तिसरे महायुद्ध पुस्तक

AniruddhaFoundation-The Third World War

‘शांतीचा बुरखा पांघरून तिसर्‍या महायुद्धाची डाकीण दार ठोठावत आहे’, हे वाक्य कोणत्याही चित्रपटातील वा नाटकातील डायलॉग नव्हे, तर आजच्या जगातील सद्यस्थितीचे वास्तववादी भाष्य आहे.

११ सप्टेंबर २००१ मधील अमेरीकेवरील हल्ला असो वा २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील हल्ला असो, संपूर्ण जगाने हे मान्य केले की दहशतवाद ही अलीकडच्या काळात एक भयाण व गंभीर समस्या बनली आहे.

पूर्वीच्या काळात युद्ध हे फक्त सैन्य व युद्धभूमी यापर्यंतच मर्यादित होते. मात्र आज ट्रेन, टॅक्सी, स्टेशन, दुकाने, कुठेही होणारे बॉम्बस्फोट, जैविक-रासायनिक हल्ले यामुळे युद्ध सामान्य माणसांच्या घरापर्यंत येऊन ठेपले आहे. मात्र एक सत्य आपल्याला स्वीकारावेच लागते की युद्धाचे परिणाम मात्र १००% सामान्य जनतेलाच भोगायचे असतात व पेलायचेही असतात.

म्हणूनच ह्या आक्रमक व हिंसक काळाला सामोरे जाण्यासाठी सामान्य माणसांना सामान्य भाषेत समजावे लागते व काळाची गरज ओळखून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी एम.डी. ह्रुमॅटॉलॉजिस्ट व दैनिक “प्रत्यक्ष” कार्यकारी संपादक यांनी स्वत: सन २००५ मध्ये ‘तिसरे महायुद्ध’ ह्या विषयावर लेखमाला लिहिली. पुढे आपल्या वाचक मित्रांच्या आग्रहाखातरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्दे विस्तारितरित्या लिहून या लेखमालेला संचलित करून सन २००६ मध्ये “तिसरे महायुद्ध’ पुस्तक प्रकाशित झाले.

ह्या पुस्तकाची आवश्यकता का?

Third World War

पहिले व दुसरे महायुध्द –

गेल्याच शतकात संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी २ महायुद्धे झाली. या महायुद्धांचा अभ्यास केला की तिसर्‍या महायुद्धाची सद्यस्थिती लक्षात येईल.
ह्या दोन महायुद्धांनी जगाची सर्व समीकरणे बदलून टाकली. आज पुन्हा एकदा जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वेगाने गती करत आहे.

तिसर्‍या महायुद्धातील महत्त्वाचे देश –

सर्व जगालाही (विशेषत: अमेरीकेला) त्रासदायक ठरू शकणारे एक भयप्रद “त्रिकूट’ जन्माला आलेले आहे. चीन, पाकिस्तान व नॉर्थ कोरिया. बदलत्या जागतिक समीकरणांमुळे ह्या तीनही राष्ट्रांचे राजकीय व आर्थिक हितसंबंध बहुतांशी एकाच दिशेने प्रवास करणारे आहेत.
हे अभद्र त्रिकूट त्याला चौथा साक्षीदार मिळताच संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे. हा चौथा भागीदार इराण, जर्मनी किंवा सिरिया असू शकतो.
स्वत:च्या राक्षसी महत्वाकांक्षेला साकार करण्यासाठी चीन जगातील सर्वात मोठ्या दोन धर्मांमध्ये वितुष्ट आणून तिसरे महायुद्ध धर्मयुध्दाच्या नावाखाली लढविण्याच्या प्रयत्नात आहे व सर्वात लक्षणीय बाब म्हणजे चीनमध्ये ह्या दोन्ही पक्षांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे.
पाकिस्तान हा चीनचा दत्तकपुत्र तिसर्‍या महायुद्धाच्या प्रथमार्धातील रणनितीचा रचयिता आहे.
ह्या देशातच निर्माण होणारे एक झुंजार नेतृत्व तिसर्‍या महायुद्धास वेग, धोका व दिशा देणारे आहे. थोडक्यात पाकिस्तान जागतिक दुर्दैवाचा दूत आहे.

तिसर्‍या महायुद्धातील महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे –

ओसामा बिन लादेन
डॉ. अल्‌मान-अल-जवाहिरी
अबू मुसब अल झराकी
श्रीमती कॉन्डोलिझा राईस –
धर्मगुरु पोप बेनेडीक्ट (१६ वे)
सद्दाम हुसेन
एन्जेला मर्केल
ह्यांच्या विषयी अतिशय महत्वाची माहिती व ह्यांच्या विषयी घडणार्‍या पुढील घटना आपणांस वाचण्यास मिळतात.

युद्धाचे प्रकार –

तिसर्‍या महायुद्धामध्ये खालील प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येईल.
१) आण्विक शस्त्रास्त्रे
२) क्षेपणास्त्रे (मिसाईल्स)
३) रासायनिक युद्ध
४) जैविक युद्ध
५) सागरी युद्ध
६) वाळवंटी युद्ध
७) अंतराळ युध्द
८) गुरिल्ला युध्दतंत्र आणि
९) मानसिक दबाव युध्दतंत्र

गुरिल्ला युद्धतंत्र –

तिसर्‍या महायुद्धात हे गुरिल्ला युद्धतंत्र अत्यंत व्यापक प्रमाणावर वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सामान्य माणसांनी घ्यावयाची दक्षता –

अज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम सहजपणे टाळू शकते.
सामान्य नागरिकांनी कसे वागावे व नक्की काय करावे? ह्याचे प्रशिक्षण अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट द्वारे मिळतच आहे.

भारत-महाभारत –

तिसर्‍या महायुद्धानंतर वाचलेल्या जगाला सर्व दृष्ट्या तारण्याचे व त्याच्या पुनर्वसनाचे कार्य नियतीने बहुतेक भारताच्या कुंडलीत लिहिलेले आहे. ह्याला कारण भारताची प्राचीन संस्कृती-अहिंसा व धार्मिक सहिष्णुता ही मूल्ये घेऊन ठामपणे पुढे होईल व ते भारतीय संस्कृतीचे कर्तव्यच ठरेल.

लेखकाबद्दल थोडेसे –

या पुस्तकातील नमूद घटनांची प्रचिती – डॉ. अनिरुद्ध जोशींनी सन २००६ साली लिहिलेल्या या पुस्तकातील अनेक गोष्टींचा पडताळा गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या आणि सध्याच्या जागतिक रंगमंचावरील घटना पाहता जागरुक वाचकाला येत आहे.
आज आम्ही पहातो की अमेरीकी कॉंग्रेस सदस्य फ्रॅंक वुल्फ, इस्त्रायल संरक्षणमंत्री मोशे यालॉन, जॉर्डन किंग अब्दुल्ला बिन हुसेन यासारख्या जगातील काही नेत्यांनी, अनेक वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांनी तिसरे महायुद्ध सुरु झाले असल्याचे मत मांडले आहे. स्वत: पोप फ्रान्सिस यांनी ‘सध्या जगात तिसरे महायुद्ध सुरु असल्याचे’ म्हटले आहे.

चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या त्रिकुटाचा जगाला असणारा धोका डॉ. अनिरुद्ध जोशींनी स्पष्टपणे मांडला आहे आणि आज साऊथ चायना सीमेमध्ये चीनची चाललेली दादागिरी, उत्तर कोरियाच्या आक्रमक हालचाली आणि दहशतवादाचे नंदनवन बनलेला पाकिस्तान ही सध्याची परिस्थिती पाहता या पुस्तकातून मांडलेले निष्कर्ष किती अचूक आहेत, हे जगाच्या समोर आले आहे. डॉ. अनिरुद्ध जोशींनी केलेल्या विश्लेषणानुसार जग ध्रुवीकरणाच्या दिशेने चालले असून यातून जगात मोठा उत्पात घडत आहे.

बदलती समीकरणे आणि सामान्य माणूस

पुस्तका़बद्दल बाहेरील लोकांचे रिव्ह्यूज

प्रत्यक्ष पेपरशी संलग्नता

तिसर्‍या महायुद्धामुळे जगात घडत असलेल्या घटनांची माहिती प्रत्यक्षच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. अनिरुद्ध जोशींनी दैनिक प्रत्यक्षच्या रोजच्या अंकातील तीन पाने याच विषयासाठी ठेवली आहेत. ते म्हणतात, “आजूबाजूचं परखड वास्तव माहित नसणं म्हणजेच अंध:कार आणि अंधारातच घात होतो, आमच्या जीवनातून या अंधाराला दूर करण्याचे विशेष आणि विलक्षण कार्यच प्रत्यक्षच्या माध्यमातून होत आहे.