daily_pratyaksha_publications

परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे अनेक श्रद्धावानांना अनुभव येतच असतात. श्रद्धावान स्वेच्छेने ते अनुभव लिहून संस्थेकडे पाठवितात. पूर्वी ते अनुभव अनिरुद्ध विशेषांकात छापून येत व दरवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी अनिरुद्ध विशेषांकाचे प्रकाशन होत असे. दिवसेंदिवस अनुभव वाढतच गेले व त्यानंतर अनिरुद्ध विशेषांकाच्या ऐवजी दरमहिन्याला प्रकाशित होणार्‍या “दैनिक कृपासिंधू” मध्ये श्रद्धावानांचे अनुभव प्रकाशित होऊ लागले.

श्री दत्तगुरु पब्लिकेशनचे, कृपासिंधु हे मासिक मराठी, गुजराथी, हिन्दी व इंग्रजी या भाषांमधे निघते. मराठी अंक दर महिन्याला, गुजराथी दर दोन महिन्यांनी (द्वैमासिक), हिन्दी व इंग्रजी दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) निघतात.

कृपासिंधु मासिकाचे वेगळेपण

सत्य, प्रेम आणि आनंद या परमेश्वरी तत्वांवर आधारित असे हे एकमेव मासिक आहे. या मातीत जन्मलेल्या संतांनी, सत्पुरुषांनी, हा वारसा जोपासला, वाढवला, फुलवला आणि पुढच्या पिढीकडे सोपवला. हीच आपली खरी संपत्ती.

नेमका हाच आपला वारसा, हीच भक्ती सेवेची पताका कृपासिंधु गेली अनेक वर्षे अव्याह्रतपणे आपणा सर्वांपर्यंत पोहोचवत आला आहे. आजवर कृपासिंधु मधून विविध विषयांवर लेख प्रकाशित झाले आहेत. उदाहरणार्थ ज्यांचे शौर्य, पराक्रम भक्तीच्या मजबूत पायावर बहरला असे महान लढवैय्ये महाराणा प्रताप, गुरुगोबिन्दसिंहजी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, चित्तुरची राणी चेन्नम्मा. तसेच कालक्रमानुसार अनेक संतांच्या कथा व चरित्र. नवनविन शास्त्रीय शोधांविषयीचे लेख.

हाच आपला शौर्याचा, भक्तीचा, परमेश्वरावरील विश्वासाचा वारसा भारताच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवायचा आहे. याच अनुषंगाने सध्या कृपासिंधु प्रामुख्याने आद्यपिपांचे व इतरांचे भक्ती वात्सल्यपूर्ण अभंगांचे निरुपण, परमपूज्य अनिरुध्द बापूंच्या कार्याविषयीची माहिती, त्यांनी उभारलेल्या संस्थेतर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम, बापूंची मार्गदर्शक तत्वे, तसेच बापूंच्या भक्ती व सेवाकार्यात आल्यानंतर बापूंच्या श्रद्धावान मित्रांना आलेले सुंदर अनुभव, त्यांच्या आयुष्यात घडलेले सकारात्मक बदल, यांवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच या अनुभवांव्यतिरिक्त इतर विशेष लेखांचाही समावेश या मासिकामध्ये असतो.

आज प्रत्येकजण, संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्र व संपूर्ण विश्व, अशा एका उंबरठ्यावर उभं आहे, की ज्यांना समाजासाठी, मानवतेसठी काहीतरी चांगलं करण्याची, आपल्या हातून काही सत्कार्य घडावं अशी इच्छा आहे. पण उचित दिशा व मार्गदर्शन मिळत नाही. तो तो प्रत्येकजण भांबावून गेला आहे की बोट धरायचं तर कोणाचं, विश्वास ठेवावा तर कोणावर? त्या त्या प्रत्येकासाठी आज कृपासिंधु एका दिपस्तंभाप्रमाणे कार्य करीत आहे. परमपूज्य अनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येकाचं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी. त्याच्या प्रत्येक वाचकाला उचित दिशा व मार्ग दाखवण्यासाठी.

अधिक माहितीसाठी कृपया आपण संपादकांशी संपर्क साधू शकता.
आमचा पत्ता: कृपासिंधु, ७०२ लिंक अपार्ट्मेंट, जुना खार, खार (प), मुंबई -४०००५२.
ई मेल : <ajitsinhpadhye@gmail.com>
फोन नं. : ०२२-२६०५७०५४ असा आहे.
हा अंक ई-मॅगझिअन स्वरुपात वाचण्यासठी ऑनलाईन नोंदणीही करु शकता.
वेबसाईटचा पत्ता : https://www.e-aanjaneya.com

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com