शिर्डी रसयात्रा संकल्पना

रसराज असणार्‍या परमेश्वराचे अस्तित्व आपल्या दैनंदिन आयुष्यात सातत्याने प्राप्त होणे. अशी रसमयता श्रद्धावानांच्या आयुष्यात येण्यासाठी सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सर्वप्रथम “शिर्डी रसयात्रा” आयोजित केली. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ह्या संस्थेच्या विद्यमाने पहिली शिरडी रसयात्रा २२ व २३ स़प्टेंबर १९९६ रोजी दोन दिवसांकरिता आयोजित केली गेली होती. एकदंर १०० श्रद्धावानांनी या रसयात्रेसाठी आपली नोंदणी केली होती.

शिर्डी रसयात्रा वैशिष्ट्य

श्रीअनिरुद्धांनी सांगितल्या प्रमाणे, “अमृतमंथन उपासना” हेच ह्या रसयात्रेचे वैशिष्ट्य आहे. देव व दानव यांनी अमृतमंथनास प्रारंभ केला, तो दिवस म्हणजे रसयात्रेचा पहिला दिवस. देवांनी दानवांची साथ घेतल्यामुळे अमृतमंथनांच्या वेळी अमृताबरोबर विषही बाहेर आले. ते विष प्राशन करुन पचविण्याची ताकद फक्त एकट्या शिवशंकराकडे होती. आपल्या जीवनात आपलं सतत आपल्या प्रारब्धाशी युद्ध चालू असतं, म्हणून सर्व श्रद्धावानांच्या हृदयामध्ये भक्तीरसाचे अमृतमंथन करुन अमृत पाजण्यासाठी ही रसयात्रा होती.

शिर्डी रसयात्रेतील उपासना

सुरुवातीला श्रीसाई गायत्री मंत्राची उपासना केली. श्रीअनिरुध्द बापूंनी गायत्री मंत्राचे महत्त्व विषद करून श्रीसाई गायत्री मंत्राचा महिमा वर्णन केला. त्यानंतर चिकण मातीचा केलेला गोळा केळीच्या पानावर सर्वांना देण्यात आला. ही माती यमुनेच्या खोऱ्यातून आणली होती. दिलेल्या मातीच्या गोळ्याच्या जमतील तशा साईंच्या पादुका करण्यास प्रत्येकाला सांगितले. नंतर त्या पादुकांवर १०८ वेळा साईगायत्री मंत्र म्हणून कस्तुरी गंध इत्यादि वाहिले. तो मंत्र असा –

ॐ भू: र्भुवः स्वः। ॐ साईनाथाय विद्महे। पूर्णपुरुषाय धीमहि। तन्नो सद्गुरु: प्रचोदयात्॥

 

हा मंत्र सद्गुरु बापूंच्या बरोबर जपण्यात आला. याव्यतिरिक्त श्रीसाईंच्या लोण्याच्याही पादुका केल्या होत्या. त्यावर श्री चौबळ आजोबा व चौबळ आजींनी १०८ तुळशी वाहिल्या. नंतर लोण्याच्या पादुकांवर सर्व भक्तांनी केलेल्या पादुका व कस्तुरी अर्पण केली. सर्व पादुका दुसऱ्या दिवशी गोदावरी नदीत विसर्जित करण्यात आल्या.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शिवगायत्री मंत्राची उपासना केली. आपल्या जीवनातील हलाहल नाहिसे व्हावे म्हणून शिवगायत्री मंत्राची उपासना करण्यात आली. श्री. अप्पासाहेब व सौ. मीनाताई दाभोळकर यांनी मातीचे शिवलिंग बनविले होते व खालीलप्रमाणे शिवगायत्री मंत्राचा बापूंबरोबर १०८ वेळा जप केला. तो मंत्र असा –

भू र्भुवः स्वः। तत् पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमही। तन्नो रुद्रः प्रचोदयात्।

नंतर आरत्या म्हणण्यात आल्या. बापूंनी रचलेल्या व बाबांच्या भक्तीत रममाण झालेल्या भक्तांबाबत केलेले एक पद बापूंच्या समवेत सर्वांनी मोठ्या आनंदाने म्हटले. हे पद खालीलप्रमाणे –

दिक्षीत, शामा, हेमाड, बायजाबाई, नाना, गणू, मेघा, श्याम

यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम

त्यानंतर काही वेळाने सांगता झाली. रात्री ११ वाजेपर्यंत श्री साईबाबांचे दर्शन तसेच भोजनाचा कार्यक्रम पार पडला. पुन्हा रात्री ११ नंतर ‘ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नमः’ या मंत्राचा सर्वांनी जप केला. त्यानंतर बापूंनी पुन्हा श्रध्दावानांसमवेत सत्संगाचा लाभ घेतला.

शिरडी रसयात्रा दुसरा दिवस

परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंनी दुसर्‍या दिवशी श्रीक्षेत्र शिर्डी येथील खालील पवित्र स्थळांना श्रध्दावानांसह भेट दिली. तसेच त्या स्थळांची

महती व माहिती सांगितली.

१. द्वारकामाई

२. म्हाळसापतींची समाधी

३. शनिमंदिर

४. मारुती मंदिर

५. नानावल्ली यांची समाधी

६. भाऊमहाराज कुंभार समाधी

७. अब्दुल्ला समाधी

८. तात्या कोते पाटिल समाधी

९. लेंडी बाग

१०. दत्तमंदिर

११. शामसुंदर अश्वाची समाधी

१२. खंडोबाचे मंदिर

१३. कानिफनाथ समाधी

शिर्डी रसयात्रा सांगता

शिर्डीची वारी झाल्यानंतर शेवटी स्वतः बापूंनी सर्वांना जेवण वाढले व प्रत्येकाला पेरुचा प्रसाद दिला गेला. त्यानंतर ५ श्रीफळे द्वारकामाईत ठेवून शिर्डी रसयात्रेची सांगता झाली.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com