AniruddhaFoundation-Dassera Utsav

दसर्‍याचे (विजयादशमी) महत्त्व – 

सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या २४ ऑक्टोबर २०१२ च्या प्रवचानात दसर्‍याचे खरे महत्त्व सांगितले. ते म्हणजे सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, सामर्थ्य वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो.

सकाळी सरस्वती देवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, सुसंगतपणा वाढवण्यासाठी. विजयादशमी म्हणजे दसरा ह्या अर्थाने खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे आणि म्हणूनच श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करते.

दसरा उत्सव कार्यक्रम

ह्या दिवशी सर्व श्रद्धावान भक्तमंडळी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘विजयोपासना’ करतात. ह्याच दिवशी श्रीअनिरुद्धांनी पुनर्जिवीत केलेल्या भारतीय प्राच्यविद्या प्रशिक्षणात अंतर्भूत असलेल्या आयुधांचे पूजन केले जाते. त्यात मुद्गल, तलवार, फरी, गदा, जोडकाठी, लठ्ठ, कठ ह्यांचा समावेश असतो.

दसरा (विजयादशमी) घरगुती पूजन

विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीच्या प्रतिमा काढण्यात येतात व त्यांचे प्रेमाने पूजन केले जाते. ही दोन्ही चित्रे एकमेकांच्या बाजूला काढायची असतात.

आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com