exponent journals copy

संकल्पना –

६ मे २०१० रोजी “रामराज्य” ही संकल्पना मांडताना सदगुरु श्रीअनिरुद्धांनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, MD मेडिसिन, संधिवात तज्ज्ञ) द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्सची देखील संकल्पना मांडली. बापूंच्या संकल्पनेतील रामराज्यामध्ये द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रत्येकाची प्रत्यक्षात प्रगती व्हावी म्हणून हे जर्नल्स सुरु करण्यात आलेले आहेत.

एक्स्पोनंट जर्नल्स म्हणजे काय?

कुठल्याही क्षेत्रातील निपुण व्यक्तिस एक्स्पोनंट असे म्हटले जाते. “एक्सपोनंट” या नावाला साजेल असेच हे जर्नल्स आहेत. कारण प्रत्येक क्षेत्रातील नवीन, सखोल व सामान्य ज्ञान ह्या जर्नलमध्ये त्या त्या क्षेत्रातील निपुण व्यक्तींकडून मिळत आहे. जर्नल म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये अप टू डेट करणारे, विशेष आणि सामान्य ज्ञान देणारे नियतकालिक.

डॉ. अनिरुद्ध म्हणतात, या जर्नल्समुळे आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या अनेक अडचणींना सामोरे जातो, ते थांबेल. जे ज्ञान आम्हाला मिळणं आवश्यक आहे ते मिळायला लागेल. जर्नल्सच्या विषयांच्या क्षेत्रात जी मंडळी आहेत त्यांनी ह्या जर्नल्सचा वापर करावा. जर्नल्स म्हणजे काय? तर केवळ विचाराने नव्हे, तर थिअरी आणि प्रॅक्टीकल यांमध्येसुद्धा अप टू डेट ठेवणारी आणि एक्स्पोनंट ह्या शब्दाचा अर्थ ह्याच्याशी जोडलेला आहे. अप टू डेट ठेवण्याशी, उन्नती करण्याशी, उन्नयन करण्याशी.

वर्षाला चार याप्रमाणे दर तीन महिन्यांनी एक्स्पोनंट जर्नल्स प्रकाशित होतात आणि मुख्य म्हणजे ते पूर्णपणे मोफत सगळ्यांना उपलब्ध आहेत. ह्या जर्नल्सची माहिती पुढील प्रमाणे –

१. शेअर्स अँड स्टॉक –

Index-Shares_Vol-4_issue-3-400x600

द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर शेअर्स अँड स्टॉक्स्‌ मधून सामान्य व्यक्तीला शेअर्स व स्टॉक्स्‌ची उत्कृष्ट माहिती देण्याचा प्रयास केलेला आहे.

______________________________________________________________________________________________________________________________________

२. हे‍ल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन –

HHS_vol4_iss2-400x600

आरोग्याशी निगडीत असणार्‍या अनेकविध गोष्टी, त्यांचे वैद्यकिय विश्लेषण सर्व सामान्यांना या जर्नलमार्फत जाणून घेता येईल. त्यानुसार काळजी घेऊन निर्भय आणि निर्मळ असा जगण्याचा आनंद लुटण्यासाठी हे हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन जर्नल उपयुक्त ठरेल.

______________________________________________________________________________________________________________________________________

 ३. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी –

Index-IT_Vol-5_issue-2-400x600

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या जलद प्रगतीमुळे एकच एक कौशल्य असणे हे कमी असणाऱ्या नोकऱ्या बघता पुरेसे नक्कीच नाही. म्हणूनच प्रत्येक माहिती तंत्रज्ञाला नवीन माहिती असणे खूप महत्वाचे आहे. द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या जर्नल मधून अद्ययावत माहिती, सुधारणा आणि प्रघात प्रत्येकापर्यंत पोहचतील.

______________________________________________________________________________________________________________________________________

४. जनरल इंजिनीअरिंग –

Index-GenEngineering_Vol-4_issue-4-1-1-400x600

केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सततच्या प्रगतीमुळे साध्या चाकापासून ते सॅटेलाईटपर्यंत प्रत्येक गोष्टीत नाविन्य येत आहे. ह्या प्रगतीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे काळाबरोबर चालण्यासाठी सर्वसामान्य व इंजिनीअरिंगचे विद्यार्थी अद्ययावत रहावेत ह्या हेतूने एक्सोपोनंट ग्रुप ऑफ जर्नल ऑफ जनरल इंजिनियरिंग सुरु करण्यात आले आहे.

______________________________________________________________________________________________________________________________________

५. इलेक्ट्रॉनिक्स –

Index-Electronics_Volume-4_issue-3-400x600

ग्रामीण युवक, सामान्य माणूस, उद्योजक, शैक्षणिक व संशोधन करणाऱ्या समुदायापर्यंत इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान पोहचावे हे एकमेव ध्येय द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. प्रत्येक जर्नल हे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवीन विकासाबद्दल तर माहिती देईलच पण त्याचबरोबर या विषयातील मुलभूत सिद्धांत ही मांडेल.

______________________________________________________________________________________________________________________________________

प्रोफेशनल मेडिसीन –

Index-ProfMedicine_Vol-4_issue-1-400x600

आरोग्यतज्ज्ञांना या क्षेत्रातही होणाऱ्या विकासाची पूर्ण माहिती मिळावी हाच उद्देश द एक्स्पोनंट जर्नल फॉर पप्रोफेशनल मेडिसीनचा आहे.

______________________________________________________________________________________________________________________________________

७. चार्टर्ड अकाउंटंट –

Index-CA_Vol-4_issue-1-400x600

द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर चार्टर्ड अकाउंटंट आपल्यासाठी व्यावहारिक ज्ञानाचा जणू खजिनाच उघड करत आहे. हे ई-जर्नल हे सी.ए. यांच्यासाठी तर आहेच पण त्याचबरोबर अशीच कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, सी.ए. च्या परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी देखील आहे.

______________________________________________________________________________________________________________________________________

८. एमबीए –

Index-MBA_Vol-4_issue-4-400x600-1-400x600

नदी ज्याप्रमाणे सागराला मिळताना तिच्याबरोबर येणारी प्रत्येक वस्तू बरोबर घेऊन जाते तसेच हे आपले द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स फॉर एमबीए चे जर्नल आहे. ह्या जर्नलमध्ये देखील अनेक अनुभवी व्यावसायिकांचे लेख मिळतील.

______________________________________________________________________________________________________________________________________

ह्या सर्व प्रकारच्या जर्नल्समधील लेखांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान समाविष्ट नसून व्यावहारिक ज्ञान देखील आहे. हे लेख लिहणाऱ्या व्यक्ती ह्या आपापल्या क्षेत्रातील अतिशय जाणकार व अनुभवी व्यक्ती आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून येणारे लेख हे ज्ञानाने व अनुभवाने रसपूर्ण असणार ह्यात काहीच वाद नाही. तरीही हे लेख संक्षिप्त व सोपे केले आहेत ज्यामुळे वाचकांना ते आवडतील व पटतील.

ह्या जर्नल्समधून वाचनाचा आनंद लुटूया! एक्स्पोनंट जर्नल्स बाबतीत अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटशी संपर्क साधा. http://www.exponentjournals.com

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com