daily_pratyaksha_publications
Pratyaksha _coverpage
 “प्रत्यक्ष” शब्दाचा अर्थच असा की “जिथे तर्काची व अनुमानांची गरज नाही ते प्रत्यक्ष”. “जे सर्व कुतर्कांना व अज्ञानाला संपविते ते प्रत्यक्ष”.

म्हणूनच “प्रत्यक्ष” हे वृत्तपत्राचं नाव अगदी सार्थ ठरतं कारण “प्रत्यक्ष’ हे वृत्तपत्रच असं आहे. १५ डिसेंबर २००५ रोजी लोटस पब्लिकेशन्सच्या ‘दैनिक प्रत्यक्ष’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. “बिगर राजकीय दैनिक” अशी स्वत:ची ओळख करून देणारे दैनिक प्रत्यक्ष.

ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही वेध घेणार्‍या महत्त्वाच्या बातम्या त्यात असतात. सनसनाटी आरोप-प्रत्यारोप, गॉसिप असं काहीही ह्या दैनिकात नाही. पण अध्यात्म, इतिहासाची जाणीव आणि वास्तवाचं भान करून देणार्‍या दर्जेदार लेखमाला यामध्ये असतात. यातील सर्वात महत्वाची ठरलेली लेखमाला म्हणजे तिसरे महायुद्ध, डॉ. अनिरुध्द जोशी यांनी स्वत: लिहिली आहे.

त्यानंतरच्या “तुलसीपत्र” ह्या अग्रलेख मालिकेत डॉ. अनिरुध्द जोशी यांनी तुलसीदासजींच्या सुंदरकांडातील वेगवेगळ्या अध्यायांमधील ओव्यांचा आशय स्पष्ट करताना श्रद्धावानांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात विकास कसा साधावा याचं मार्गदर्शन केलं.

आध्यात्मिक व जिओपॉलिटिक्स या विषयांव्यतिरिक्त दैनिक प्रत्यक्षमधून जेनरल मेडिसिन, फायनान्स, मनी मॅटर्स, स्टॉक मार्केट्स, प्रदूषण व पर्यावरण, प्राण्यांच्या व वनस्पतींच्या प्रजाती, त्यांचा ठावठिकाणा व शोध, श्रीसाईसच्चरितावरील सदर, सुप्रसिध्द व्यक्तिमत्वे व संस्था ह्याबाबत बातम्या व लेख प्रकाशित केले जातात.

तसेच नित्य जप, प्रार्थना, चित्र रंगवा, दोन चित्रांमधील फरक ओळखा इत्यादी अनेक गोष्टी ज्या लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत उपयुक्त असतात त्याचा समावेश ह्या दैनिकात असतो. वाचकांनाही आपली मते व लेख प्रत्यक्षसाठी देता येतात.

“न्यूजकास्ट प्रत्यक्ष’ या संकेतस्थळावर दैनिक प्रत्यक्षमधील बातम्या, तसेच लेखमालासुद्धा हिंदी व इंग्रजीमधून उपलब्ध आहेत.

महात्मा गांधी, डॉ. निकोल टेस्ला, नेताजी सुभाष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संशोधन व संशोधक यांसारखी उपयुक्त व माहितीपूर्ण सदरे प्रत्यक्षमधून प्रकाशित होतात.

हे सगळ जाणलं तर कळतं की प्रत्यक्ष हे केवळ दैनिक नसून ते एक हळूवार सामाजिक बदल घडवून आणणारे आणि वाचकांना सोप्या-सोप्या पद्धतीने कौटुंबिक, सामाजिक आणि नैतिक आणि राष्ट्रीय जीवनमूल्य स्पष्ट करणारे अनमोल भांडार आहे. प्रत्यक्ष हे दैनिक केवळ वृत्तपत्रच नसून ते एक खबरदारपत्र आहे, जे प्रत्येक वाचकाला पुढे येणार्‍या काळासाठी सावध ठेवते. परमपूज्य बापूंना त्यांच्या श्रद्धावान मित्रांना जे काही सांगायचे आहे ते सगळे “प्रत्यक्ष” मधून पोहोचत राहीलच आणि म्हणूनच येणार्‍या काळात “प्रत्यक्ष” प्रत्येक श्रद्धावानाला “आधार’ देण्याचं काम करेल हे नि:संशय!

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com