AniruddhaFoundation-Charkha

अन्न-वस्त्र-निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजांनी भारतात अनेक ठिकाणी समस्यांचं रूप धारण केलं आहे आणि पुन्हा एकदा अनेक  दुर्दैवी जीवांना गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढायला चरखा सज्ज झाला आहे.

उपक्रम सुरू करण्यापूर्वी संस्था त्या विभागाची पूर्ण पहाणी करूनच तेथील रहिवाशांच्या गरजा निश्चित करीत असते व त्यानुसारच तो उपक्रम राबविला जातो. अशा पहाणीत ह्या दुर्गम भागांतील शाळांत मुलांची उपस्थिती फारशी नसल्याचं आढळून आलं. जिथे अन्न-वस्त्र ह्याच समस्यां आ वासून उभ्या आहेत, तिथे साहजिकच शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

चरखा चालविताना होणार्‍या शारीरिक श्रमाचे रूपांतर शेवटी भक्तिमय सेवेत होते. श्रमातून तयार झालेल्या सूताचे रूपांतर शेवटी वस्त्र बनण्यात होते. कष्टकरी गरजू, निराधार देश बांधवांना या वस्त्रांची अत्यंत गरज आहे. आपण चरखा चालवून श्रमदान करतो व मुखाने नामस्मरण केल्याने ही सेवा परमेश्वर चरणी अर्पण करीत असतो.

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने चरखे वितरीत करण्याबरोबरच घरोघरी फिरणारे हे चरखे नियमित फिरते राहण्यासाठी चरख्यांची देखभाल करणार्‍या प्रशिक्षितांचा गटही तयार केलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, जळगांव आदि ठिकाणी श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत. मनात कसली खळबळ सुरू असेल आणि थोडा वेळ जरी चरखा चालवला, तरी मन शांत होतं, असं अनेक कार्यकर्ते सांगतात.

मी जेव्हा चरखा चालवितो तेव्हा मुखाने नामस्मरणही करत राहतो. मंत्राच्या बरोबरच सेवा घडत राहते. ह्यामुळे मी माझ्या जीवनात ज्या सूडचक्रात, दुष्टचक्रात अडकलो आहे, त्यामधून माझी हळूहळू सुटका होऊन मी माझा परमार्थ संसारात राहूनसुद्धा चांगल्या रितीने पार पाडू शकतो.

दरवर्षी चरख्यातून कातलेल्या सूतापासून ४५ ते ५० हजार मीटर कापड बनविलं जातं. त्यानंतर त्यापासून विविध साईझेसमधील युनिफॉर्म शिवण्यात येतात. यासाठी होणार्‍या खर्चाचा भार संस्था उचलते.

आज संस्थेच्या विद्यमाने कोल्हापूरजवळील आर्थिकदृष्ट्या मागास भागामध्ये २००४ सालापासून वैद्यकीय व आरोग्य शिबिराचं दरवर्षी आयोजन केलं जातं. ह्यामध्ये हजारो श्रद्धावानांनी आपल्या मेहनतीने चरखे चालवून तयार केलेल्या युनिफॉर्म्सचे दोन-दोन सेट्स ह्या विद्यार्थ्यांना दरवर्षी देण्यात येतात.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात चरख्याने इतिहास घडवला होता. ह्याच चरख्याच्या सूताने अवघा भारतीय एकसंध, घट्ट बांधला गेला होता. आता पुन्हा एकदा ह्या चरखा योजनेद्वारे भारताचा नवा वैभवशाली इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आम्हाला प्राप्त झाली आहे, ती का सोडा?

 

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com