AniruddhaFoundation-Shree Ram Navami

श्रीरामनवमीचा उत्सव –

चैत्र शुध नवमीस माध्यान्ह्समयी श्रीरामांचा जन्म झाला. सन १९९६ पासून प्रत्येकवर्षी श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे श्रीरामनवमी उत्सव अत्यंत आनंदात, उत्साहात व संपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्तिमय उपक्रमात श्रद्धावानांना सहभाग घेता येतो.

श्रीरामनवमीचे विविध उपक्रम –

१) श्रीसाईराम सहस्त्र यज्ञ –

सकाळी श्री साईराम सहस्त्र सुरू होते. ‘साईनिवास’ येथून दीपशिखा उत्सवस्थळापर्यंत आणली जाते. पवित्र ‘आपत्ती निवारक समिधा’ ह्या यज्ञामध्ये श्रद्धावानांना अर्पण करता येतात व त्यावेळेला तारकमंत्राचे पठण चालू असते.

२) श्रीरामवरदायिनी महिषासुरमर्दिनी पूजन –

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या मातृवात्सल्यविंदानम्‌ ग्रंथात श्रीराम – रावण युद्धाचे अतिशय उचित आणि समग्र वर्णन केले आहे. मध्यरात्रीच्या समयास रणांगणावर ती अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी प्रकटली व तिने ‘श्रीरामास विजय प्राप्त होईल’ हा आशिर्वाद दिला. अर्थातच श्रीराम विजयी झाले; तेव्हा ती आदिमाता त्रिपुराम्बा स्वता:हून महिषासुरमर्दिनी स्वरुपात प्रकटली व तिने ‘रामो राजमणी सदा विजयते! असा वर देऊन अंतर्धान पावली. ह्या वरामुळे ‘रामनाम’ तारकमंत्र बनले व महिषासुरमर्दिनीच्या ह्या अवतारास ‘रामवरदायिनी दुर्गा’ हे नामाभिधान प्राप्त झाले. म्हणूनच या रामवरदायिनी आदिमाता महिषासुरमर्दिनीचे पूजन रामनवमी उत्सवामध्ये केले जाते.

३) रेणुकामाता पूजन –

रामनवमी उत्सवाच्या दिवशी उत्सवस्थळी रेणुकामातेच्या तांदळ्याच्या रुपातील रेणुकामातेचं आगमन होताच मातेचा जयजयकार केला जातो. रेणुकामातेचे औक्षण करून मंगलवाद्यांच्या गजरात उत्साहाने स्वागत केल जाते. तिचे षोडशोपचार पूजन करून अभिषेक केला जातो. हा अभिषेक पहाणे हा मोठा रमणिय सोहळा असतो. स्वत: बापू रेणुकामातेची आरती करतात. तिच्या दर्शनाचा लाभ आम्ही घ्यायलाच हवा आणि पुढे तिला असंही मागणं प्रत्येकाने मागायला हवं की ‘‘हे माते, हे मातेश्‍वरी रेणुका, तू आमच्या जीवनविश्‍वात ह्या परमात्म्याला प्रकटव!’’

४) रामजन्म –

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध, नंदाई, सुचितदादा यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. श्रीरामाला ज्या पाळण्यात ठेवण्यात येते तो पाळणा खुद्द बापूंसाठी वापरला गेला होता हे वैशिष्ट्य! ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ च्या गजरात आणि रामाच्या पाळण्याचे गीत गाण्यात सर्व स्त्री पुरुष श्रद्धावान अगदी बापू-आई-दादा सुद्धा सहभागी होतात आणि ह्या कार्यक्रमाचा उत्साह अगदी शिगेला पोहोचतो. रामजन्मामे सर्व धन्य धन्य होतात त्यानंतर रामरायाचे ‘श्रीराम’ म्हणून बारसे होते आणि ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून वाटला जातो. हा पाळणा व त्यातील बालकाची (श्रीरामाची) प्रतिमा स्टेजवर दर्शनासाठी ठेवलेली असते.

५) श्रीसाई सत्पूजन –

रुद्राक्षमाला, त्रिशुल आणि शाळीग्राम ह्या तीन गोष्टी हेमाडपंत (साईसच्चरित्रकार) साईसच्चरितात वर्णन केल्याप्रमाणे श्रीसाईनाथांनी यांना दिल्या त्या साईनिवासमधून पूजनस्थळी आणून त्याच पूजन केलं जात व श्रीघोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण श्रद्धावान दिवसभर करत असतात.

६) श्रीसाईनाथ महिम्नाभिषेक –

श्रीसाईनाथांची मूर्ती जिला श्रीसाईसदाशिव मूर्ती असे म्हणतात. तिच्यावर ‘श्रीसाईनाथ महिम्नाभिषेक’ केला जातो.
 
७) तळीभरण –

सद्गुरु अनिरुद्ध बापू, नंदामाता आणि सुचितदादा यांनी ह्या तळीभरणाला सुरुवात केली आहे. वाद्यांच्या गजरात “रक्ष-रक्ष-साईनाथ, श्री साईराम” जप केला जातो. आनंदाने श्रद्धावान ह्या तळीभरणात सहभागी होतात.

 

८) अखंड जप –

ॐ रामाय रामभद्राय रामचंद्राय नम:। हा जप दिवसभर अखंडपणे चालू असतो. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू, नंदाई व सुचितदादा यांच्या उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम चालू असतो. जे पठणाला असतात ते एकमेकांच्या कपाळावर काळा बुक्का लावतात व नमस्कार करून एकमेकांना सदिच्छा देतात.

९) श्रीसाईसच्चरित अध्ययनकक्ष –

रामनवमी उत्सवस्थळी एक वेगळा कक्ष आद्यपिपादादांच्या नावाने असतो. ह्या कक्षामध्ये श्रीसाईसच्चरिताचे अखंड वाचन चालू असते. आद्यपिपादादा म्हणजे ‘श्रीसुरेशचंद्र पांडुरंग वैद्य’ हे साईनाथांचे निस्सीम भक्त आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रेष्ठ अनुयायी होते. प्रत्येक वर्षात रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्णाष्टमी आणि दसरा ह्या चार पवित्र दिवशी ते श्रीसाईसच्चरिताचे पारायण करत असत असा त्यांचा 60 वर्षाचा नेम होता. ह्या चारही दिवसांच्या दुपारच्या वेळेपर्यंत त्यांचे आठवडाभराचे श्रीसाईसच्चरिताचे पारायण पूर्ण होत असे. त्यांच्या पूर्ण आयुष्यभराचे साईनाथांचे केलेले हे अभिसंवाहन होते आणि खरोखर साईचरित्राच्या 11 व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ‘अखंड राम लाधाल! ही पंक्ति त्यांच्या आयुष्यात सत्यात उतरली होती. प्रत्येक भक्त जो ह्या कक्षामध्ये प्रवेश करतो तो आद्यपिपांसारखा भक्त बनण्याचा निश्‍चय करूनच साईसचरित्राच्या अध्यायाचे पठण चालू करतो.

१०) श्रीअनिरुद्ध हंडी प्रसाद –

ह्या शुभदिवशी हंडीप्रसाद शिजवताना स्वत: खुद्द परमपूज्य बापूही सहभाग घेतात. म्हणूनच प्रत्येक भक्ताला मिळणारा प्रसाद हा अर्थातच बापूंच्या शुभस्पर्शाने आणि आशिर्वादाने परिपूर्ण असतो. हा प्रसाद तयार करताना त्यासाठी लागणारे विविध साहित्य स्वत: ढवळतात. हीच त्या पवित्र प्रसादामागची पवित्र गोष्ट आहे. प्रत्येकाला श्रीसाईसच्चरित्रातील साईंच्या हंडीप्रसादाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अर्थातच ह्या प्रसादाची चव अद्वितीय, अवर्णनीय अशीच असते हे नक्की! हा प्रसाद ग्रहण केल्याशिवाय कुणीही उत्सव स्थळ सोडत नाही. रात्री श्रीसाईराम सहस्त्र यज्ञाची पूर्तता आणि महाआरती झाल्यावर रामनवमी उत्सवाची सांगता होते .

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com