विद्याप्रकाश योजनेची आवश्यकता

 

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली तरी आज अनेक भागात विजेची समस्या गंभीर आहे. काही खेड्यांकडे अथवा शहारांच्या बाहेर वीज आहे पण त्यांना १० तासांहून अधिक काळ भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात २४ तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारी पातळीवर प्रयास सुरु आहेत. परंतु विजेअभावी सगळ्यात जास्त नुकसान होते ते शाळेतील विद्यार्थांचे. घरापासून दूर असणार्‍या शाळांमधून ये-जा करण्यातच या मुलांचा जास्त वेळ जातो. त्यामुळे ही मुले सूर्यास्ताच्या वेळेस घरी पोहोचतात. मग सूर्यास्तानंतर वीज नसताना ही मुले गृहपाठ करू शकत नाहीत. अभ्यास न झाल्याने हे विद्यार्थ्यी मागे पडत जातात. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पर्यायाने सर्वांगीण प्रगतीला खीळ बसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी साधा, सरळ आणि प्रभावी असा मार्ग काढणे आवश्यक आहे. या विचारातूनच जन्म झाला तो “विद्याप्रकाश” योजनेचा.

विद्याप्रकाश योजनेची संकल्पना

सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी विद्याप्रकाश योजना हे कलम आपल्या १३ कलमी योजनांमध्ये २००२ मध्ये जाहीर केले. विजेची उपलब्धी नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची समस्या सोडविण्यासाठी विद्याप्रकाश योजनेअंतर्गत मेणबत्त्या आणि काडेपेटी या गोष्टींचे श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशनतर्फे वाटप करण्यात येते. या मेणबत्तीच्या प्रकाशात ही मुले वीज नसतानाही अभ्यास करु शकतात.

विद्याप्रकाश योजनेची अध्यात्मिक बाजू

या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मेणबत्त्या भेट देणे म्हणजे प्रकाशाचा आणि जीवनाचा मूळ स्त्रोत असणार्‍या श्रीरामाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणे होय. या विद्यार्थ्यांना जीवनात विद्येचा प्रकाश आणल्याने श्रद्धावानांचे जीवन सुद्धा प्रकाशमान होते.

विद्याप्रकाश योजनेची कार्यवाही

श्रद्धावान श्रीहरिगुरुग्राम अथवा उपासना केंद्रांवर मेणबत्त्या व काडेपेट्यांचे दान करतात. अनेकजण तर आपल्या जीवनातील विशेष प्रसंगी उदाहरणार्थ परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर मेणबत्ती व काडेपेट्यांचे दान करतात. अशा दान स्वरुपात आलेल्या या मेणबत्त्या आणि काडेपेट्यांचे दुर्गम गावातील गरजू विद्यार्थांना फौंडेशनतर्फे वाटप केले जाते.

या विद्याप्रकाश योजनेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागत नाही. वीज नसतानाही या मेणबत्त्यांच्या प्रकाशात ही मुले अभ्यास करु शकतात.

या मेणबत्त्यांचे वाटप धुळे, नांदेड येथील गावांमध्ये होत होते. तसेच फौंडेशन व संलग्न संस्थांतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या शहापूर, कोल्हापूर आणि विरार येथील वैद्यकीय शिबिरातही हे वाटप होत असते. या मेणबत्त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना वर्षभर करण्यात येते.

विद्याप्रकाश योजनेचे फलित

विद्याप्रकाश योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. विद्यार्थांची चांगली प्रगती घडून आलेली आहे. एक सक्षम व साक्षर भारत घडविण्यात विद्या प्रकाश योजना आपले छोटेसे योगदान देत आहे.

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com