Annapurna Mahaprasadam - Aniruddha Foundation

अन्नपूर्णा महाप्रसादम कशासाठी?

गरीब कुटुंबातील मुलांनाही पौष्टिक आणि भरपेट जेवण मिळायला हवे. कारण हे विद्यार्थी देखील आपल्या देशाचे भविष्य आहेत. दिवसभराचे काबाड कष्ट करूनही या कुटुंबात एक वेळचीच चूल पेटते. अर्धवट पोटी शाळेत आलेल्या या मुलांकडून अभ्यासही होऊ शकत नाही आणि चांगले आरोग्यही प्राप्त होऊ शकत नाही. शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना समतोल आणि पोषक आहार आणि दुपारच्या जेवणाच्या ओढीने तरी पालकांनी त्यांच्या मुलांना दररोज शाळेत पाठवावे ह्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. जेणेकरून भूक आणि शिक्षण या दोन्ही समस्यांचे निवारण होऊ शकेल. हा विचार करुन २००७ मध्ये श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि संलग्न संस्थांनी सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ ही योजना सुरु केली.

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ म्हणजे काय?

श्रद्धावान अन्नदान करुन आपल्या सदगुरुप्रती प्रेम व्यक्त करतात आणि याच प्रेमाने आणि श्रद्धेने श्रद्धावान सेवक शाळेत स्वयंपाक करुन या विद्यार्थ्यांना जेवायला वाढतात. त्यांच्या या निष्काम सेवा आणि भक्तीभावामुळे हे अन्न म्हणजे जणू अन्नपूर्णा देवीचा प्रसाद, म्हणून यास ’अन्नपूर्णा महाप्रसादम्‌’ असे म्हटले गेले आहे.

नंदाई आणि सुचितदादा मुलांना जेवण वाढताना

वाटप आणि व्यवस्थापन –

‘श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’द्वारे धान्य, कडधान्य, तेल, मसाले अशा जिन्नसांचे दान अनिरुद्ध गुरुक्षेत्रम खार (पश्चिम), मुंबई येथे स्वीकारले जाते. तसेच हे दान फाऊंडेशनच्या विविध उपासना केंद्रातही स्विकारले जाते. दर गुरुवारी आपण श्रीहरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा (पूर्व) मुंबई येथेही दान करू शकतो.

हे दान आलेले सर्व धान्य मुंबई नजीकच्या विरार, ठाण्याच्या दुर्गम गावांमध्ये पाठविले जाते. त्या गावांमधील स्थानिक श्रद्धावान सेवक स्वतः दररोज स्वयंपाक करुन या विद्यार्थ्यांना ताजे जेवण उपलब्ध करुन देतात. त्यांना प्रेमाने जेवायलाही वाढतात. मुलांची जेवणे आटोपल्यानंतर स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करुन भांडी घासून श्रद्धावान सेवक आपली त्या दिवसाची सेवा सदगुरु चरणी अर्पण करतात.

या योजनेमुळे दानासारखे पुण्यकर्म तर होतेच पण बरोबरच श्रमदान सेवेमुळे श्रद्धावानांना आपले वाईट प्रारब्ध नष्ट करण्यासाठी सदगुरुंचा आशीर्वादही प्राप्त होतो.

सद्य परिस्थिती –

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ योजनेअंतर्गत २० हून अधिक शाळांमध्ये ‘श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ तर्फे सेवा दिली जाते. उदाहरणार्थ विद्यावैभव विद्यालय, केळवे रोड, या शाळेतील २५०-३०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही मुले आदिवासी कष्टकरी आणि इतर रोजंदारी कामगार वर्गातून आलेली असतात. विरार, सफाळे आणि मायखोप या उपासना केंद्रातील श्रद्धावान या सेवेत प्रेमाने सक्रिय असतात. दररोज या मुलांना दुपारच्या जेवणात वरण, भात आणि उसळ असते.

ज्या शाळा दोन सत्रात कार्यरत असतात अशा शाळांसाठी श्रद्धावान ११.३० ते २.०० या वेळेत जेवण बनवतात. ज्यामुळे दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांना ताजे व गरम जेवण मिळते. आजमितीस श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन व संलग्न संस्थांच्या ७००-८०० श्रद्धावानांनी ह्या सेवांमध्ये सहभाग घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून हे श्रद्धावान या सेवेसाठी प्रेमाने वेळ देतात.

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌चे इन्फोग्राफिक

Annapurna Mahaprasadam Infographic-Aniruddha-Foundation-01

कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीर –

Annapurna Prasadam-Kolhapur Medical Camp

कोल्हापूरच्या पेंडाखळे या गावात आयोजित होणार्‍या कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिरात दरवर्षी सुमारे १०० विविध शाळेतील ९००० हून अधिक विद्यार्थी अन्नपूर्णा महाप्रसादाम्‌तर्फे दिल्या जाणार्‍या भोजनाचा आनंद लुटतात. त्याचबरोबर आपले ताट, वाट्या स्वच्छ धुवून देखील ठेवतात. वैशिष्ट्य म्हण्जे सर्वजण ’वदनी कवळ घेता…’ ही प्रार्थना बोलूनच भोजनाला सुरुवात करतात त्यामुळे परमेश्वराचे नामस्मरण करुन त्यास धन्यवाद देऊन अन्नग्रहण करण्याचे संस्कारही नकळत दिले जातात.

म्हणूनच “अन्नपूर्णा महाप्रसादम्‌” ही योजना केवळ भूक भागविण्याची योजना नसून आपल्या देशाच्या भावी पिढीस मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम आणि उज्ज्वल बनवणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.

ब्लॉग लिंक : http://aniruddhabapu-annapoornaprasadam.blogspot.in

Appreciation-Letter from Zilla Parishad School Karanjon 2017-for-Aniruddhafoundation-Compassion-Social-services
Appreciation Letter from Zilaa Parishad School Karanjon 2017
Appreciation-Letter from Zilla Parishad School 2017-for-Aniruddhafoundation-Compassion-Social-services
Appreciation Letter from Zilaa Parishad School Parol 2017

अधिक अप्प्रेसिअशन लेटरसाठी येथे क्लिक करा – 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com