aniruddha_the_unstoppable

वैभवलक्ष्मी पूजन उत्सव

वैभवलक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्वाचा समजला जातो.

ही वैभवलक्ष्मी श्रद्धावानाला सुख, आनंद, रूप, विजय, सुयश देते. त्याचबरोबर व्याधी, दुष्प्रारब्ध, संकटं ह्यासागळ्यातून श्रद्धावानांचे रक्षण  करते. ही वैभवलक्ष्मी भगवान महाविष्णुची चेतनाशक्ति आहे. ही श्रीविद्याच आहे जी आपल्यासाठी अभ्युदय, वैभव, कृपा, सुख व षोडषऐश्वर्ये देणारी महाविष्णुच्या कार्याची अधिष्ठात्री देवता आहे.

जिथे परमात्म्याचे चरण आहेत, परमातम्याच्या चरणांचे पूजन जिथे केले जाते, परमात्म्याने दिग्दर्शित केलेली श्रद्धायुक्त निष्काम सेवा-भक्ति जिथे आहे तिथे तिथे लक्ष्मीमाता तिचे वास्तव्य करुन असते.

नैवेद्य म्हणून लक्ष्मी मातेला पाच प्रकारची पक्वान्न, किंवा डाळ भात, पोळी भाजी, किंवा अगदी नुसते पाणीसुद्धा प्रेमाने अर्पण केले असेल तरीही ती आई गोड मानून घेते. पण देवीला खऱ्या अर्थाने प्रिय असलेली पाच पक्वान्न म्हणजे –

१. स्वच्छता

२. परिश्रम

३. विश्वास

४. धैर्य

५. उचित ठिकाणी केलेले दान

आणि अर्थातच हे सर्व पावित्र्य हेच प्रमाण ह्याच एका तत्वावरच.

जे श्रद्धावान ह्या पाच गुणांचा स्वीकार करतात त्यांना लक्ष्मीमातेचा नित्य प्रसाद मिळत राहतो.

वैभवलक्ष्मी पूजनाचा उत्सव दरवर्षी श्रीक्षेत्र जुईनगर येथे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातल्या दर शुक्रवारी हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी अभिषेक व नंतर होमाने सुरुवात होते. ह्या पूजनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्याही खुप असते पण तरीदेखील कोणत्याही प्रकारची घाई गडबड न होता पद्धतशीरपणे पूजन केले जाते.

श्रद्धावानांना होमाच्या वेळी केलेल्या आवर्तनात सहभागी होता येते. श्रीक्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे साजरी केला जाणारा हा वैभवलक्ष्मी उत्सव म्हणजे श्रद्धावानांसाठी एक पर्वणीच असते.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com