परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य

aniruddha_the_unstoppable

संपूर्ण विश्व आज विनाशाच्या दिशेने कूच करीत आहे. अखिल मानवसमाज ज्या प्रगतीच्या उंच कड्यावर आज उभी आहे. तिथून थोडा जरी तोल गेला तरी ही संपू्र्ण मानवसमाज विनाशाच्या खोल गर्तेत (दरीत) कोसळून रसातळाला जाणार हे नक्की! अशावेळी सत्य, प्रेम, आणि आनंद ह्या जीवनमूल्यांच्या त्रिसूत्रीला पायाभूत मानून व पावित्र्य हेच प्रमाण ह्या मूलतत्त्वाचा अंगिकार करून अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे ध्येय श्रीअनिरुद्धांनी प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक कृतीतून कार्यातून जोपासले आहे.

धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून …
आज श्रीअनिरुद्धांचा जो कृतनिश्चय आहे, त्याप्रमाणे धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये ह्या तत्वानेच त्यांना जे करायचं आहे ते जीवनकार्य ते समर्थपणे पुढे नेत आहेत.

yadnya_kunda

मर्यादाधर्म संस्थापन

“अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी’ ह्या ओळी सार्थ करण्याच्या दृष्टीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या पुरुषार्थाच्या जोडीला “भक्ती” ह्या पंचम पुरुषार्थाची जोड हवीच हे पटवून देऊन “मर्यादा” हा सहावा पुरुषार्थ अत्यंत आवश्यक कसा हे त्यांनी स्पष्ट केले आणि ह्या सहा पुरुषार्थांच्या सहाय्याने देवयान पंथावर चालण्यासाठी श्रद्धावानांना प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांनी १) सत्यप्रवेश २) प्रेमप्रवास ३) आनंदसाधना हे तीन पुरुषार्थग्रंथाचे लेखन करून ते प्रकाशित केले. आज ह्या तीन ग्रंथराजांच्या आधारे सामान्य श्रद्धावान आपल्या जीवनाचा समग्र विकास घडवून आणू शकतो. समग्रजीवन विकासाचे सूत्र साधायची कला सामान्य भक्तांना शिकविण्यासाठी समर्थ आधार बनण्याचे ब्रीद त्यांनी अंगिकारले.

रामराज्य

सन २०२५ मध्ये रामराज्य आणणं हे परमपूज्य अनिरुद्धांचे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे. बापू सांगतात “हे रामराज्य प्रकटण्याच्या पाच पायर्‍या (पाच स्तर) आहेत. पहिला स्तर आहे वैयक्तिक अर्थात व्यक्तिगत. दुसरा स्तर आप्त/कौटुंबिक स्तर, तिसरा आहे सामाजिक स्तर, चौथा आहे धार्मिक स्तर आणि पाचवा स्तर आहे भारतवर्ष व जागतिक स्तरावर रामराज्याची स्थापना.

पहिल्या चार स्तरांनी भारत भौतिक व नैतिकदृष्ट्या समर्थ होईल. आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या सर्वसमर्थ बनेल आणि मग आपोआपच उरलेले जग जे असेल त्यांना घेऊन भारत समर्थ राष्ट्र बनेल” अशी ध्येयपूर्ती साधण्याचे उद्दिष्ट बापू मांडतात. अनावश्यक कर्मकांड, अंधश्रद्धा व रुढी यांच्या जोखडातून मुक्त होऊन फक्त उचित व आवश्यक काय तेच बापू पुरुषार्थग्रंथांमधून मांडतात.

सत्याला धुडकावून लावल्यामुळे सर्वसामान्य जन अशा परंपरांचे गुलाम होतात की ज्या चुकीच्या आहेत त्या जोखडातून मित्र बाहेर पडावेत म्हणून श्रीअनिरुद्ध प्रत्येक कृतीतून, कार्यातून मार्गदर्शन करत रहातात.

श्रीअनिरुद्धांच्या गतीला कुणीच अटकाव करू शकत नाही. (Unstoppable) अडथळा आणू शकत नाही. श्रीअनिरुद्ध निग्रही, स्वतंत्र इच्छा पूर्णत्वास नेणारे आहेत. अनिरुद्धमार्ग अथांग, प्रवाही आहे. कारण तो पूर्णशुद्ध मार्ग आहे तो सुस्पष्ट आहे. त्यामुळे त्यात समस्या नाहीत व प्रश्नही नाहीत.

कलियुगातील सर्वसामान्य माणसांना दिलासा

“मी तुमच्यातलाच एक आहे” असं स्वत:बद्द्ल परमपूज्य बापू म्हणतात, पण हेच तर त्यांचं वेगळेपण आहे. एक कुटुंबवत्सल आणि सर्वांशी मित्रत्वाच्या नात्याने स्वत:ला बांधून घेणारा आहे. सर्वांवर निरामय प्रेम करणारा असा हा अनन्यप्रेमस्वरूप मित्र. प्रत्येकाला आनंदी झालेलं पहाण्यात आनंद मानणारा हा कृपासिंधू! करोडो लोकांना हाच आपला मायबाप अशी प्रचिती देणारा हा वरदहस्त ! तो दगा न देणारा मित्र तर आहेच पण सदगुरुच्याही भूमिकेतून मन:सामर्थ्य पुरविणारा असा मन:सामर्थ्यदाता सुद्धा आहे. लोकांना दीपस्तंभासारखा योग्यमार्ग दाखविणारा हा पापतापनिवारक सामर्थ्यसिंधु! प्रत्येक मानवी जीवाचे विचारस्वातंत्र्य व कर्मस्वातंत्र्य पूर्णपणे मान्य करूनही (Common interest of common man ) तितक्याच ताकदीने त्यांची संकटे लीलया दूर करणारा हा महाबलोत्कट!
म्हणूनच श्रीअनिरुद्ध ठामपणे आपल्या सर्व श्रद्धावानांना दिलासा देणारा संकल्प पाळण्यास कटिबद्ध असतात. त्यासाठीच “तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही” हे त्यांचे वचन त्यांच्या जीवनकार्याचे (His mission) संपूर्ण सार आहे.