AniruddhaFoundation-Praying Together

 भारतीय संस्कृतीमधील सांघिक उपासनेचे स्थान

सांघिक उपासनेच्या सुंदर संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी अनेक ठिकाणी अनेक उपासना केंद्रे स्थापन केली. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणच्या उपासना केंद्रातून भक्तिमय वातावरणात आज सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिलेल्या सांघिक उपासना श्रद्धावान करतात.

सांघिक उपासनेचे महत्व

 ह्या सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पंदनं उत्पन्न होतात ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात. संघिक प्रार्थनेमुळे आमचं पुण्य विभागलं जात नाही (डिव्हाईड होत नाही) तर उलट वाढतचं! भौमितीक पद्धतीने वाढतं.

सांघिक उपासनेचे फायदे

 १) सांघिक उपासनेमुळे सकारात्मक उर्जा वाढते.

२) भारतामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व खूप झाली तरीही समाज मात्र तळागाळात राहिला कारण आपल्यामध्ये सांघिक भावनेची कमतरता. ही सांघिक भावना फक्त सांघिक उपासनेतूनच उत्पन्न करता येते.

३) समाजसेवा करताना जो अहंकार निर्माण होऊ शकतो तो भक्तीमार्गात, संघभावनेत सहसा येत नाही.

४) सांघिक उपासनेद्वारे आपल्याला मानसिक शांती तर मिळतेच पण सांसारिक समस्यांपासूनही सुटका मिळते आणि आपलं मन:सामर्थ्य वाढून आपण परमेश्वरी मार्गावरचे कायमचे प्रवासी बनतो.

५) सांघिक उपासनेने समाजात एकतेची भावना, समानतेची भावना विकसित होते.

६) मानसिक शक्तींचा विकास होतो व व्यक्ती भयमुक्त जीवन जगू शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा व अर्थातच समाजाचा व राष्ट्राचाही अध्यात्मिक व भावनिक विकास होतो.

श्रीहरिगुरुग्राम येथील सांघिक उपासना

दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सांघिक उपासना होते. उपस्थित श्रद्धावानांना परमपूज्य बापूंचे पितृवचन ऐकायला मिळते.

घरोघरी आणि कौटुंबिक स्तरावरील सांघिक उपासना

कुणाही श्रद्धावानाच्या घरी कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र जमा झालेले श्रद्धावान नातेवाईक, मित्रमंडळी सांघिक उपासना करू शकतात. श्रावण, मार्गशीर्ष ह्यांसारख्या महिन्यांमध्ये अनिरुद्ध बापूंनी स्तोत्रपठण यांसारखे ही उपक्रम दिले आहेत. चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र यांसारख्या महत्त्वाच्या पवित्र काळात पूजा-पाठ, नामस्मरण जप, स्तोत्र पठण ह्या सामूहिक उपासना श्रद्धावान एकत्र जमून करू शकतात.

श्रीअनिरुध्द उपासना फौंडेशन मार्फत साजर्‍या होणार्‍या विविध उत्सवांमध्ये सांघिक पठण ठेवलेले असते. गुरुक्षेत्रम्‌ येथे वर्षातून एकदा सांघिक हनुमान चलिसा पठण सप्ताह श्रद्धावानांसाठी आयोजित केला जातो.

ऑनलाईन अनिरुद्ध.टीव्ही

‘अनिरुद्ध टीव्ही’ (www.aniruddha.tv) चे प्रक्षेपण २०१४ च्या गणपती उत्सवापासून सुरु झाले. ह्या वेबसाईटवरून इंग्रजी सांघिक उपासनेचे प्रक्षेपण दर रविवारी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळात केले जाते व श्रद्धावानांना जगभरातून ऑनलाईन उपासनेचा लाभ घेता येतो.

परमपूज्य सदगुरु अनिरुद्ध बापू सांगतात की, “रामरक्षा, हनुमानचलिसा, पंचमुखहनुमत्कवच मंत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र यासारखे आध्यात्मिक, सांघिक स्तोत्रपठण हाच तुमचा यज्ञ, तेच तुमचे दान आणि हीच तुमची तपस्या. यज्ञेन..दानेन..तपसा! ही सांघिक उपासनाच तुमच्या दुष्प्रारब्धाचा नाश करणारी असेल व तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारी असेल आणि तुमचा हा आनंदच मलाही आनंदित करणारा असेल हे नक्की!

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com