AniruddhaFoundation-Thursday Pitruvachanam

गुरुवार प्रवचन

१९९६ साली परमपूज्य सदगुरु बापूंनी अगदी मोजक्या श्रद्धावानांसमोर स्वत:च्या घरी प्रवचने सुरु केली. जसजशी श्रद्धावानांची संख्या वाढत गेली तसे स्वामीसमर्थ व्यायाम शाळा, ऍन्थोनी डिसिल्व्हा हायस्कूल व २००२ सालापासून न्यु इंग्लिश स्कूल, खेरवाडी (वांद्रे) आताचे श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचने होऊ लागली. दर गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता उपासना व प्रवचने (पितृवचन) होते.

एकूणच १९९६ ते २०१७ ह्या २१ वर्षांमध्ये अनेक विषयांवर सदगुरु श्रीआनिरुध्द बापूंनी आध्यात्मिक प्रवचने केलीच पण त्याचबरोबरीने आध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांशी किती अतूट संबंध राखणारे आहेत या विषयीही श्रद्धावानांना मार्गदर्शन केले. प्रामुख्याने सदगुरु श्रीआनिरुध्द बापूंनी त्यांच्या प्रवचनात पुढील विषयांचा समावेश केला, साईनाथांची अकरा वचने (मराठी), श्रीविष्णुसहस्त्रनाम, रामरक्षा, ललितासहस्त्रनाम, राधासहस्त्रनाम, आराधनाज्योती ह्या स्तोत्र, जप, मंत्र संग्रहातील पुस्तिकेमधील विविध श्लोकांचे स्पष्टीकरण इत्यादि.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com