मुद्रांचे महत्त्व काय?

 

सारं विश्व पंचमहाभूतांनी बनलेले आहे. विश्वाच्या या पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व आपल्या हाताची पाच बोटे करीत असतात. अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व अंगठा, वायूतत्त्वाचे प्रतिनिधित्व तर्जनी, आकाशतत्त्वाचे मध्यमा, पृथ्वीतत्त्वाचे अनामिका आणि करंगळी जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. जशी विश्वात ही पंचतत्वे आहेत तशी माझ्या शरीरातही ही पंचतत्त्वे आहेत आणि त्यांचे सुयोग्य नियमन आपल्याला या योग मुद्रांच्या आधारे राखता येते. शरिरातील कफ, पित्त आणि वात यांचे संतुलन आणि अनेक आधिव्याधींवर पर्यायी उपचार म्हणून ह्या योग मुद्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात शरीरात आजारांची उत्पत्ती पंचमहभूतांमध्ये असमतोल आल्याने होत असते. आपल्या हाताची बोटे या पंचमहाभूतांची प्रतिनिधित्व करीत असल्याने या पाच बोटांच्या सहाय्याने निरनिराळ्या मुद्रा तयार होतात. त्यामुळे शरीरात समतोल तयार होत असतो. त्यामुळे या मुद्रांच्या सहाय्याने आपण आपल्या शरीर, मनाचे निरोगीकरण करु शकतो. श्रीश्वासम्‌ या उत्सवाच्या सुरुवातीच्या आधी बापूंनी सात मुद्रांची ओळख करुन दिली. तशा अनेकविध मुद्रा आहेत. परंतु बापूंनी सप्तचक्रांशी निगडित असणार्‍या सात मुद्राच या मुद्रा प्रशिक्षणासाठी दिल्या. त्या पुढील प्रमाणे –

सप्त मुद्रा

१. मूलाधार चक्राशी निगडित स्वस्तिमुद्रा

२. स्वाधिष्ठान चक्राशी निगडित रसमुद्रा

३. मणिपूर चक्राशी निगडित त्रिविक्रम मुद्रा

४. अनाहत चक्राशी निगडित शिवलिंग मुद्रा

५. विशुद्ध चक्राशी निगडित आंजनेया मुद्रा

६. आज्ञाचक्राशी निगडित अंबामुद्रा

७. सहस्त्रार चक्राशी निगडित अवधूत मुद्रा

मुद्रा प्रशिक्षण

बापूंच्या आज्ञेनुसार महाधर्मवर्मन डॉ. योंगिद्रसिंह जोशी यांनी या प्रशिक्षणाची धुरा संभाळली व दोन दिवसाचे मोफत प्रशिक्षण सुरु केले. या प्रशिक्षणासाठी आधी प्रशिक्षक तयार केले गेले आणि त्यानंतर सदगुरु श्रीअनिरुध्द उपासना फाऊंडेशनच्या विविध केंद्रांवर हे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. असंख्य श्रद्धावानांनी मुद्रा प्रशिक्षण घेतलेले आहे. ज्यांना हे प्रशिक्षण घ्यावायचे असेल त्यांनी आपल्या जवळच्या उपासना केंद्रांमध्ये संपर्क करणे आवश्यक आहे.

श्रीहरिगुरुग्राम येथेही दोन गुरुवार मुद्रा प्रशिक्षण देण्यात आले तेव्हा हजारो श्रध्दावानांनी मुद्रा प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com