सुरुवात

शिर्डी, अक्कलकोट व देहू-आळंदी रसयात्रेनंतर १९९९ साली श्री अनिरुद्धांनी चौथी रसयात्रा ’गोवा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा’ जाहीर केली. १६ मे १९९९ रोजी या यात्रेस प्रारंभ झाला. यावेळेस अंदाजे ५७ गाड्या गोव्यासाठी निघाल्या. यावेळेस भर उन्हाळ्यातही पावसाला सुरुवात झाली आणि सार्‍यांचाच सुखावह प्रवास सुरु झाला. गोव्यातील कवळे गावातील रामनाथीच्या मंदिरात सर्वांचे आगमन पहाटे ३ वाजल्यापासून सुरु झाले. जवळपास २५०० श्रद्धावान या रसयात्रेत सहभागी झाले तसेच ४०० ते ५०० कार्यकर्ते या रसयात्रेसाठी कार्यरत होते.

दिवस पहिला

सोमवार दि. १७ मे रोजी सकाळी दहा नंतर सोहळा सुरु झाला. श्री रामनाथीला महाभोग चढविण्यात आला व त्यावेळेस शिवपाठ म्हणण्यात आला. यानंतर श्री विष्णूपाद व श्रीकृष्णाची पालखी निघाली. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता ’अमृतमंथन’ उपासना सुरु झाली. बापूंनी ह्या उपासनेचे महत्व सांगितले. ह्यावेळेस प्रथमच श्रीसच्चिदानंद नवनीत पादुका पूजन सुरु झाले. प्रत्येक भक्ताने कलनमृत्तिकेचे शिवलिंग तयार केले व त्यावर अर्चनद्रव्याने अभिषेक केला व पूजन केले. त्यानंतर मंगेश गायत्री जपण्यात आले व मग श्री शांतादुर्गा गायत्री जप झाला. उपासनेनंतर पहिल्या दिवसाचा सत्संग पार पडला.

दिवस दुसरा

सर्व श्रद्धावान श्री शांतादुर्गा उपासनेसाठी जमा झाले. उपासना करुन सर्वजण शांतादुर्गा मंदिराकडे दर्शनासाठी गेले. संध्याकाळी ६ वाजता श्री अमृतमंथन विधी सुरु झाला. श्रध्दावानांमधील दुष्ट प्रवृत्तींचा नाश करुन नवजीवनाची सुरुवात करण्यासाठी अमृतमंथनाचे आयोजन केले होते. ह्या अमृतमंथन उपासनेअंती एक होम आयोजित केला. यात सर्वांनी लाह्यांच्या समिधा समर्पित केल्या. रात्री ११ वाजता सत्संग सुरु झाला.

दिवस तिसरा

सकाळीच सर्व भक्तगण पुण्यक्षेत्र श्रीक्षेत्र-साखळी येथील दत्तमंदिरात दर्शनासाठी गेले. संध्याकाळी श्री मंगेश उपासना सुरु झाली. रात्री सत्संग सुरु झाला व सत्संगाच्या अखेरीस श्री मंगेश-शांतादुर्गेचा गोंधळ घातला गेला.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com