AniruddhaFoundation-Panchagurus-His Five Gurus

 अनिरुद्ध शरणागत सद्‌भावे

परमपूज्य श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज (व्दितीय खंड, प्रेमप्रवास) ह्या ग्रंथात त्यांनी त्यांच्या पंचगुरुंचे वर्णन केले आहे.

Dattaguru Panchguru

परमपूज्य श्रीअनिरुद्ध बापूंच्या पंचगुरुंमधील प्रथम गुरु म्हणजे श्रीदत्तगुरु होय. हा करविता गुरु आहे. श्रीदत्तगुरु माझ्या आनंदमय कोशाचा स्वामी आणि माझा “करविता गुरु” आहे. त्यांच्या चरणी माझी अविचल निष्ठा आणि “श्रद्धा” आहे.

२००९ साली परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनाखाली ५ मे ते ९ मे ह्या कालावधीत श्रद्धावान भक्तांसाठी “अवधूतचिंतन” हा उत्सव आयोजित केला गेला. “अवधूतचिंतन”चा अर्थ श्रीदत्तगुरुंप्रती अविचल प्रेम. ह्या कार्यक्रमामध्ये अत्यंत पवित्र उपक्रमांचे आयोजन केले होते. सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू देखील सर्व श्रद्धावानांसहित उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. याबद्दलची अधिक परिपूर्ण माहिती पुढील ब्लॉगवर मिळेल.
http://avadootchintanutsav.blogspot.in

परमपूज्य बापूंच्या पंचगुरुंपैकी दुसरा गुरु म्हणजे श्रीगायत्रीमाता ही वात्सल्यमुर्ती आहे.

Gayatri Panchguru

गायत्री शब्द गय पासून तयार झाला. गय म्हणजे प्राण. प्राणांचे त्राण करणारी (तारण-संरक्षण) म्हणून गायत्री असे तिचे नाव दृढ झाले. मातृवात्सल्यविंदानम्‌ ह्या परमपूज्य बापूंनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेय व श्रीपरशुराम यांचा संवाद वर्णन केला आहे. त्या संवादामध्ये गायत्री म्हणजे काय, ती कुठे राहते व कसे कार्य करते ह्याविषयी सांगितले आहे.

विश्वामित्रांनी संपूर्ण विश्वासाठी गायत्री मंत्र सिद्ध केला. स्वत: प्रभु रामचंद्रही नियमित सूर्योदयसमयी गायत्री जप करत असत. भगवान श्रीकृष्ण ही म्हणतात –

” गायत्री छंदसाम अहम । छंद म्हणजे प्रवाह लय

(अर्थ – सर्व छंदवृत्तांमध्ये “मी गायत्री छंद आहे”) असे हे गायत्री महामातेचे मूळ स्वरूप आहे. म्हणून परमपूज्य बापू तिची उपासना स्वत: करतात. तिच्या वात्सल्यानेच सर्व सामर्थ्याचा अखंडपणे पुरवठा होत असतो. म्हणूनच ती वात्सल्य गुरु आहे असं परमपूज्य बापू सांगतात. श्रद्धावानांसाठी परमपूज्य बापूंच्या मार्गदर्शनाखाली १५ मे ते १७ मे २००४ ह्या कालावधीमध्ये अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे त्रिपदा गायत्री मंत्राचा पुरश्चरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी गायत्री मंत्राचे अखंड पठण सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत होत होते. लाखो श्रद्धावान भक्तांनी या पठणाचा लाभ घेतला. तसेच श्रद्धावानांना श्रीगायत्री पुरश्चरण यागाचाही लाभ मिळाला.

परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या पंचगुरुंपैकी तिसरा गुरु म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र हा कर्तागुरु आहे.

श्रीरामचरित्र म्हणजे मर्यादापालनाचे प्रात्यक्षिकच!

अशा रामराज्याचा रहिवासी होण्यासाठी, दुष्प्रारब्धाशी लढण्यासाठी प्रत्येकाने रामाचा वानरसैनिक व्हावे यासाठीच्या मर्यादामार्गाचे दिग्दर्शन परमपूज्य बापूंनी श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज (द्वितीय खंड प्रेमप्रवास) यामध्ये केले आहे.

परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या पंचगुरुंपैकी चौथा गुरु म्हणजे हनुमंत.

Hanumant Panchguru

चौथा गुरु म्हणजे हनुमंत. परमपूज्य बापू म्हणतात, हा प्राणमय कोशाचा स्वामी व माझा रक्षकगुरु. श्रीहनुमंत प्रभु रामचंद्रांचा दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. म्हणूनच हा अनिरुद्ध त्या हनुमंताचा “दासानुदास” म्हणवून घेण्यातच स्वत:च्या जीवनकार्याची इतिकर्तव्यता मानतो.”

परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या पंचगुरुंपैकीपाचवा गुरु म्हणजे श्रीसाई हा दिग्दर्शक गुरु आहे.

Saibaba Panchguru

नंत वैविध्य असलेल्या मानवसमूहाला एकाच वेळी एकाच रचनेतून सर्व मंगल देवविण्यासाठी नित्य दिग्दर्शन करणारा म्हणून हा दिग्दर्शक गुरु. परमपूज्य बापू श्रीसाईसच्चरितातील ओवीतून साईनामाचं महत्त्व समजावून सांगतात की,

“सोडुनिया लाख चतुराई। स्मरा निरंतर साई साई।
बेडा पार होईल पाही। संदेह काही न धरावा॥

श्रीसाई दिग्दर्शक गुरुंबद्दल बापू म्हणतात, ‘असा हा माझ्या अन्नम य कोशाचा स्वामी व माझा दिग्दर्शक गुरु हा साईनाथ जर “दासानुदास मी तुमचा ऋणी’ असं उच्चारतो तर मग मला मी कुणी श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचा काडीचाही अधिकार नाही, असे मी निश्चितपणे मानतो.’ अशा ह्या साक्षात परब्रह्म सदगुरु श्रीसाईंची विनम्रता, लीनता, शालीनता, आणि उच्च निरभिमानता ठायी ठायी दिसून येते.

वरील सर्व विवेचनावरून परमपूज्य बापूंच्या जीवनकार्यातील पंचगुरुंचे महत्त्व समजते. परमपूज्य बापू पंचगुरुंची उपासना स्वत: तर करतातच पण श्रद्धावानांकडूनही विविध मार्गांनी ही पवित्र उपासना करवून घेतात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com