AniruddhaFoundation-Aadyapipa Samadhi Sthanam

श्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा

जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ सालापासून श्री आद्यपिपा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी श्री आद्यपिपांची समाधी स्थापन करण्यात आली.

आद्यपिपा म्हणजे कोण?

श्रीसुरेशचंद्र दत्तोपाध्ये म्हणजेच परमपूज्य सुचितदादांचे व समीरदादांचे वडील. १९४० साली म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी शिरडीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर आद्यपिपांच्या वडिलांनी त्यांना उदी देऊन उदीचे महत्व सांगितले व तेव्हा ह्या उदीच्या कणासारखे लहान बनून साईंची भक्ती करायची हा संकल्प साईंच्या साक्षीने त्यांनी केला.

Aadyapipa samadhisthanam sohala

पुढे श्रीसाईसच्चरिताचे नित्य वाचन व चिंतन हाच त्यांचा प्रवास झाला. म्हणूनच सातत्याने साठ वर्षे त्यांनी श्रीसाईसच्चरिताची पारायणे केली. त्यांच्या अंतरंगातील भक्तीचा मळा फुलला.

 

श्रीसुरेशचंद्र दत्तोपाध्ये ह्यांचीपिपापदावर नियुक्ती

पिपिलिका पंथावरून चालायचे तर मुंगीच्याच आकारात राहिले पाहिजे. येथे आकारमान वाढले की तो रस्ता तुमचा मुळी उरतच नाही. हे आद्यपिपांचे वाक्य यशस्वी जीवनाचे मर्म आहे. एका आईच्या बाळाप्रमाणे भगवंताचे बाळ होऊन रहाणे म्हणजेच पिपिलिका पथ हे आद्यपिपांनी जाणले व आयुष्यभर तसेच जगले. मानपान, प्रसिद्धी व मोठेपणा यापासून ते कायम दूरच राहिले. १३ नोव्हेंबर २००० रोजी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी सुरेशचंद्र वैद्य यांची पिपिलिका पांथस्थ या पदावर नियुक्ती केली.

आद्यपिपांची समाधी

ते नित्य करीत असलेल्या श्रीसाईसच्चरित पारायण समाप्तीच्या वेळी म्हणजेच गोकुळाष्टमीच्या दिवशी दि. २६/८/२००५ रोजी आद्यपिपांचे निधन झाले (निवर्तले). त्यांच्या निर्वाणानंतर त्यांची समाधी श्रीक्षेत्र जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी सदगुरु श्रीअनिरुध्द बापू, सौ. नंदा जोशी (नंदाई), आद्यपिपांचे दोन्ही पुत्र सुचित वैद्य व समीर वैद्य, तसेच आद्यपिपा ह्यांच्या पत्नी शुभदा काकू यांच्या उपस्थितीमध्ये दर्शनासाठी उपलब्ध केली गेली.

Aadyapipa samadhisthanam sohala

आद्यपिपांच्या वडिलांना साईनाथांनी दिलेली उदी, सदगुरु श्रीअनिरुद्धांनी आद्यपिपांना दिलेली उदी या समाधीमध्ये ठेवण्यात आली आहे. समाधीला असलेल्या सहा पायर्‍या म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती व मर्यादा या पुरुषार्थ मार्गाची साक्ष देतात. समाधीवर आद्यपिपा पारायण करीत असलेला श्रीसाईसच्चरित ग्रंथ ठेवण्यात आला आहे. समाधीच्या मागे श्रीसाईनाथांचा भिक्षाटनाचा फोटो लावला आहे. तसेच समाधीच्या समोर एक रंगशीला आहे. या रंगशीलेवर कान पकडून उभे राहून व उड्या मारत मला माझ्या चुकांची कबूली श्रीसाईनाथांसमोर देता येते.

समाधी सोहळा कसा साजरा केला जातो –

AniruddhaFoundation-Aadyapipa Samadhi Sthanam (3)

आद्यपिपांच्या समाधीचा वर्धापन दिन गुरुकुल जुईनगर येथे प्रतिवर्षी १९ एप्रिल रोजी संपन्न होतो. ह्या दिवशी गुरुकुल जुईनगर येथे समाधीला मंगल स्नान घातले जाते. त्यानंतर श्रीसाईसहस्त्र पूजन सुरु होते. नंतर समाधीवर दुधमिश्रीत जलाने अभिषेक सुरु केला जातो. त्यावेळी परमपूज्य सुचितदादा ह्यांच्या आवाजातील श्रीसाईसच्चरिताच्या ११ व्या अध्यायाचे वाचन सीडीवर लावले जाते. नंतर समाधीपूजन, अत्तर चर्चन करून त्यानंतर नैवेद्य अर्पण केला जातो. ‘आरती साईबाबा’ ही आरती परमपूज्य सुचितदादांच्या आवाजात लावली जाते आणि ह्यानंतर गजर होऊन मग सर्वांसाठी अत्तर चर्चन व दर्शन सुरु होते. ह्या दिवशी श्रीआद्यपिपा ह्यांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांवर रचलेले अभंग गजर स्वरुपात गायले जातात.

                 
Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com