general-knowledge-bank1

संकल्पना

जगभरात विविध क्षेत्रात घडणार्‍या विविध घडामोडींबाबत वेळच्यावेळी अद्ययावत राहता यावे व याची सवय लागावी यासाठी अशा बॅंकेची संकल्पना सदगुरु अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १३ कलमीच्या योजनांमधून मांडली. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आले आहे. त्यामुळे बदलत्या जगाशी जोडलेले न राहिल्यास, काळाच्या आणि तंत्रज्ञानाच्या वेगाबरोबर न धावल्यास निश्चितच आपण मागे पडू शकतो. तसेच आपल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांची देखील माहिती असणे आजच्या युगात खूप महत्त्वाचे मानले जाते. यासाठीच जनरल नॉलेजचे महत्व सध्याच्या युगात सर्वांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.

जनरल नॉलेज बॅंकेची कार्यवाही

 . सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे पितृवचन

सदगुरु अनिरुद्ध बापू आपल्या पितृवचनातून विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून देत असतात. अनिरुध्द बापूंनी त्यांच्या पितृवचनातून अनेक वैश्विक रहस्य उलगडवून, सोपी करुन सांगितलेली आहेत. याची काही उदाहरणे म्हण्जे स्वॉर्म इंटेलिजन्स्‌ सारख्या उच्चतम विज्ञानाची ओळख बापूंनी त्यांच्या पितृवचनातून करुन दिली आहे. तसेच इतिहासच्या पानांमध्ये हरविलेले श्रेष्ठतम्‌ वैज्ञानिक डॉ. निकोला टेसला यांची ओळख बापूंनी करुन दिली आहे. केमट्रेल्स, हार्प टेक्नॉलॉजी यासारख्या घातक तंत्रज्ञानाची माहिती, नॅनोटेक्नॉलॉजीची माहिती, स्वतःचे आरोग्य अशा अनेकविध विषयांवर बापू पितृवचनात बोललेले आहेत.

अधिक माहिती साठी वाचा – अनिरुद्ध बापू प्रवचन आर्टीकल लिंक

. दैनिक प्रत्यक्ष

 या दैनिकामधून तर सामान्य ज्ञानाचा खजिना डॉ. अनिरुद्धांनी सर्वांसाठी खुला केलेला आहे. ते स्वतः या दैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत. या दैनिक प्रत्यक्षमधून आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये  अर्थशास्त्र, स्टॉक मार्केट, न्यायवैद्यकशास्त्र, प्रवास, वैद्यकशास्त्र, कायदा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पर्यावरण, ग्रामीण विकास असे अनेकविध विषय प्रत्यक्षमध्ये घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन बातम्या व सदर याव्य्तिरिक्त दैनिक प्रत्यक्षतर्फे दरवर्षी विशेषांक प्रसिध्द करण्यात येतात. हया दैनिक प्रत्यक्षच्या नियमित वाचनाने जगाबरोबर राहण्यास खूप मदत होते. अनेकांनी याचा फायदा उचललेला आहे.

अधिक माहिती साठी वाचा – दैनिक प्रत्यक्ष लिंक

. एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स

 प्रत्येक जण ई-जर्नल्सच्या मदतीने आपले जनरल नॉलेज वाढवू शकतो. दर तीन महिन्यांनी ८ विषयांवरील जर्नल्स प्रकाशित केली जातात. यामध्ये जनरल इंजिनिअरींग, चार्टर्ड अकाउंटन्सी, स्टॉक अ‍ॅण्ड शेअर मार्केट, प्रोफेशनल मेडिसिन्स, एमबीए, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स्‌ आणि हेल्थ अ‍ॅण्ड हेल्थ सर्विसेस इन्फॉर्मेशन या विषयांचा समावेश आहे.

अधिक माहिती साठी वाचा – एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स

. सेमिनार्स

अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घेण्याचीदेखील आपल्याला फुरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो तरी बापू कायमच वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी  जुगाड, नॅनोटेक्नोलॉजी, क्लाऊड कॉम्प्युटींग, सोशल मिडीया, स्वार्म इंटेलिजन्स, अटेंशन इकॉनॉमी, होलोग्राफी, डॉ. निकोला टेसला व इतर अनेक विषयांवर स्वत: सेमीनार्स घेतले व त्या सेमीनारपाठी होते बापूंचे अथक परिश्रम व अभ्यास. केवळ सामान्य ज्ञान वाढण्यासाठी नव्हे, तर हे सामान्य ज्ञान रोजच्या वापरात कसे येईल यावर बापूंचा अधिकतम भर असतो.

तात्पर्य

आधी केले आणि मग सांगितले या उक्तीने जनरल नॉलेज वाढविण्यासाठी बापू स्वतः प्रचंड मेहनत घेतात. त्याप्रमाणे प्रत्येकाला अशी मेहनत घेता यावी, याकरिता विविध मार्गातून आवश्यक ते सामान्य ज्ञान कसे उपलब्ध होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयासांचा फायदा उचलून प्रत्येकाने स्वतःची अशी जनरल नॉलेज बॅंक बनवावयास हवी, जेणेकरुन बदलत्या काळाच्या प्रवाहात आपण कधीच मागे पडणार नाही.

 

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com