स्थापना  –

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपेने व मार्गदर्शनाखाली ४ ऑक्टोबर १९९८ रोजी गुरुकुलाच्या भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला.

Juinagar

स्थान महात्म्य –

वैशाख पौर्णिमा १९९९ ह्या अत्यंत पवित्र दिवशी म्हणजेच २८ व २९ एप्रिल १९९९ ह्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ह्या तीर्थक्षेत्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या देवतांच्या मूर्ती तसेच श्रीमंगेश व श्रीशांतादुर्गा ह्या देवतांच्या मूर्ती यांची स्थापना केली. ह्या दोन दिवसांच्या समारंभात अत्यंत पवित्र शुद्ध मंत्रपठण सतत चालू होते. देवतांच्या मूर्ती गंडकी नदीच्या पात्रातील पवित्र खडकांमधून शिल्पकलेने घडविल्या गेल्या. मंदिरामध्ये गोमुखाच्या आकाराच्या गर्भगृहामध्ये ह्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य श्रीअनिरुद्ध बापूंनी केली. प्रत्येक दिवशी पहाटे गर्भगृहदालन उघडण्यापूर्वी ह्या तिन्ही मूर्तींची षोडशोपचारे पूजा करून त्यांचा साजशृंगार केला जातो. या मूर्तींपैकी महाकाली ही “काम” ह्या पुरुषार्थाचे प्रतीक म्हणजेच इच्छाशक्ती. असुरांना भयभीत करणारी व भक्तांची रक्षणकर्ती देवता. महालक्ष्मी ही “अर्थ” ह्या पुरुषार्थाचे प्रतीक, ही सर्व विघ्नांचा नाश करणारी देवता. आणि महासरस्वती ही “धर्म” ह्या पुरुषार्थाचे प्रतीक. ही सर्व रोगांचा नाश करणारी, रोग दूर करणारी देवता.

ह्या देवतांच्या समोर देवींकडे तोंड करून उभे असलेले पंचधातूपासून घडविलेले दोन सिंह पहायला मिळतात. अत्यंत वैज्ञानिक व आध्यात्मिक निकषांवर आधारित त्यांची घडण आहे. त्या सिंहांची नावे आहेत १) आल्हाद व २) संतोष.

श्रीशांतादुर्गेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. चतुर्भुज असलेल्या ह्या मूर्तीपुढील दोन हात आशिर्वाद देणारे आहेत. तर मागील दोन हातात दोन सर्प आहेत. ह्या मूर्तीच्या पायाशी शाळीग्राम आहे. त्याच्यावर ह्या मूर्तीचे पूजाविधी केले जातात.

महायोगपीठ स्वरुपाध्यास –

श्रीशांतादुर्गेच्या समोर असणार्‍या उजव्या बाजूच्या स्तंभाच्या आतील बाजूस एक कलश आहे. त्यात संपूर्ण भारतातल्या ३० तीर्थक्षेत्रांतील शक्तिपीठे व धर्मपीठे येथील मृत्तिका ठेवण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमुळे हे गुरुकुल म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

धर्मचक्र –

वरील वर्णन केलेल्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्याच दिवशी म्हणजे पवित्र वैशाख पौर्णिमेलाच श्रीअनिरुद्धांचे गुरु श्री मकरंद स्वामी यांच्या उपस्थितीत परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी धर्मचक्राची स्थापना केली. हे धर्मचक्र धातूंनी बनविलेले असून ह्याला २४ आरे आहेत. ५२ भक्तांच्या घरी प्रत्येक घरात तीन दिवस याप्रमाणे, “ॐ साई श्रीसाई जयजय साईराम” ह्या मंत्राचा जप करून हे धर्मचक्र सिद्ध केले आहे.

श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये अध्ययन कक्ष –

सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे मानवी सद्‌गुरु म्हणजेच श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये हे बापूंचे पणजोबा. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे सर्व वेदशास्त्रात पारंगत होते. हे एक श्रेष्ठ साईभक्त व श्रेष्ठ विठ्ठल भक्त असल्यामुळे ह्या कक्षामध्ये भक्तीला प्राधान्य दिले जाते. या कक्षात स्तोत्रपठण, नामस्मरण, ग्रंथपठण व ध्यान करता येते.

धुनी –

श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने धुनी प्रज्वलित करण्यात आली. तेव्हापासून ही अखंड प्रज्वलित आहे.

आद्यपिपा कै. परमपूज्य सुरेशचंद्र दत्तोपाध्ये रक्षा कलश समाधिस्थान –

Adya Pipa Samadhi

आद्यपिपांच्या ह्या समाधिस्थानाची स्थापना १९ एप्रिल २००७ रोजी सदगुरु श्रीअनिरुद्धांच्या आज्ञेने करण्यात आली आहे. सदगुरु श्री साईनाथांनी स्वत: आद्यपिपांच्या वडिलांना दिलेली उदी यासह आद्यपिपांची रक्षा या पवित्र गोष्टी कलश समाधिस्थानावर विराजमान आहेत. ह्या समाधिस्थानाला ६ पायर्‍या (चौथरे एकावर एक) आहेत. ह्यापैकी ५ पायर्‍या ह्या पंचपुरुषार्थांच्या म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष व भक्तीच्या आहेत, तर ६ वी पायरी ही मर्यादा पुरुषार्थाची आहे, जो पुरुषार्थ परमपूज्य बापूंनी सिद्ध केला आहे. सर्वात वर समाधीवर आद्यपिपांची नित्य पठणाची श्रीसाईसच्चरित पोथी आहे. ह्या ठिकाणी प्रत्येक श्रद्धावानास पिपिलिका मार्गावरून जीवन प्रवास करण्याची प्रेरणा मिळते.

समाधी समोरील शिळा –

समाधिसमोर असलेल्या शिळेवर उभे राहून आद्यपिपांना नमस्कार करताना समाधिमागील साईनाथांच्या फोटोचे दर्शन घडते. दरवर्षी ह्या समाधिस्थापनेच्या दिवशी १९ एप्रिल रोजी उत्सव साजरा केला जातो.

तसेच दरवर्षी या ठिकाणी श्रावण महिन्यातील पहिले तीन शनिवार अश्वत्थ मारुती पुजन, ललीता पंचमी नवरात्री उत्सव, मार्गशिर्ष महिन्यातील वैभवलक्ष्मी हे उत्सव साजरे होतात. अमावस्येव्यतिरिक्त दररोज दत्तयाग, व्यंकटेशयाग व गणेशयाग संपन्न होत असतात.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com