स्त्रियांची श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती म्हणजे काय?

आपण ह्या ज्या मोठ्या विश्वात आनंदाने जगत आहोत, वावरत आहोत ह्याचे सर्व श्रेय फक्त ह्या आदिमाता जननीलाच जाते. कारण तीच ह्या विश्वाची निर्माणकर्ती, पालनकर्ती आहे. नवनिर्मितीची ताकद घेऊन या वसुंधरेवर वावरणारी स्त्री म्हणजे तिचेच प्रतीक. विश्वातील असमान्य ताकद एका स्त्रीकडे असते. असं म्हणतात की कुटुंबातील स्त्री जर सक्षम, खंबीर असेल तर ते कुटुंबही तसेच असते. प्रत्येक स्त्री ही कुटुंबवत्सल माता असतानाही कुटुंबरक्षण रणरागिणीही असते, हे विसरून चालणार नाही. तिच्या ह्या स्वरुपाला त्याच आदिमातेकडून अधिक बळ मिळण्यासाठी आणि आदिमातेच्या पुत्राकडून भक्कम पाठिंबा मिळण्यासाठी सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी रामराज्य २०२५ वरचे पितृवचन करताना अतिशय सुंदर उपासना (प्रपत्ती) सांगितली आहे. ह्या प्रपत्तीला “श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती” म्हणतात. ही प्रपत्ती करणे म्हणजे, आदिमाता आणि तिचा पुत्र परमात्मा (महाविष्णु, साई, स्वामी) ह्यांचावर एकत्रित आणि संपूर्णपणे विश्वास ठेवून आपला प्रपंच आणि परमार्थ सुखाचा करणे.

बापू म्हणतात,

प्रत्य्क स्त्रीला आणि पुरुषाला पराक्रमी सैनिक, प्रापंचिक बनविणारी, पराक्रमी आध्यात्मिक बनविणारी ही मंगलचण्डिकाप्रपत्ती आहे. ही स्त्रीला सैनिक म्हणूनही पराक्रमी बनवते. ही प्रपत्ती करणार्‍या स्त्रिया ह्या आदिमाता चण्डिकेच्या सैनिक बनतात. स्वतःच्या गृहरक्षणासाठी, स्वतःच्या आप्तांच्या रक्षणासाठी. पण हे रक्षण करायचं काम आज स्त्री करु शकेल. ती अबला नसेल. ती अबला राहणार नाही, ती दुर्बल राहणार नाही. ती स्वतः समर्थ बनेल. मात्र एकच, नित्य गुरुमंत्राचे पठण आणि संक्रांतीच्या दिवशी ही प्रपत्ती मनापासून करणे आवश्यक आहे.

श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती कधी करायची?

ही प्रपत्ती मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर स्त्रियांनी एकत्र येऊन मोकळ्या जागेत करायची असते. मकरसंक्रांत हाच दिवस का निवडला?फार वर्षांपूर्वी महिषासुर नावाच्या असुराने पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार उडवून सोडला होता. त्याच्या ह्या उच्छादामुळे सर्व पृथ्वीवासी त्रस्त झाले होते. साक्षात आदिमातेनेच आपल्या कुटुंब(पृथ्वी) रक्षणासाठी अवतार घेण्याचे ठरवले. त्यासाठी आदिमातेला पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ जागा हवी होती. कारण तिने अंतरिक्षातून पृथ्वीवर पाऊल ठेवण्याआधीच पृथ्वी थरथरू लागली. तेव्हा तिने ऋषी कर्दम आणि देवहूती ह्यांच्या कतराज आश्रमात पहिले पाऊल याच दिवशी ठेवले. सूर्यास्तानंतर तिने वसुंधरेवर आपले पाऊल ठेवल्यामुळे ही प्रपत्ती सूर्यास्तानंतरच केली जाते. प्रपत्ती कशी करावी याबद्दलची सर्व माहिती चण्डिकाप्रपत्ती ब्लॉगवर मिळेल. click here

श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे फायदे

मानसिक आणि शारीरिक ताकद मिळवण्यासाठी ह्या प्रपत्तीची गरज प्रत्येक स्त्रीला आहेच. कोणत्याही प्रकारचे रक्षण करण्याचे मनोबळ स्त्रीला या प्रपत्तीने प्राप्त होऊ शकेल. ती अबला राहणार नाही, दुर्बल राहणार नाही. ती स्वतः समर्थ बनेल. प्रत्येक अनिरुध्द उपासना केंद्राद्वारे ह्या प्रपत्तीचे आयोजन केले जाते व हजारो स्त्रिया ह्या प्रपत्तीचा लाभ दरवर्षी घेत असतात.

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com