AniruddhaFoundation-Aniruddha's Universal Bank of Raamnamसंकल्पना स्थापना

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २००५ या शुभदिवशी ‘श्रीहरिगुरुग्राम’ – वांद्रे येथे, ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ची घोषणा केली. ह्या संकल्पनेचा मूळ उद्देश्य सर्वसामान्य श्रद्धावानाला कलिकाळावर मात करून व प्रारब्धाच्या तडाख्यातून बाहेर पडून जीवन आनंदी व सुखी करणे हाच आहे.

कार्यस्वरूप

सर्वसामान्य लोकांना माहित असलेल्या बँकांसारखेच ह्या बँकेचे कार्यस्वरूप आहे. फक्त ‘रामनाम’ (देवाचे नाव) हे सहजसोपे नामच ह्या आगळ्यावेगळ्या बँकेचे ‘चलन’ आहे. ह्या बँकेचे मुख्यालय येथील लिंक अपार्टमेंट, खार, मुंबई येथे आहे.

Raamnaam Book

रामनाम वहीची माहिती महत्त्व

‘रामनाम वही’ २१६ पानांची वही आहे, जी भक्तांना सोप्या स्वरूपात नामस्मरण लिहिण्याबरोबरच उच्चारणाचीही सुवर्णसंधी देते. ह्या वहीत पहिल्या १०८ पानांवर ‘राम’ नाम लिहायचे असते. पुढील प्रत्येकी २७ पानांवर अनुक्रमे ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ’कृष्ण’, ’दत्तगुरु’ व शेवटी २७ पानांवर ’जय जय अनिरुद्ध हरि’ हा मंत्र लिहायचा असतो.

जेव्हा आपल्या लाडक्या सीतामाईला लंकेमधून आणण्यासाठी ‘श्रीरामेश्वर ते लंका’ असा अभेद्य सेतू वानरसैनिकांना बांधायचा असतो. कार्याचे व्यापकत्व व दुर्गमता जाणून श्रीहनुमंत वेळीच पुढे सरसावतात व समुद्रात टाकल्या जाणा‍र्‍या प्रत्येक पाषाणावर स्वहस्ते ‘श्रीराम’ नाम लिहू लागतात. श्रीराम नामाने अजीव व जड पाषाणही पाण्यात बुडत नाहीत तर तरंगतात व त्यांच्या समुदायाने समुद्रावर सेतू बांधला जातो. श्रद्धावान जेव्हा रामनाम वही लिहीत असतो तेव्हा त्याच्याही जन्मजन्मांच्या प्रवासातील अनेक सुंदर सेतू असेच सहजतेने श्रीहनुमंत बांधून घेतात, अशी भावना आहे. “जो कुणी हनुमंताच्या आकृतिबंधात रामनाम रेखांकित करेल, त्याचे नाम शतगुणे होईल” अशीच रचना आपल्या ह्या रामनाम वहीची आहे.

 अंजनामाता वहीची माहिती महत्त्व

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार विशिष्ट रचना असलेली, श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेली अशी ही ‘अंजनामाता’ वही आहे. माता अंजनीचा पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत, अर्थातच सद्‍गुरु दत्तात्रेय. हा एकमेव ‘हनुमंत’च असा आहे ज्याने ‘स्वाहा’ (पूर्ण समर्पण) व ‘स्वधा’ (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) हे दोन्ही गुण धारण केले आहेत. हे प्राप्त करता येतील अशी रचना ह्या वहीमध्ये केलेली आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितलेले रामनाम वहीचे महत्व

जेव्हा मी रामनाम उच्चारतो तेव्हा ते रामनाम आपोआप हनुमंताच्या उच्चारात सामावले जाते. हा महत्वाचा फायदा रामनाम वही लिहिण्याने मला मिळतो.

काही विशेष प्रसंगी म्हणजेच वाढदिवस, लग्न अशा निमित्ताने किंवा आपल्या आप्तांच्या सुख व समृद्धी प्राप्तीसाठी त्यांच्या नावे वही लिहून जमा करता येते. मृत व्यक्तीच्या नावे रामनाम वही लिहिली तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला रामनामामुळे पुढची गती अधिक चांगली मिळते अशी श्रध्दा आहे.

रामनाम वही लिहिताना आपल्या हातून नवविधा भक्तीतील श्रेष्ठ ‘श्रवण’ भक्ती घडणार आहे. कारण नाम लिहिताना डोळ्यांनी ते वाचले जाणार आहे. जप मनाने उच्चारला जाणार आहे व त्याचवेळी त्याचे सहज श्रवणही होणार आहे. म्हणूनच रामनाम वही म्हणजे सहज भक्ती करण्याचे पवित्र साधन आहे.

‘अंजनामाता’ वहीसुद्धा मला जीवनात खूप मन:सामर्थ्य देते. ज्याक्षणी आपल्याला वाटते की आपले मन कमकुवत बनलयं, आपल्याला भीती घेरते आहे, त्याच क्षणाला अंजनामातेच्या आणि तिच्या पुत्राच्या आश्रयाला गेल्याने आपण निर्भर बनतो. अंजनामाता वही लिहिण्याने स्वधा शक्तीचा स्त्रोत सद्‌गुरु कृपेने अखंड सुरू राहतो.

सभासदत्व कसे घ्यायचे? बॅंकेच्या शाखा

‘रामनाम’ हेच या आगळ्यावेगळ्या बँकेचे चलन आहे. कमीत कमी एक वही लिहून ती जमा केली की ह्या अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम बँकेचा सभासद होता येते. सभासद झाल्यावर प्रत्येक श्रद्धावानाला एक पासबुक दिले जाते.

Raamnam Book Jap - Mar 17-01-01  Anjanamata Book Count-01

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com