AniruddhaFoundation-Shree-Hari-Guru-Gram

श्रीहरिगुरुग्राम म्हणजे काय?

सदगुरु अनिरुद्ध बापूंचे पितृवचन ज्या स्थळी होते, ते ‘श्रीहरिगुरुग्राम’. श्रद्धावानांना श्रीअनिरुद्धांच्या कृपेचा मनमुराद लाभ घेता येतो ते ठिकाण म्हणजे श्रीहरिगुरुग्राम.

श्रीहरिगुरुग्राममधील कार्यक्रम –

दर गुरुवारी उपासनेत (सांघिक उपासना) सहभागी होण्यासाठी व सद्‌गुरुंचे दर्शन घेण्यासाठी श्रध्दावान हजारोंच्या संख्येने एकत्र येतात. सुरुवातीला साईनिवासमधून विष्णूपाद, श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजाचे आगमन होते व पालखीतून (palanquin) दिंडीबरोबर स्टेजवर नेले जाते. त्यानंतर बापूंच्या घरच्या पूजनातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीचे आगमन होते. श्रद्धावानांना दत्तमूर्ती आणि ग्रंथराज वर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळते. दत्तबाप्पांच्या मूर्तीच्या आगमनानंतर उपासनेला सुरुवात होते.

हरिगुरुग्राममधील उपासनेचा क्रम पुढील प्रमाणे आहे –

* श्रीगणेश, श्रीमहिषासुरमर्दिनी, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्रीहनुमंत, माता अनसुया, श्रीदत्तात्रेय इत्यादिंवरील रचलेली अत्यंत पवित्र व भक्तीपर स्तोत्रे, चलिसा यांचे पठण या उपासनेमध्ये केले जाते.

* श्रीशब्दध्यानयोग उपासना वैदिक काळामध्ये ही उपासना सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. जो कुणी गुरुकुलमध्ये जात असे त्याला ही उपासना शिकवली जात असे. श्रध्दावानांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘श्रीशब्दध्यानयोग’ उपासना सद्‌गुरु बापूंनी श्रीहरिगुरुग्राम येथे सुरु केली आहे.

* श्रीस्वस्तिक्षेम संवाद स्वस्तिक्षेम संवाद म्हणजे संपूर्ण चण्डिकाकुलाशी संवाद साधणे. आपल्या मनातील भावना या संवादात आपण चण्डिकाकुलाशी बोलू शकतो.

* श्रीअनिरुद्ध बापूंचे पितृवचन सर्व उपासनांनंतर बापू स्वतः विविध विषयांवर प्रवचन/पितृवचन करतात किंवा बापूंनी यापूर्वी केलेल्या प्रवचनांच्या सीडीज्‌ श्रीहरिगुरुग्राम येथे लावण्यात येतात. अधिक माहिती या लिंक वर मिळेल.

* आरती

प्रवचनानंतर ‘दुर्गे दुर्घट भारी’, ‘आरती साईबाबा’, व दर्शन संपल्यावर पुन्हा ‘दुर्गे दुर्घट भारी’ व ‘ॐ साई श्रीसाई जय जय साईराम’ या आरत्या म्हटल्या जातात.

* सेवा उपक्रम सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांनी सांगितलेल्या १३ कलमी योजनेअंतर्गत जुनी वर्तमानपत्रे, चारा, लड्या (चरख्यातून कातलेले सूत), जुने कपडे, भांडी व खेळणी याठिकाणी जमा करून नंतर गरजूंना मोफत वाटण्यात येतात.

* भक्ती उपक्रम

श्रद्धावानांना हरिगुरुग्राम येथे विविध भक्ती उपक्रमातही सहभाग घेता येतो. सुखसावर्णि प्रार्थनेतून श्रीत्रिविक्रमाची प्रार्थना करता येते किंवा सत्संगाचा आनंद लुटता येतो, प्रसादाचा लाभ घेता येतो. तसेच धूप, सुदिप, त्रिपुरारी त्रिविक्रम माला अर्पण करता येतात.

श्रीहरिगुरुग्राम मधील इतर उत्सव व कार्यक्रम –

श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशन व संलग्न संस्थांतर्फे आयोजित करण्यात येणारे गुरुपौर्णिमा, श्रीअनिरुध्द पौर्णिमा, श्रीधनलक्ष्मी पूजन इत्यादि उत्सव श्रीहरिगुरुग्राम येथे साजरे केले जातात. याव्यतिरिक्त श्रीअनिरुद्ध चलिसा पठण, महारक्तदान शिबिर, चरखा शिबिर या कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले जाते.

पत्ता

श्रीहरिगुरुग्राम,

न्यू इंग्लिश स्कूल,

शासकीय वसाहत,

खेरवाडी, वांद्रे (पूर्व)

उपासनेची वेळ – प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com