संकल्पना

“श्रीवरदाचण्डिकाप्रसन्नोत्सव” अनेक संकल्प, अनुष्ठाने व अध्यात्मिक उपासना परिपूर्ण झाल्यानंतर घडणारी ही अत्यंत दुर्मिळ व परम पवित्र व मह्न्मंगल घटना म्हणजे शांती, सक्षमता व तृप्ती बरोबरच आधार व निर्भयता ह्यांचा झालेला महासंगमच होय.

महत्व

मानवाला त्याच्या जीवनात सतत येणार्‍या अडचणी, संकटे, दुःख व शत्रुत्व ह्यांचा सामना करीत जीवन जगावे लागते. हा सगळ्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी लागणारे सामर्थ्य मिळविण्याचा हा उत्सव होता. अंतरिक्षस्वामिनी असणार्‍या श्रीमहिषासुरमर्दिनीचा नववा “मंत्रमालिनी” हा अवतार म्हणजेच “मातृवात्सल्यविन्दानम्‌” ह्या ग्रंथात विशद केलेले आदिमातेचे आख्यान व त्याद्वारे मिळणारे ज्ञान, भक्ती, आत्मविश्वास, कवच, संरक्षण हे सर्व म्हणजे हा नववा अवतार होय. हा उत्सवसुध्दा ह्याचीच फलश्रुती होती.

ह्या उत्सवामध्ये आदिमातेचे दर्शन, स्मरण, गुणसंकीर्तन व महापूजन सर्वांना करायला मिळाले आणि त्यातूनच सर्वांना त्यांच्या सर्व अपराधांचे, पापांचे, चुकांचे, गुन्ह्यांचे प्रायश्चित घेण्याची, देहातील सर्वच्या सर्व १०८ शक्तीकेंद्रांना शुभंकर, सक्षम व बलशाली बनविण्याची व आदिमाता चण्डिकेला “वरदा” बनविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती, हिच भावना सर्व श्रध्दावानांची होती.

पूर्वतयारी –

या उत्सवाअगोदर प्रत्येक इच्छुक भक्ताला एक एक कंठकूपपाषाण आपल्या घरी नेऊन “श्रीदेवीपूजनम” करण्याची संधी प्राप्त झाली होती. हे पूजन सर्वप्रथम सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू, नंदाई व सुचितदादांनी श्रीहरिगुरुग्राम येथे केले. त्यानंतर घरोघरी “श्रीकंठकूपपाषाण” पूजन अत्यंत उत्साहाने केले गेले. श्रीकंठकूपपाषाण घरी आला म्हणजे माझ्या घरामध्ये देवीची पावले उमटली, आदिमातेची पावले उमटली, असा विश्वास श्रद्धावानांच्या मनात होता. त्यामुळे अनेकांनी पुन्हा पुन्हा या पाषाणांचे पूजन आपल्या घरी केले.

रुपरेषा 

या उत्सवामध्ये विविध आराधना, पूजा व पठण होते. त्याची माहिती पुढीलप्रमाणे,

 . प्रमुखदेवता पूजन

महिषासुरमर्दिनीचे अखिल कामेश्वरी स्वरुप, महाकालीचे “कालनियंत्री” स्वरुप आणि महासरस्वतीचे “आरोग्यभवानी” स्वरुप ह्यांचे पूजन.

उत्सवामध्ये प्रमुख स्टेजवर मधोमध महिषासुरमर्दिनीची “अखिल कामेश्वरीची मूर्ती” विशिष्टमूर्ती होती. तिच्या उजव्या बाजूस महाकालीची अर्थात “कालनियंत्री”ची मूर्ती होती. तर डाव्या बाजूला महासरस्वतीची “आरोग्यभवानी मूर्ती” होती. म्हणजेच “काल, काम आणि आरोग्य” ह्य अतिशय आवश्यक गोष्टी आहेत आणि त्यांमध्येच सर्वाधिक बाधा किंवा अडचणी उत्पन्न होतात, त्या दूर करणारी तीची ही तीन रुपे. यांचे महापूजन करण्यात आले.

. उत्सवातील नित्योपचार

उत्सवात दररोज सकाळी नित्य जप सुरु व्हायचा. तो दहाच्या दहा दिवस रात्रीपर्यंत चालला. हा विशिष्ट जप तीन मंत्रांचा बनलेला होता.

१. ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे।

२. नतेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे।

रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषौ जहि॥

३. ॐ नमश्र्चण्डिकायै।

दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता महाआरती होत असे.

महानैवद्यम वज्रमंडलपीठपूजनमप्रमाणे दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी, दुपारी व संध्याकाळी होत असे. सकाळच्या महानैवद्यात “मधुपर्क” दुपारी व रात्री भोजन अर्पण केले जात होते. रोज संध्याकाळी “महाभोग” अर्पण केला जात असे.

 . महाकाली कुंड

कलियुगातील मानवाच्या प्राणमय देहात असणार्‍या त्या अशुभंकर कलिकेंद्रांना क्षीण करण्यासाठी हे महाकाली कुंड होते.

. महालक्ष्मी दीप

ह्या महालक्ष्मी दीपामध्ये ५२ शक्तीपीठांच्या प्रतिकांची स्थापना स्वतः सदगुरु श्रीअनिरुद्धांनी केली. हा दीप अत्यंत मोठा होता आणि त्याला ५२ मोठ्या ज्योती होत्या. ह्याच्यामध्ये भक्तांना “सुरस्नेहन द्रव्य” अर्पण करता येत होते.

. महासरस्वती वापी

शुभंकर केंद्रे सक्षम होण्यासाठी ही वापी (विहीर) आहे. या उत्सवाच्या आधी घरोघरी पूजन केलेल्या समंत्रक सिद्ध केलेल्या कंठकूप पाषाणांच्या सहाय्याने ही वापी बांधली गेली. या वापीमध्ये भक्त स्वच्छेने “मांगल्यद्रव्य” अर्पण करू शकत होते. या कंठकूप पाषाणांनी “प्रथम पुरुषार्थधामा”मधील चण्डिका गर्भगृहाची मूळ बैठक बांधली गेली.

. शत्रुघ्नेश्वरी़ पूजन

या उत्सवात रक्तद्न्तिका ह्या महिषासुरमर्दिनीच्या चौथ्या अवताराच्या “शत्रुघ्नेश्वरी” रुपाचे पूजन केले गेले. पूजनविधीनंतर जेव्हा आरतीला सुरुवात होईल तेव्हा वाद्यांच्या-रणवाद्यांच्या गजरात तो पडदा उघडला जातो. प्रत्येकाला तेवढ्याच वेळेमध्ये दर्शन घ्यायचे होते. रक्तदंतिकेची अवताराची कथा मातृवात्सल्यविंदानम्‌ ग्रंथात वाचण्यास मिळेल.

. सहस्त्रचण्डियाग

उत्सवस्थळी अजून एक अत्यंत दुर्मिळ घडलेली गोष्ट म्हणजे सहस्त्रचण्डियाग. येथे इतर मंत्रोच्‍चारांसोबत नवार्ण मंत्राचेही पठण झाले. तसेच रोज दुपारी सुमारे २ ते रात्रौ ८.२० पर्यंत २ वेळा सप्तशतिपाठाचे पठण केले गेले.

. दुर्गावरद होम

हा यज्ञ अत्रिसंहितेच्या आधारे केला गेला. मातृवात्सल्यविंदानम्‌ ग्रंथाच्या संस्कृत आवृत्तीनुसार हा होम केला गेला. हा यज्ञ नऊ दिवस चालला व नवव्या दिवशी दिवसभर यज्ञाची पूर्णाहूती झाली.

. जान्हवीस्थानम् व गंगामातेची स्थापना

वैशाख महिन्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे “गंगा सप्तमी” म्हणजे “गंगोत्पत्तीचा दिवस”. ह्याच दिवशी गंगा भागीरथी बनून पृथ्वीवर अवतरली होती. २०११ मध्ये ही गंगा सप्तमी १० मे रोजी होती. ह्या दिवशी श्रीगंगेची स्थापना करण्यात आली व जिथे ही स्थापना करण्यात आली ते म्हणजे “जान्हवीस्थानम्‌”

या जान्हवी स्थानामध्ये मकरावर (मगर) बसलेल्या गंगेची पंचधातुची मूर्ती पूजनासाठी बसवली गेली होती. ह्या अभिषेकासाठी सप्तसमुद्रांचे आणि शतनद्या म्हणजे जगभरातील शंभर नदयांचे जल आणले गेले होते. उत्सवानंतर गंगामातेची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे करण्यात आली.

१०. अवधूतकुंभांची सिद्धता

पंचधातूंच्या २४ कुंभांमध्ये “अविरत उदी” भरलेली होती आणि कालातीत संहितेनुसार हे कुंभ दहा दिवसांमध्ये सिद्ध केले गेले. हे २४ अवधूत कुंभ ह्या तीन मूर्तींच्या बाजूला एका विशिष्ट यंत्राच्या रचनेमध्ये ठेवलेले होते. त्यांचे विशिष्ट पद्धतीने पूजनही केले गेले.

श्रीवरदाचण्डिकाप्रसन्नोत्सव एक अदभूत उत्सव

ह्या दैवी उत्सवामध्ये सहभागी होण्याची क्षमता आई चण्डिकेच्या कृपाशीर्वादाने श्रध्दावानांना प्राप्त झाली होती.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com