AniruddhaFoundation-Shree Tripada Gayatri Mahotsav

श्रीगायत्री पुरश्चरण मास

गायत्री मातेच्या कृपेनेच आपण कुठल्याही क्षेत्रातील अढळपद गाठू शकतो. सद्‌गुरु अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाने १५ मे २००४ ते १७ मे २००४ या कालावधीत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे गायत्री महोत्सव आयोजित केला गेला. या उत्सवात सकाळी ८ ते रात्री ७ वाजेपर्यंत गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. दर दिवशी ३७,१२,४७० इतक्या वेळा गायत्री मंत्राचे पठण होत असे. लाखो श्रध्दावानांनी पुरश्चरण यागात सहभाग घेतला. या उत्सवाच्या तीनही दिवशी सद्गुरू श्रीअनिरुध्द बापू, नंदाई, व सुचितदादांनी गायत्री मातेची आरती केली.

सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथात लिहलेच आहे कि गायत्री माता म्हणजे ‘मी परमात्मा आहे हि परमेश्वराची जाणीव.’ हीच विश्वाची स्पंदशक्ती व आत्मरुपी चित्कला आहे. वेदांनीच तिला गायत्री माता म्हणून संबोधिले. “मी परमेश्वर आहे” ह्या जाणिवेतूनच ओंकार प्रगटला व त्याचा पहिला नाद म्हणजेच परब्रह्मा.

यावेळी प्रत्येक जपकाला गायत्री मातेची एक मूर्ती पूजनासाठी दिली होती. त्रिपदा गायत्री मंत्र हा तीनही दिवस श्री गायत्री पुरश्चरण योगाच्या वेळी म्ह्णण्यात आला. हा मंत्र असा होता :-

ॐ भूर्भुवः स्वः I तत्सवितुर्वरेण्यम्‌ I भर्गो देवस्य धीमही I धियो यो न: प्रचोदयात् ॐII

अर्थ – प्रणव ओंकारातून उत्पन्न झालेल्या व पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग यांच्यापलिकडे असणाऱ्या सवितृचे आम्ही ध्यान करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरित करो.

परमपूज्य बापूंनी गायत्री मातेची कृपा संपादन करण्याचे तीन मार्ग मातृवात्सल्यविन्दानम्‌ ग्रंथातून श्रद्धावानांना सांगितले आहेत –

१) ब्राह्म मुहूर्तावर अखंड केलेले गायत्री मंत्राचे पठण

२) त्रिकाल स्नानोत्तर प्रत्येकी २४ वेळा केलेले गायत्री मंत्राचे पठण

३) गायत्री मातेच्या पुत्राची केलेली निश्चल भक्ती

भगवान परशुरामांच्या प्रश्नांचे उत्तर देताना श्रीदत्तगुरु म्हणतात, “गायत्री मातेच्या कृपेनेच मानव कुठल्याही क्षेत्रातील उच्च व अढळपद गाठू शकतो.”

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com