाणे
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=TDMMAR
प्रकाशक : ईशा पश्यंती प्रकाशन