मुळशी (पुणे) येथे कपडे वाटप
‘जुने ते सोने‘ प्रकल्प
श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनद्वारे ‘जुने ते सोने’ या प्रकल्पाअंतर्गत श्रद्धावानांकडुन जुने पण चांगल्या अवस्थेतील वापरण्याजोगे कपडे गोळा केले जातात व गरजूंना वितरीत केले जातात. सदगुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात, “वस्तू जुनी असली तरीदेखील जर तिचा यथोचित वापर झाला, तर त्या वस्तूला सोन्याचे महत्त्व येते.”
अपडेटस्
अलिकडेच औंध केंद्रातर्फे मुळशी – पुणे येथे ३१ गरजू कुटुंबांना ’जुने ते सोने’ या योजनेअंतर्गत कपडे वितरीत केले गेले.