प्रभाव आणि आवश्यकता :-

‘रक्त’ म्हणजे, मानवी शरीराचे स्वास्थ्य राखणारा अत्यंत महत्वपूर्ण घटक. ‘रक्त’, रक्तदात्या माणसाचेच नव्हे तर ज्याला रक्तदान केले गेले आहे अशा माणसाचे ही शरीरस्वास्थ्य राखते, आणि म्हणूनच ‘रक्तदान’ हे विशेष महत्वाचे ठरते. ‘रक्तदान करणे’ म्हणजेच गरजवंताला आरोग्यदायी जीवनाची अमूल्य भेट देण्याजोगे आहे.

Blood Donation Camp

रस्त्यावरील अपघात असो वा रेल्वे अपघात असो, की थॅलेसेमिया, ऍनेमिया (रक्तक्षय), रक्ताचा कर्करोग असे आजार असो, किंवा अगदी शस्त्रक्रिया करणे असो – ह्या सर्व परिस्थितींमध्ये रक्ताची मागणी वाढते व त्यामुळे त्याचा समाधानकारक साठा करणे, ही काळाची गरज बनते.

उदाहरणादाखल बघायचे झाले तर, केवळ महाराष्ट्रातच ७.५ लाख युनिट्स (रक्ताची एकक) रक्ताची वार्षिक गरज असते.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज म्हणतात :-

‘आनंदसाधना’, ह्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या तृतीय खंडात, सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ‘रक्तदानाचे महत्व’ स्पष्ट करतात. ते म्हणतात, ‘परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब अत्यंत आवडतात, ज्यात एका श्रद्धावंताने दुसऱ्या श्रद्धावंतांसाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या रक्तदानाचे थेंब ही समाविष्ट आहेत.

आढावा :-

Total-Blood-Donation-Count-2017-Shree_Harigurugram-02_updated-768x1024

सन १९९९ पासून, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टच्या विद्यमाने ‘रक्तदान शिबीर’, सातत्याने दरवर्षी एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येते. ह्या वर्षापर्यंत, जवळजवळ १ लाखपेक्षा जास्त युनिट्स (रक्ताची एकक), ह्या शिबिरांद्वारे दान करण्यात आल्या आहेत.

रक्तदान शिबिराचा आढावा :-

जी रुग्णालये व रक्तपेढ्या या शिबिरामध्ये सहभागी होतात, त्यांच्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ बरोबरच संस्थेच्या वैद्यकीय शाखेचे डॉक्टर व पॅरामेडिकल सदस्यही तेवढ्याच तत्परतेने संपूर्ण दिवस रक्तदात्यांची मदतीसाठी उपस्थित असतात. जर एखाद्या इच्छूक रक्तदात्याचे रक्त वैद्यकीय कारणास्तव नाकारण्यात आले तर अशा इच्छूक रक्तदात्याला ‘चरखा चालवण्याची सेवा’ करता येते. ह्यामुळे अशी व्यक्ती नाराज न होता, स्वतःच्या कष्टाचे प्रयत्नपूर्वक दान करून समाधानाने परतते.

या रक्तदान शिबीरीत सहभागी होणारे रक्तदाते कुठल्याही प्रकारचा मोबदला, म्हणजे अगदी ‘रक्तदान कार्ड’च्या स्वरूपातही स्वीकारण्यास तयार नसतात. हेच तर असते खरे निःस्वार्थी दान जे ह्या रक्तदान शिबिराचे सौंदर्य अधिकच खुलवते ! निःस्वार्थी दान म्हणजेच अगदी मनापासून केलेले दान, हे जाणून मित्रत्वाच्या/बंधुभावाच्या नात्याने ह्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले जाते.

२०१७ मध्ये झालेल्या रक्तदान शिबिराचा आढावा :-

१६ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या रक्तदान शिबिराचा आढावा पहाता एकूण मुंबईत ३१/३२ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या व एकूण रक्तदाते ५८२५ सहभागी झाले होते व एकूण ५२८८ रक्त बॉटल्स जमा झाले. महाराष्ट्रात ह्याच दिवशी विविध उपासना केंद्रात रक्तदान झाले त्यात ३३५५ रक्तदाते सहभागी झाले व २५०७ रक्त बॉटल्स जमा झाले. एकंदर ९१८० रक्तदाते एकाच दिवशी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन ७७९५ बॉटल्स रक्त जमा केले. एकूण ७०० कार्यकर्त्यांनी मुंबईतील शिबिरात सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न केले.

२०१७ मध्ये मुंबई येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ३२ रक्तपेढ्या सहभागी झालेल्या होत्या.

 

Blood Donation Camp Overview Infographic

 

LIST OF BLOOD BANK PARTICIPATED IN 2017 MEGA BLOOD DONATION CAMP

1 Anviksha Blood Bank Ghatkopar
2 Arpan blood Bank Kalyan
3 Ayush Blood Bank (Nagpur)
4 Bhabha Hospital Bandra
5 Blood Line ( Thane )
6 Bombay Hospital
7 Cama & Albless Hospital
8 Central Hospital Ulhasnagar
9 Cooper Hospital
10 D Y Patil Hospital
11 Dr.Babasaheb Ambedkar Muncipal Hospital Kandivali
12 ESIC Model Hospital Andheri
14 Hinduja Hospital
15 Holy Spirit Hospital ,Andheri ( E )
16 J.J Hospital (Byculla)
17 J.J. Mahanagar Blood Bank
18 Jaslok Hospital
19 KEM Hospital
20 Kokilaben Hospital Andheri
21 Life Line,Nagpur
22 Mahatma Gandhi Blood Bank
23 Parsee Gen. Hospital
24 Rajawadi Hospital
25 Red Cross Blood Bank
26 Saifee Hospital
27 Sion Hospital
28 St. George’s Hospital
29 Tata Hospital
30 Thane Civil Hospital
31 V.N.Desai Blood Bank
32 Wadia Hospital

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com