भक्तीमय सेवा

प्रार्थनेतून मिळणारी शक्ती व त्याचबरोबरीने घडणारी सेवा हाच पाया सद्‍गुरु अनिरुध्द बापूंच्या भक्तीमय सेवा उपक्रमांचा आहे. भक्ती व समाजासाठी सेवा या दोन गोष्टी एकत्रितपणे असायला हव्यात व ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचे ते सांगतात. याच तत्वावर आधारभूत असलेल्या सद्‍गुरु श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये श्रध्दावान कार्यकर्ते अत्यंत आनंदाने सहभागी होतात.

सामाजिक हेतू लक्षात घेऊन संस्थेने विविध सेवांचे उपक्रम हाती घेऊन आपल्या कार्याच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत. यामध्ये गरजूंचा विकास करण्यांतर्गत अंध संस्थांसाठी सेवा, वेड्य़ांचे इस्पितळ, अनाथाश्रम यांपासून ते वैद्यकीय व पुनर्वसन प्रकल्पांसाठी शिबिर आयोजन, पर्यावरणपूरक प्रकल्प, स्त्रियांना सक्षम बनविणे यांसरख्या अन्य विविध उपक्रमांचा समावेश आहे.

संस्थेतर्फे राबविण्यात येणार्‍या वैविध्यपूर्ण सेवा उपक्रमांची सखोल माहिती ‘भक्तीमय सेवा’ या विभागात मिळू शकेल.