bal vidyaबल विद्येचा इतिहास

खूप प्राचीन काळी भारतामध्ये ६४ विविध कला आणि ६५ विविध प्रकारच्या विद्या अस्तित्वात होत्या. प्रत्येक प्रकारची कला आणि विद्या पूर्णत्वास पोहोचलेली होती. ह्या सर्वांचा अभ्यास करणार्‍या प्रत्येक व्यक्तिचा सर्वांगिण विकास झालेला होता. अशी व्यक्ति नेहमीच राष्ट्रीय समाजिक आणि कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यात यशस्वी होत असे. अशी विविध कौशल्ये आणि ज्ञानाचा वटवृक्ष ह्यांना एकत्रितपणे बलविद्या असे म्हटले जाते आणि त्यातून मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक शक्तिची वाढ होते. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी एकत्रितरीत्या काम करण्याची शक्तिसुद्धा प्राप्त होते.

लढाई फक्त शक्तिनेच जिंकली पाहिजे असं अजिबात नाही मन आणि बुद्धीही आपल्या शरीराच्या बरोबरीने ताकदवान असायला हवी. कारण युद्ध काही फक्त शारीरिक सामर्थ्याचा वापर करून खेळलं जात नाही तर आपल्या मानसिक आणि बौद्धिक पातळीवरून ही खेळलं जातं.

स्वत: श्रीअनिरुद्ध बापू मुद्‌गलविद्या, अश्व्विद्या, सुर्यभेदन विद्या, यशवंती मल्लविद्या व इतर भारतीय प्राच्यविद्यांमध्ये निपुण आहेत. म्हणून या बलविद्येला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. श्री हेमाडपंत स्मरणार्थ प्राच्यविद्या संशोधन प्रशाला केंद्र, जुईनगर, नवी मुंबई येथे श्री सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी बलविद्येचे प्रशिक्षण चालू केले.

बलविद्येच्या अभ्यासक्रमातील विषय

ह्या प्रशिक्षणाअंतर्गत मुद्गल विद्या, वज्रमुष्ठी, सूर्यभेदन, यशवंती मल्लविद्यांचे प्रकार, तसेच लाठी, काठी , फरी-गदगा, दोरखंड, दांडपट्टा ह्यांचे प्रशिक्षण पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही दिले जाते.

२४ ऑक्टोबर २०१२, विजयादशमी ह्या दिवशी बलविद्येची तंत्रे, हालचाली यांचा अभ्यास, सुव्यवस्थितरित्या मांडणारे ‘भारतीय प्राचिन बलविद्या’ नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच सरावासाठी ह्या पुस्तकाचा आधार घेतल्यास अधिक अचूकतेने व जलदरित्या प्रगती साधता येते. बलविद्येत नैपुण्य व अचूकता येण्यासाठी ह्या पुस्तकात सुस्पष्ट रेखाचित्रांचाही वापर करण्यात आला आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थींना नक्कीच फायदा होईल.

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धा युगामुळे व अनियमित जीवनशैलीमुळे तणावग्रस्त तरुणवर्ग आरोग्याकडे लक्ष पुरवू शकत नाही. अशावेळेस बलविद्येचे प्रशिक्षण घेतल्यास शारीरिक आरोग्य तर उत्तम लाभेलच पण मन व बुद्धीही चालना मिळाल्याने ते ज्या क्षेत्रात कार्यरत असतील त्या क्षेत्रातही चांगले यश मिळवणे सहज शक्य होईल.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com