Aniruddha Foundation-Ramrasayan Grantha

रामरसायन ग्रंथ काय आहे  –

परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूनीं ‘रामायण’ सारख्या महान पवित्र ग्रंथातील सार श्रद्धावानांकरिता सहज, सुंदर शुद्ध मराठी भाषेमध्ये व सचित्र असे ‘रामरसायन’ ग्रंथाच्या स्वरूपात खुले करून दिले.

ह्यात रामजन्मापासून अयोध्येत रामराज्य स्थापन होईपर्यंतच्या अतिशय सुंदर घटना श्रद्धावानांना वाचावयास मिळतात.

रामरसायन म्हणजे केवळ प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्रच नाही तर आपले जीवन चैतन्याने, जिवंतपणाने आणि सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी असणारी एक आचारसहिंताच आहे. रसायन म्हणजे एक असे औषधी सार जे आपल्या आयुष्याला सतत एक नवचैतन्य प्रदान करत राहते.

सर्वोच्च असणार्‍या श्रीरामांची निस्वार्थ सेवा हेच प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील परमोच्च शिखर आहे आणि हाच रामरसायनाचा खरा गाभा (आत्मा) आहे.

आयुष्यात घडणार्‍या रामायणाची ओळख –

रामायणातील विविध पात्रे कशा प्रकारे आपल्या जीवनातले विविध पैलु दर्शवितात हे हा पवित्र ग्रंथ आम्हाला समजावून सांगतो.

रावण हा प्रतीक आहे द्रुष्प्रारब्धाचा व तामसी अहंकाराचा ज्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भय उत्पन्न होते. दुष्प्रारब्धरुपी रावण आपल्या जीवनातून शांती-तृप्तीरुपी जानकीला पुरुषार्थरुपी रामापासून वेगळे करतो.

रावणाचा नाश करून आपल्या जीवनात रामराज्य कसे आणावे ह्याचे मार्गदर्शन ह्या ग्रंथात केले आहे.

रामरसायन कुठे मिळेल?

हा पवित्र ग्रंथ श्रीगुरुक्षेत्रम्‌, साईनिवास, गुरुकुल जुईनगर तसेच श्रीहरिगुरुग्राम (प्रवचन स्थळी) येथे पितृवचनाच्या वेळेस उपलब्ध असतो. याशिवाय पुढिल लिंक वर क्लिक करुनही तुम्ही रामरसायन घेऊ शकता – https://www.e-aanjaneya.com/publications.faces?categoryCode=ALL&publicationGrpCode=ALL&authName=ALL&publishName=ALL&SearchCriteria=ramrasayan

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com