AniruddhaFoundation-Shree Aniruddha Pournima

 सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा जन्मदिन

अनिरुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा! सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा जन्मदिन. १८ नोव्हेंबर १९५६ ह्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्यादिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी परमपूज्य श्रीअनिरुद्धांचा जन्म मुंबईतील गिरगावातील पुरंदरे हॉस्पिटलमध्ये झाला.

श्रद्धावानानांच्या शुभेच्छा

सद्गुरुंचा जन्मदिवस प्रत्येकवर्षी साजरा करावा असं प्रत्येक श्रद्धावानाला वाटतं. हा वाढदिवस श्रद्धावानांकरिता अत्यंत आनंदाचा, कौतुकाचा आणि अभिमानाचा असतो. त्यादिवशी त्यांचे दर्शन घ्यायची इच्छा प्रत्येकालाच असते. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात, त्यांची आरती करावी, भक्तीचे अन्य उपक्रम साजरे करावेत आणि मंगल वातावरणात त्यांच्या सहवासात पूर्ण दिवस घालवावा अशी सर्वच श्रद्धावानांची इच्छा असते.

दिन महात्म्य

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या श्रेष्ठ श्रद्धावान सौ. मीनावहिनी दाभोळकर ह्यांनी प्रथम ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचे नामकरण ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ असे केले. हा अत्यंत शुभ दिवस आहे. आपल्या पुराणांमधून ह्या दिवशी घडलेल्या विविध शुभ प्रसंगांचे वर्णन आढळते.

असा हा पवित्र दिन श्रीअनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे अत्यंत उत्साहात व मंगल भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. ह्या दिवशी श्रद्धावानांना पूर्ण दिवस सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे दर्शन घेता येते.

अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवातील उपक्रम

सकाळी ८ वाजल्यापासून विविध उपक्रमांना सुरुवात होते. सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या पंचधातूंच्या मूर्तीवर जलाभिषेक मुख्य स्टेजवर केला जातो. त्याचवेळी अनिरुद्ध कवच स्तोत्राचे पठण सर्व श्रद्धावान करतात

ह्या अभिषेकानंतर दिंडी आणि मंगलवाद्यांच्या गजरात ही सद्गुरुंची मूर्ती ‘गार्‍हाण्याच्या’ स्टेजवर स्थापन केली जाते.

ह्या दिवशी श्रद्धावान बापूंना गार्‍हाणे घालतात. ह्या आवाहनाला सद्गुरु श्रीअनिरुद्ध भरभरून प्रतिसाद देतात.

) सुदीप प्रज्वलन

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या फोटोसमोर प्रत्येक श्रद्धावानाला सुदीप प्रज्वलित करता येतात. (सुदीप म्हणजे मेणापासून बनविलेले वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे दिवे)

सुदीपचे महत्त्व व प्रकार

भगवंतासमोर सुदीप प्रज्वलित करून ते त्याच्या चरणी अर्पण करणे हे अत्यंत पवित्र उदात्त व श्रेयस्कर कर्म आहे.

आपण जेव्हा सद्गुरुंसमोर किंवा भगवंतासमोर सुदीप प्रज्वलित करून अर्पण करतो, तेव्हा हा भगवंत आपल्या जीवनाच्या वाटेवर प्रकाश निर्माण करत रहातो. यामुळेच जीवनातील अडचणींना, तणावांना पार करून जाण्याचा मार्ग सहजसोपा बनतो. संकटात आणि आनंदात, सद्गुरुंना हाक कशी घालायची किंवा ‘अंबज्ञता’ कशी व्यक्त करायची! सद्‌गुरुंच्या अकारण कृपेसाठी ‘कृतज्ञता’ कशी व्यक्त करायची हे कळत नाही. तेव्हा सुदीप प्रज्वलन सहाय्य करते. हे अग्निस्वरूप एकच असले तरी श्रद्धावानांच्या भावानुसार सुदीपाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

इच्छापूर्ती सुदीप

बाधानिवारक सुदीप

पिडानाशक सुदीप

दर्शन सुदीप

वाढदिवस सुदीप

स्वेच्छा संकल्प सुदीप

असे हे सुदीप प्रज्वलन विविध प्रकारे निश्‍चितच फलदायी ठरते.

) उद अर्पण

सद्गुरुंच्या प्रतिमेसमोर अग्निहोत्र प्रज्वलित केलेले असते. तेथे प्रत्येक श्रद्धावान उद जाळू शकतो. प्रतिकात्मकरित्या स्वत:मधील सर्व वाईट गोष्टी, दुष्प्रारब्ध जाळून शुद्ध भाव निर्माण व्हावा व पुण्यकर्मे आणि भक्तीमय आयुष्य व्हावे यासाठी हे उद अर्पण महत्त्वाचे ठरते.

) रामरक्षा पठण आणि अभिषेक

अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी नित्यपूजेत असणार्‍या राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत ह्यांच्या पंचधातूंच्या मूर्तींवर उत्सवस्थळी दिवसभर जलाभिषेक केला जातो. दिवसभर ह्या कक्षात रामरक्षेचे अखंड पठण चालू असते.

) श्री किरातरुद्र पूजन

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या सर्व श्रद्धावानांसाठी श्रीकिरातरुद्र पूजन किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. त्यानुसार ह्या उत्सवात दरवर्षी सर्व श्रद्धावानांसाठी हे पूजन खुले केले. पूजन झाल्यानंतर पूजक श्रीकिरातरूद्राच्या मूर्तीसमोरील घंगाळात पूजनातील पदार्थ अर्पण करतात व श्रीकिरातरूद्राचे दर्शन घेतात.

ज्या श्रद्धावानांना प्रत्यक्षपणे उपस्थित राहता येत नाही परंतु त्यांची पूजन करण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी श्रद्धावान सेवेमार्फत पूजन करण्याची सोय केलेली असते. पूजनाचा प्रसाद त्यांना पाठविण्याची व्यवस्थाही केलेली असते.

) आप्पे प्रसाद

‘आप्पे’ नावाचा गोड पदार्थ जो उडीद डाळ, रवा, यापासून बनवलेला असतो. तो परमपूज्य बापूंचा आवडीचा पदार्थ असून श्रद्धावान बापूंना अर्पण करण्यासाठी आणतात. हा श्रद्धावानांनी आवडीने प्रेमाने आणलेला पदार्थ श्रीअनिरुद्धांच्या प्रतिमेसमोर नैवैद्य स्वरूपात अर्पण केला जातो. हा प्रसाद सर्व श्रद्धावानांना परत जाताना दिला जातो.

) दर्शन

ह्या दिवशी प्रत्येक श्रद्धावानाला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे दर्शन घेता येते. महाआरतीने उत्सवाची सांगता होते. आशिर्वाद स्विकारून अनिरुद्ध प्रकाश घेऊन प्रत्येकजण तृप्त मनाने परततो आणि प्रत्येकजण मीनावहिनींच्या गीताच्या ओळी गुणगुणतो – ‘आता कैसी अमावस्या, नित्य अनिरुद्ध पौर्णिमा’! संपूर्ण जीवन प्रकाशमय करणारा हा उत्सव नक्कीच अनुभवावा असाच आहे!

 

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com