AniruddhaFoundation-Shree Sadguru Punya Kshetram

२००५ च्या फेब्रुवारी महिन्यात सदगुरु बापूंनी श्रीहरिगुरुग्राम येथील प्रवचनात पुण्यक्षेत्रम्‌च्या स्थापनेविषयी उ‍द्घोषणा केली. श्रीसद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌ जळगांव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील निम ह्या गावाजवळ पांझरा व तापी  या नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. भौगोलिक दृष्ट्या हे जवळ-जवळ ४८ एकर परिसरात आहे.

सदगुरु बापूंनी पुण्यक्षेत्रम्‌ या ठिकाणी त्यांचे मानवी सदगुरु श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये यांची तपोस्थळी असलेली तापी नदीकाठावरील शिळा व पांझरानदी काठावरील टेकडीचे सदगुरु बापूंनीच महात्म्य विषद केले.

पांझरानदी व तापीनदीच्या काठावरील ही जागा अतिशय पवित्र आहे. पुराण कालापासून ह्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी तपस्या केली आहे. प्रत्यक्षमधील अग्रलेखांमध्येही ह्या स्थानाचा उल्लेख सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी केलेला होता. अशी ही पवित्र भूमी म्हणजेच श्रीसदगुरु पुण्यक्षेत्रम्‌.

ह्याच ठिकाणी गोपीनथशास्त्री पाध्ये यांचे तपोस्थळ आहे. तसेच वर्धमान व्रताधिराजचे निर्माण स्थळ आहे. वर्धमान व्रताधिराजची सुरुवात गोपीनाथशास्त्री पाध्ये यांनी याच ठिकाणी केली आणि सहस्त्रावर्तनानंतर बापूंनी हे व्रत २००५ मध्ये सर्वांसाठी खुले केले. याची सखोल माहिती श्रीमद्‌पुरुषार्थाच्या आनंदसाधना या ग्रंथात आहे. मागील काही वर्षांपासून संस्थेने हे व्रत भक्तांसाठी खुले केले आहे. व्रताधिराजच्या काळात श्रद्धावान श्रीसद्गुरु पुण्यक्षेत्रम्‌ येथे कोणत्याही दिवशी येऊन पवित्र शीळेवर टेकडीवर बसून व्रतपुष्प पठण करू शकतात. तसेच अनेक उपासना केंद्रातील श्रध्दावान ह्या ठिकाणी जाऊन संपूर्ण दिवस श्रमदानही करीत असतात.

गुरुक्षेत्रममधील दत्तगुरुंच्या तसबिरीचा इतिहासही याच स्थानाशी जोडलेला आहे. श्रद्धावान ह्या तसबीरीचे दर्शन श्रीगुरुक्षेत्रम्‌ खार येथे घेऊ शकतात.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com