आवाहनं न जानामी
आवाहनं न जानामी पुस्तकाबद्दल –
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी लिहलेले हे “आवाहनं न जानामी” पुस्तक १९९७ च्या रामनवमीला प्रकाशित केले गेले होते. साध्या सोप्या सरळ भाषेत एका भक्ताच्या अंतरंगातील घालमेल, आर्तसाद यामध्ये मांडली आहे. एका सच्च्या भक्ताचा त्याच्या सद्गुरुशी असलेला संवाद ह्या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे. जो अगदी प्रत्येकाच्या काळजाला भिडतो. आयुष्यात आपल्याला पडणारे अनेक प्रश्न बापूंनी या पुस्तकात उपस्थित केले आहेत. एका साध्या भक्ताच्या भूमिकेत येऊन बापूंनी हे पुस्तक लिहिलेले आहे.
आवाहनं न जानामी पुस्तकाबद्दल बापू म्हणतात –
हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्या भक्ताचा, एकांती राहणार्या, तसेच लोकांती राहून साधना करणार्या भक्ताचा. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरुन आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.
आवाहनं न जानामि…ही एक क्षमा प्रार्थना –
कर्मकांड मला काही माहिती नाही. मला तुझी पूजा-अर्चनाही करता येत नाही. मी तुझे नीट आवाहन देखील करू शकत नाही. त्यासाठी तू मला क्षमा कर. मी फक्त तुझ्यावर प्रेम करू शकतो आणि हे माझं प्रेम आणि तोडकेमोडके प्रयास तू गोड मानून घे. मी तुला घातलेल्या अंतरीच्या हाकेला प्रतिसाद देऊन मला कृतकृत्य कर….
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि।।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि।
यत्पूजितं मया देवि परिपूर्णं तदस्तु मे।।
ही प्रार्थना म्हणजे हे पुस्तक… कर्मकांड आणि कोणत्याही भौतिक कृतीच्या पलिकडे गेलेला आर्त भाव म्हणजे हे पुस्तक आहे.
आवाहनं न जानामी पुस्तकाची भाषाशैली –
हे पुस्तक बापूंनी त्यांच्या खास भाषाशैलीत लिहलेले आहे. कळीचे फूल होताना ते जसं एकएक पाकळी करत हळुवार उलगडत जाते, त्याप्रमाणे भक्ताचे मन, मनातील गोंधळ, मनातील भगवंताविषयी प्रेम हळूहळू उलगडले आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून वाचक या पुस्तकात गुंतत जातो. बापूंच्या शब्दांमध्ये आपला स्वर मिसळून ह्या पुस्तकातील आर्त हाक कधी त्या वाचकाची होते हे कळतच नाही. एका जवळच्या मित्राशी असतो तसा संवाद ह्या पुस्तकात बापूंनी सद्गुरुशी केलेला आहे. त्यामुळे आपल्यालाही कळते की सद्गुरुंशी नेमका कसा संवाद साधावा.
आवाहनं न जानामी पुस्तक कोठे मिळेल –
सदर पुस्तक प्रिंट स्वरुपात व ई बुक स्वरुपात ई-शॉप आंजनेयावर मिळू शकेल. त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे –
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=ANJMDL
प्रकाशक : ईशा पश्यंती प्रकाशन