आपल्या रामराज्याच्या प्रवचनात सदगुरु श्रीअनिरुद्धांनी रणचण्डिका प्रपत्ती व मंगलचण्डिका प्रपत्तीची माहीती दिली. श्रीश्वासम्‌ नंतर १० मार्च २०१६ रोजी बापूंनी आपल्या पितृवचनात महादुर्गेश्वर प्रपत्तीची माहिती दिली. यापूढे दर श्रावणात पुरुषांनी करावयाच्या रणचण्डिका प्रपत्तीमध्ये पूर्णतः बदल करुन “महादुर्गेश्वर प्रपत्ती” देण्यात आली. त्यावेळी बापू म्हणाले होते, काळानुसार बदलणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच काळानुसार या प्रपत्तीमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

श्रीमहादुर्गेश्वर

श्रीगुरुक्षेत्रम्‌मध्ये महादुर्गेश्वराच्या लिंगाचे दर्शन सर्वांना घेता येते. महादुर्गेश्वर म्हणजेच महिषासुर्दिनी आदिमाता चण्डिका. ते एक आहेतही आणि नाहीही. गुरुक्षेत्रम्‌मध्ये या महादुर्गेश्वराचे दररोज तीन प्रहरी पूजन केले जाते. तर दर महिन्याच्या शिवरात्रीला देखील महादुर्गेश्वराचे शिवरात्री पूजन केले जाते.

श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती

श्रावणातील कुठल्याही सोमवारी किंवा सर्वच्या सर्व सोमवारी ही श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती केली जाऊ शकते. स्त्रिया व पुरुषांची ग्रहणक्षमता भिन्न भिन्न आहेत. तो निसर्गानेच केलेला बदल आहे. त्यामुळे पुरुषांना श्रावण महिन्यात येणारे सोमवार तर स्त्रियांना फक्त मकर संक्रांतीच्या एका दिवशी प्रपत्ती दिली गेली आहे. श्रावणी सोमवारी शिवशंकराबरोबर नृसिंह अवतारच्या पूजेचाही मान असतो. बापू त्यांच्या रामराज्याच्या प्रवचनात म्हणतात की प्रत्येक पुरुषाची त्रिविक्रम हाच नृसिंह आहे ही श्रद्धा असली पाहिजे. या त्रिविक्रमाच्या प्रतिमेचे पूजन महादुर्गेश्वर प्रपत्तीमध्ये केले जाते.

श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती कशी करावी?

श्रद्धावान पुरुषांनी एकत्र येऊन सूर्यास्तानंतर ही प्रपत्ती करावी. श्रद्धावानाच्या वेषात (सफेद शर्ट, लुंगी व उपरणे) ही प्रपत्ती करावयाची आहे. ५ वेळा श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्राने सुरुवात केल्यानंतर त्यानंतर महादुर्गेश्वराचा जप ११ वेळा घ्यायचा आहे. त्यानंतर महादुर्गेश्वराच्या बलकथेचे वाचन करायचे आहे. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. सर्वप्रकारचे बल प्रदान करणारी ही कथा आहे. त्यानंतर गौरीहराची आरती घ्यायची आहे. त्यानंतर हातात तबक घेऊन मांडणीच्या १२ प्रदक्षिणा “बम बम भोलेनाथ” या गजरासकट घालावयाच्या आहेत. हे बं बीज विकासाचं बीज आहे. बलचं बीज आहे. अनुग्रहाचं बीज आहे आणि याची शास्ता कोण आहेत तर बलगंगागौरी म्हणजे शिवगंगागौरी. त्यानंतर त्रिविक्रमाला पांढरी, पिवळी फुले अर्पण करावयाची आहे. या प्रपत्तीची अधिक माहिती श्री महादुर्गेश्वर प्रपत्तीच्या पुस्तकात मिळू शकेल.

http://www.aanjaneyapublications.com/

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com