- हा अनिरुद्ध आहे. ज्याला कोणीही रोखू शकत नाही!
- हा अनिरुद्ध आहे. ज्याला कुठलाच अडथळा अडवू शकत नाही!
- हा अनिरुद्ध आहे. ज्याचा सत्य हाच संकल्प आहे व जो पूर्णपणे स्वतंत्र आहे!
- अनिरुद्ध असाच आहे, अविचल व अभेद्य! म्हणूनच त्याचा मार्गही अनिरुद्धच आहे.अनिरुद्ध मार्ग कोणीही रोखू शकत नाही कारण तो अडथळ्यांपासून मुक्त आहे, म्हणूनच तो निश्चित व शाश्वत आहे.
अनिरुद्ध मार्ग कोणीही अवरुद्ध करू शकत नाही कारण तो अपवित्रतेपासून पूर्णपणे मुक्त आहे. आणि हेच निर्विवाद आणि शाश्वत सत्य आहे. तो निरंतर अनिरुद्धच असतो.
अनिरुद्धाचे प्रत्येक कार्य व निर्णय हे ’पावित्र्य हेच प्रमाण’ ह्या सिद्धांतानुसारच होत असतो, आणि हाच निर्णायक मापदंड आहे. त्याची कृती व व्यवहार ह्याच सिंद्धांताला अनुसरून असतो. हेच एकमेव व अंतिम सत्य आहे.
म्हणूनच ज्याची प्रत्येक कृती व निर्णय हा सत्यच असतो असा हा अनिरुद्ध आहे, आणि हेच एकमेव व अंतिम सत्य आहे.
ज्या व्यक्तीचा आई चण्डिकेवर विश्वास आहे व जो पापी असूनही त्याला त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप आहे, अशा प्रत्येकासाठी अनिरुद्धाकडे अमर्याद क्षमा आहे. त्याला पापांची घृणा वाटते, पाप्याची नाही. कारण त्याचे प्रेम अमर्याद आहे आणि ’मी तुला कधीच टाकणार नाही’ हे त्याचे वचन आहे.
अनिरूध्द ज्याची प्रत्येक कृती आणि निर्णय हा फक्त सत्य, प्रेम आणि आनंदातूनच उत्पन्न होतो. त्याचे प्रेम अखंडपणे हृदयाशी जोडले जाते आणि या प्रेमाच्या जाणीवेतूनच श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेनेच अनिरुद्धाचे प्रेम जीवनाच्या प्रत्येक पावलावर अनूभवता येते. यातून एक गोष्ट आम्ही आत्मसाद करतो ती म्हणजे’ ’आम्ही किती चांगले काम करतो, यावर काही अवलंबून नाही; सर्वकाही एकाच गोष्टीवर ठरते, ती म्हणजे आमचा त्याच्यावर असलेला दृढ विश्वास’. अनिरूध्दाचे प्रेमच सकारात्मकतेचा आणि विकासाचा मार्ग उघडते.
’अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरिन तिन्ही लोकं ॥’ हा अनिरुद्धाचा संकल्प आहे. आणि प्रत्येक जीवाला आधार देणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. अनिरुद्धाचे जीवनकार्य म्हणजेच अनिरुद्ध मार्ग – असा मार्ग ज्यावर कुठलाच अडथळा नाही.
आणि या सगळ्याचे पर्यावसान म्हणजेच ’आनंद’, कारण हीच अनिरुद्धाची इच्छा आहे, ज्याला कोणीही अडवू शकत नाही.
हा अनिरुद्ध आहे! ह्याला कोणीही रोखू शकत नाही!