परमपूज्य सद्‌गुरू श्री अनिरुद्धांना जो धर्म अभिप्रेत आहे तो मानवधर्म. अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरिन तिन्ही लोकं ॥ हे त्यांचे ब्रीद आहे. या ब्रीदासाठी, ह्या धर्मासाठी निर्माण केलेला कार्यक्रम म्हणजेच तेरा कलमी योजना. ३ ऑक्टोबर २००२ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी ह्या कार्यक्रमाची घोषणा केली. त्यांच्या दृष्टीने हा कार्यक्रम म्हणजे प्रगतीचे एक साधन आहे, प्रगतीचा असा सहज आणि सोपा मार्ग आहे की, ह्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक श्रमातून प्रत्येकाचे कल्याणच होत राहील.

 

13 Points Programme

 

   तेरा कलमी योजना म्हणजे एकूण एक समस्येवर असणारे उत्तर! मग ती समस्या मानवाच्या कपड्यालत्त्याची असो, शिक्षणासंबंधी असो, पर्यावर्णाशी जोडलेली असो की आध्यात्मिक समस्या असो; अगदी सगळ्याच बाबींमध्ये उपयुक्त आहे. एक पूर्ण व्यक्तिमत्व बनण्यासाठी हा तेरा कलमी कार्यक्रम गरजेचा आहे. ही एकमेव आणि अद्वितिय अशी एका द्रष्टयाची दृष्टि आहे. कारण यातील प्रत्येक योजना प्रत्येकाला अगदी सहज करता येण्याजोगी आहे आणि सर्वात महत्वाचे ही योजना माणसां-माणसांमध्ये प्रे्माचे अंकुर रुजविणारी आणि वाढवणारी आहे. या योजनेचा पाया पुढील तीन महत्वाच्या गोष्टींवर ठेवला आहे, माझे माझ्या सभोवती असणाऱ्या व्यक्तिंवरील प्रेम, माझ्या मातृभूमीवरचे प्रेम आणि माझ्या देवावरचे प्रेम!!!

 

ह्या तेरा कलमी योजनेतील प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत –

चरखा प्रकल्प :

ह्या योजनेद्वारे चरखा चालवून त्यातून सुत काढून त्याचे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेष तयार केले जातात व नंतर त्या गणवेशांचे गरजू गावांमध्ये जाऊन वाटप करण्यात येते.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-charkha-project/

रद्दी योजना :

ह्यात जमा केलेल्या रद्दीपासून विविध गोष्टी बनविल्या जातात.

बारा मास शेती चारा योजना :

ह्यामध्ये मका लावून त्याचा चारा दुष्काळग्रस्त भागामधल्या गाई-गुरांना पोहोचवला जातो.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-round-the-year-farming-fodder-project/

विद्या प्रकाश योजना :

ज्या गावांमध्ये वीजेचा पुरवठा नाही, अशा ठिकाणी मेणबत्त्या, काडीपेट्यांचे वाटप केले जाते. ज्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये वीजेच्या अभावामुळे येणारा व्यत्यय दूर होण्यास हातभार लागतो.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-the-light-of-knowledge-project/

स्वच्छता :

स्वच्छता फक्त घरातलीच नाही, तर आपला सभोवतालचा परिसरही स्वच्छ असणे गरजेचे असते. आणि ह्यासाठीच या योजनेअंतर्गत विविध हॉस्पिटल्स, गणपती विसर्जनाच्या वेळी चौपाट्या येथे स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येते.

जनरल नॉलेज बॅंक :

जगभरात विविध क्षेत्रात घडणार्‍या घडामोडी वेळच्यावेळी समजून घेण्याची सवय लागावी आणि तसेच नवनवीन माहीतीबाबत आपल्याला अद्ययावत राहता यावे यासाठी या बॅंकेची स्थापना करण्यात आली आहे.

भारतीय भाषा संगम :

आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त कमीत कमी एक तरी भाषा आपल्याला अवगत असावी हेच या योजनेमागचे उद्दिष्ट. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू ह्यांनी स्वतः अमराठी भाषिकांसाठी मराठीचे वर्ग घेऊन त्यांना मराठी भाषा शिकविली. तसेच संस्थेने ट्रॅवल गाईड ही पुस्तिका प्रकाशित केली आहे ज्यामध्ये हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, मल्याळम्‌ आणि तेलगु ह्या विविध भाषांमधील दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे उपयुक्त संवाद आहेत.

पाच खंडांचा अभ्यास :

पाचही खंडांचा वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अभ्यास असणे गरजेचे आहे. आणि ह्यासाठीच ह्या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. बिगर राजकीय दैनिक प्रत्यक्षमध्ये ही दोन पाने संपूर्णपणे अंतरराष्ट्रीय बातम्यांसाठीच ठेवली गेली आहेत, ज्यामध्ये ह्या जगातल्या आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेण्यात येतो.

जुने ते सोने :

ह्यामधे आपण गरजू लोकांना जुने कपडे किंवा जुनी भांडी तसेच लहान मुलांना जुनी खेळणी ह्यांचे वाटप करतो.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-old-is-gold-project/

वात्सल्याची ऊब (मायेची ऊब) :

ह्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी गावांमध्ये स्वेटर्स, गोधड्या ह्यांचे वाटप केले जाते. आणि ह्यासाठी संस्थेतून स्वेटर्स, गोधड्या बनवण्याचे प्रशिक्षण इच्छुकांना दिले जाते.
http://marathi.aniruddhafoundation.com/the-warmth-of-love-project/

अहिल्या संघ :

ह्या प्रकल्पांतर्गत प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणासाठी प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षण दिले जाते.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-ahilya-sangha/

श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज :

हे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेले तीन ग्रंथ आहेत – सत्यप्रवेश, प्रेमप्रवास आणि आनंदसाधना. ज्यायोगे प्रत्येक जण सत्याच्या मार्गावरुन प्रेमाचा प्रवास करत आनंदाने आपला पुरुषार्थ घडवू शकतो.
http://marathi.aniruddhafoundation.com/shreemad-purushartha-grantharaj/

अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट :

ह्यामध्ये एका आठवड्याच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे आपण कोणतीही आपत्ती आल्यास न डगमगता त्यातून स्वतःचा आणि स्वतःबरोबर इतरांचाही बचाव करु शकतो. याचबरोबर ही अ‍ॅकॅडमी गांडूळखत, पल्स पोलिओ लसीकरण व वृक्षारोपणासारखे अनेक कार्यक्रम राबवते.
http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-aniruddhas-academy-disaster-management/

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com